मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवराय
तहाच्या अटी.
1.चार लाख होन ( सुमारे सोळा लाख रूपये) उत्पन्नाचे शिवाजी महाराजांचे लहान मोे असे तेवीस किल्ले गड साम्राज्याला जोडण्यात यावेत
2.राजगड धरून बारा किल्ले ,ए लाख होन (सुमारे चार लाख रुपये ) उत्पन्नाचे हे प्रदेश महाराजांकडे राहतील पण अट हि कि महाराजांनी बादशाहची चाकरी करावी आणि बादशहाबद्दल निष्ठा बाळगावी.
3.महाराजांचा मुलगा संभाजी राजे यांस पाच हजाराची मनसब देण्यात येईल
4.स्वतः संबधी शिवाजी महाराजांनी विनंती केली कि मनसब आणि चाकरी ह्यातून मला वगळण्यात यावे ,तुमच्या दक्षिणेच्या मोहिमात कोणती हि कामगिरी बजावण्यास कोठेही माझी नेमणूक झाली तर मी कोणती ही दिरंगाई न करता ती कामगिरी पार पाडीन
5.विजापूरच्या इलाख्याबद्दल महाराज म्हणाले त्या राज्यातील चार लाख होन उत्पन्नाचा तळ कोकनाचा भाग माज्या ताब्यात आहे विजापूर राज्यातील बालाघाटावर असलेले ( सांगली,कोल्हापूर इत्यादी ) पाच लाख होनाचे महाल आहेत ते मला देण्यात यावेत त्या विषयीचे फर्मान मला मिळावे फर्मानात असा स्पष्ट उल्लेख असावा कि पुढे विजापूरचे राज्य जिंकून घेण्यासाठी बादशाही सैन्य निघतील तेव्हा वर उल्लेख केलेले तालुके माज्याकडे ठेवण्यात येतील या अटीवर मी दर वर्षी तीन लाख होन या हिशोबाने बाद शहाणा 40 लाख होनाची खंडणी देण्यास तयार आहे .
मोगलानी महाराजांकडून जे किल्ले घेतले त्यात पुरंदर ,कोंडाणा ,रोहिडा ,लोहगड आणि माहुली असे बळकट किल्ले घेतले होते .महाराजांच्याकडे ठेवण्यात आलेल्या बारा किल्यात दोनचं किल्ले काय ते नाव घेन्यासारखे होते एक राजगड आणि दुसरा तोरणा.पुण्याचा मैदानी मुलुख आणि कल्याण भिवंडीची कल्याणपट्टी हि मोगलांच्या ताब्यात दिली होती.
महाराजांच्याकडे काय राहिले होते ? त्यांच्या वडिलोपार्जित पुणे प्रांतापैकी चार लाख रुपये उत्पन्नाचा एक लहानसा प्रदेश .मध्य आणि दक्षिण कोकण हा प्रांत त्यांनी विजापूरकडून जिंकून घेतला होता .याला जोडून सध्याच्या सातारा ज़िल्हायातील प्रतापगड आणि जावळीचा तालुका .
आजच्या परिभाषेत बोलायचे तर महाराजांचे राज्य दोन जिल्याइतके लहान झाले होते .मोगलानी जंजिऱ्याच्या सिद्द्याला आपल्या चाकरीत घेऊन जंजिऱ्या पर्यंत आपला ताबा वाढविला होता वास्तविक पाहता जंजिरा हा कोकणातील कार्यक्षेत्रातील मुलुख .मोगलांचे हे वागणे महाराजांना अजिबात आवडले नाही पण महाराजांनी हि कडू गोळी गिळली .महाराजानी हा पाणउतारा अतिशय दृढपणे आणि संयमाने सहन केला यातचं त्यांचे मोठेपण आहे .ते झुंजण्यासाठी शिल्लक राहिले ;आणि झुंज यशस्वी करून दाखविली ;त्यात सर्वकाही आले .
No comments:
Post a Comment