विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 February 2023

.सरदार तुळाजी देशमुख

६ फेब्रुवारी १६८९ रोजी
मुकर्रबखानाने कसबा संगमेश्वरी छ संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर तो चांदोली च्या जंगलातून निघाला त्याचा मुक्काम शिराळ्याच्या रानात पडला होता ही बातमी शिराळ्याचे सरदार तुळाजी देशमुखांना समजली. त्यांनी ही बातमी आप्पशास्त्री दिक्षीत ह्यांना सांगितली. २ नी मिळतील तितके मावळे घेऊन मुकर्रबखानाच्या तळावर हल्ला केला, शिराळ्याच्या रानात जबर रणकंदन माजले. पण मिरजे हून खानाला नवीन फौज येऊन मिळाली ह्या युद्धात



तुळाजी देशमुख, आप्पशास्त्री दिक्षीत, हरबा वडार धारातीर्थी पडले. ३२ शिराळ्याच्या मावळ्यांनी शंभू राजेंना सोडवायचा केलेला हा प्रयत्न शेवटचा प्रयत्न होता
(आप्पाशास्त्री दिक्षीत व तुळाजी देशमुख समाधी स्थळ)
६ फेब्रुवारी ...सरदार तुळाजी देशमुख यांची ३३३ वी पुण्यतिथी.
"लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये." म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी शेवटच्या श्र्वासापर्यत गनिमाशी लढणारे स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणार महापराक्रमी सरदार तुळाजी देशमुख,यांची आज ३३३ वी पुण्यतिथी. आपल्या या महापराक्रमी पुर्वजाच्या पवित्र स्मृतीस
विनम्र अभिवादन.
सरदार तुळाजी देशमुख यांना अखंड
मानाचा मुजरा ,,🙏🙏🚩🚩

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...