पोस्तसांभार ::अजित नांदवडेकर
प्रत्येक
रणसंग्रामात शत्रूला अक्षरशः झोडपून काढणार झंझावात वादळ म्हणजेच
सरसेनापती प्रतापराव गुर्जर. स्वराज्याची दीर्घकाळ निष्ठेने सेवा करणाऱ्या
प्रतापरावांच्या लढाया सांगण्यास इतिहास मुका आहे. इतिहासात पावन खिंडीला
जेवढ महत्व दिल गेल, तेवढ नेसरीच्या खिंडीला दिल गेल नाही हीच बोचरी खंत
समोर ठेऊन माझ मत तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक स्वार्थी प्रयत्न !
इ.
स. १६६० साली शिवरायांच्या घोदाडळात गुप्तहेर म्हणून शिलेदारी करणारे
प्रतापराव २४ एप्रिल १६६० साली संभाजी कावजी या स्वकीय महाकाय सरदाराचा
द्वंद्व युद्धात पराभव करतात. व १६६३ साली साहिस्तेखानास सिह्गड हल्यात
जबरी मार देतात.
शिवराय
आग्र्याच्या कैदेत असताना प्रतापरावांनी समर्थपणे राज्य संभाळल होत.
सुटकेनंतर शिवरायांनी त्यांना सरनोबत पद बहाल केल. यानंतर त्यांनी बालाघाट,
परांडा, हवेली, कलबर्गे, भागनगर (हैद्राबाद) पर्यंतचा मुलुख अनेक लढाया
करून काबीज केला होता.
तसेच १७ ऑक्टोबर १६७० साली दिंडोरी रणसंग्रामात दाउदखानाचा पराभव प्रतापरावांनी केला होता.
फेब्रुवारी
१६७२ मध्ये साठ हजार सैन्यासह आलेल्या दिलेर्खानाचा साल्हेर येथे
प्रतापरावांनी पराभव केला होता. या लढाई बद्दल इंग्लिश लेखक सर डेनिस
किंकडणे, “For the first time Maratha had won a pitched battle” असे वर्णन
केलेल्या व मोगलांना हरवणाऱ्या या मैदानी युद्धास इतिहासात खूप महत्व
आहे.
नेसरी खिंड लढाई :
मराठी
मुलाकावर आक्रमण करण्यासाठी कुर्नुलाचा जहागीरदार बहलोलखान जवळपास २००००
फौज घेऊन आला. १५ एप्रिल १६७३ रोजी कर्नाटक प्रांतातील उमराणी जवळ
मुक्कामी असताना भल्या पाहटे त्याची नाकेबंदी करून प्रतापरावांनी खानाचा
पराभव केला. पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला येणार नाही म्हणून त्यान
अभयदान मागितले. बहलोल ला धर्मवाट म्हणून प्रतापरावांनी सोडून दिले.
शत्रूला
परस्पर सोडून दिल्याने राजे नाराज झाले. खरमरीतपणे लिहिलेल्या पत्रात
राजांनी लिहिले, “काय निमित्य सला (तह) केलात ? शिपाईगिरी केलीत,
सेनापतीसारखे वागला नाही” असा महाराज्यांच्या बोलण्याचा सल प्रतापरावमनी
धरतात.
काहीच
दिवसात परत बहलोलखान स्वराज्यावर चालून येतो. बहलोल खान नेसरी जवळच्या
खिंडीजवळ तळ देऊन स्वराज्यावर पुन्हा आक्रमण करतो. त्यावेळेस प्रतापराव
सामानगड परिसरात होते. त्यांनी महाराजांकडे कुमुक मागितली.
त्यावर महाराज लिहितात, “हा वरचेवरी येतो, यासी गर्दीस मेळउन फत्ते करणे, न पेक्षा आम्हासी तोंड दाखविणे नाही”
उपलब्ध
सैन्यासह लढून विजयी व्हा. असाच त्याचा अर्थ होता. बहलोलखानाने परत
केलेल्या या आक्रमणामुळे प्रतापरावांचा राग अनावर झाला. राजांची नाराजी दूर
करायची असेल तर खानाचा अफजल करण्याशिवाय त्यांना दुसरा कोणताच मार्ग दिसत
नव्हता. त्यांच्या मनी निश्चय झाला. प्रतापरावांचा हात आपोआपच समशेरीजवळ
गेला. हर हर महादेव, म्हणत त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता
घोड्याला टाच मारली. आपल्या सरदाराचा हा अवतार पाहून अजून सहा वीर प्राण
हातावर घेऊन त्या भल्या मोठ्या फौजेचा मुकाबला करण्यासाठी निघाले. लढाई
मोठी विषम होती. संखेच्या बळावर दोन्ही पक्षांची बरोबरी करण्याचा प्रश्नच
नव्हता. नेसरीच्या माळावर हर हर महादेवची गर्जना झाली. मराठ्यांचे ते सात
वीर शत्रूवर तुटून पडले. एकच कापाकापी सुरु झाली. परिणाम काय होणार
सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. दिनाक २४ फेब्रुवारी १६७४, दिवस
महाशिवरात्र, शिवावर सात देहांच्या बिल्वदलांचा अभिषेक झाला. पावन झाली ती
नेसरीची खिंड.
कवी कुसुमाग्रजानी विरावरती कविता करताना म्हटलंय,
दगडात दिसतील अजुनी तेथिल्या टाचा,
ओढ्यात तरंगे आजीने रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा
अध्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !!
माहिती : सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक कमिटी.
No comments:
Post a Comment