१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ८
संजय सोनावणे
पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची
रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे
काही बदल करण्यात आले होते का ? माझ्या मते, भाऊ व त्याचे सरदार यांनी असे
बदल केले होते. शत्रू सैन्याने जर आपल्या गोलावर हल्ला केला तर, आपल्या
जवळ पुरेसे बंदुकधारी पायदळ नसल्याने त्याला आपण गोलाजवळ येण्यापासून रोखू
शकत नाही हे मराठी सरदार जाणून होते. आपल्या सैन्यात घोडदळ अधिक संख्येत
असल्यामुळे, आपण गोलाच्या बाहेर पडून शत्रूवर चालून जायचे व त्याचा पराभव
करून परत गोलात येऊन उभे राहायचे असे त्यांनी
ठरवले होते. गोलाच्या रचनेमुळे सर्व सैन्य एकवटून चालणार असल्याने,
प्रसंगी कोणत्याही मोर्च्यावर अल्पावधीत कुमक पाठविणे शक्य होणार होते.
सारांश, शेजवलकर यांनी मराठी सरदारांनी गोल फोडल्याचे जे विधान केले आहे ते
साफ चुकीचे आहे हे स्पष्ट होते. प्रसंग पडल्यास मराठी सरदार गोलातून बाहेर
पडणार हे एकप्रकारे पूर्वनियोजित होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखालील
हुजुरातसुद्धा गोलातून बाहेर पडून अफगाण सैन्यावर चालून गेली होती.
त्यावरून भाऊने गोल फोडला असे म्हणायचे का ? तात्पर्य, मराठी सरदारांनी गोल
फोडला म्हणून पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला असे जे अलीकडे सांगितले
जाते ते साफ चुकीचे आहे. विंचूरकर, पवार हे सरदार जरी गोलातून बाहेर पडले
असले तरी परत ते आपल्या जागी येऊन उभे राहिले होते हे विसरून चालणार नाही.
त्याचप्रमाणे, ते गोलातून बाहेर का पडले असावेत हे पाहाणे देखील गरजेचे
आहे.
( या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि, प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या प्रसंगी जमिनीचे चढ - उतार कसे होते किंवा कोणत्या फौजा चढावर होत्या अथवा उतारावर होत्या / सपाटीवर होत्या याची माहिती उपलब्ध नसल्याने व अशी माहिती आता उपलब्ध होणे जवळपास अशक्य असल्याने याविषयी अंदाजे किंवा तर्काने देखील लिहिणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. )

No comments:
Post a Comment