विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 February 2023

मराठ्यांच्या शौर्य खुणा:

 


मराठ्यांच्या शौर्य खुणा:
शिरवले (शिरोळे) बुरुज - रोहिडा किल्ला. किल्ल्यावरील शिरवले व वाघजाई बुरुज हे प्रेक्षणीय व चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आग्नयेस शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज, उत्तरेस दामगुडे बुरुज, पूर्वेस फत्ते व सदरेचा बुरुज, तर ज्या बाजूला वाघजाई देवीचे मंदिर आहे त्यास वाघजाई बुरुज हे नाव आहे. पहिल्या तीन बुरुजांस तेथील रक्षणासाठी असलेल्या घराण्यांची आडनावे दिलेली आहेत. शिरवले व वाघजाई बुरुज भक्कम व लढाऊ आहेत. शिरोळे घराण्यातील सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली. पन्हाळगड ते विशाळगड वाटेतील घोडखिंडीतील लढाईत आपल्या प्राणांची बाजी लावून त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. बांदल सेना आणि इतर मराठा सेनेचे कौतुक करावे तेवढे थोडे. त्यानंतर शाहिस्तेखानाच्या लाल महालातील हल्ल्याच्या वेळेस सरदार शिरोळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबरोबर होते व भांबुर्डा (सध्याचे शिवाजीनगर गावठाण - पुणे) येथे महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
संदर्भ: 1)भोर वेल्हे निसर्ग पर्यटन दिनदर्शिका २०२३, 2) ऐतिहासिक भोर एक दृष्टिक्षेप -सुरेश नारायण शिंदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...