१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ९
संजय सोनावणे
गारदी सैन्याची चाल ज्या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणाहून सुमारे दीड - दोन
किलोमीटर्स अंतरावर दक्षिणेच्या बाजूला शत्रूसैन्याची निशाणे दिसू लागली.
शत्रू सैन्याची निशाणे दृष्टीस पडल्यावर गारदी पथकांनी पूर्वेचा रोख सोडून
दक्षिणेकडे, म्हणजे उजवीकडे आपला मोहरा वळवला. गारद्यांची चाल थांबताच,
पाठोपाठ येणारे मराठी सैन्य देखील जागच्याजागी थांबले. गारद्यांनी आपल्या
तोफांचे मोर्चे शत्रू सैन्याच्या रोखाने, दक्षिणेकडे तोंड करून उभारले.
दरम्यान, याच सुमारास कधीतरी अफगाण वजीर शहावलीखान हा आपल्या लष्करासह
हुजुरातीच्या अंगावर धावून आला.
गारदी - रोहिला सैन्याची लढाई :- सकाळी दहाच्या आसपास गारद्यांचा तोफखाना सुरु झाल्यावर गारद्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले विंचूरकर, गायकवाड, पवार हे सरदार गोलातून बाहेर पडून रोहिल्यांवर चालून गेले. यांच्यासोबत उभे असलेले माणकेश्वर व समशेर बहाद्दर हे दोघे या वेळी गोलात उभे होते कि तेसुद्धा इतर सरदारांसोबत गोलातून बाहेर पडले याची माहिती मिळत नाही. गारद्यांच्या उजव्या अंगाला उभ्या असलेल्या मराठी सरदारांना गोलातून बाहेर पडण्याची गरज का भासली असावी ? ते गोलातून कधी बाहेर पडले असावेत ?
आपणांस गारदी सैन्याचा मुकाबला करावा लागेल अशी रोहिला सरदारांना, आरंभी तरी अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या अपेक्षेनुसार गारदी सैन्य एकतर दिल्लीकडे जाणाऱ्या राजरस्त्याने चालून येईल किंवा शहावलीच्या दिशेने जाईल. आपणांस फारतर मराठ्यांच्या घोडदळाशी सामना करावा लागेल अशी त्यांची कल्पना होती. परंतु, जेव्हा ते गारदी सैन्यापासून दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर पोहोचले तेव्हा त्यांना थोडा आश्चर्याचा धक्का बसला. दूर अंतरावर गारद्यांची निशाणे दिसल्यावर ते काहीसे हादरले. बहुतेक आहे त्याच ठिकाणी ते काही काळ उभे राहिले. सोबत ज्या काही लांब पल्ल्याच्या तोफा उपलब्ध होत्या त्यांचे मोर्चे उभारून ते लांबूनचं युद्ध करण्यास सिद्ध झाले. काही वेळाने दोन्ही बाजूंकडून तोफांचा मारा होऊ लागला. गारदी तोपची प्रशिक्षित असल्याने, त्यांच्या तोफांचा मारा बराचसा अचूक असा होता. त्याउलट, रोहिल्यांच्या तोफांचे गोळे गारदी सैन्यावर पडत होतेचं असे नाही. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले अमीरबेग व बरकुरदारखान यावेळी पुढे सरकले होते कि नाही याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, याच सुमारास केव्हातरी हाजी जमालखान हा काही हजार अफगाण स्वारांसह व बहुतेक जड तोफांसह, रोहिल्यांच्या मागे सुमारे एक - दीड किलोमीटर्सच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता.

No comments:
Post a Comment