*24 फेब्रुवारी नेसरी युद्धातील मराठ्यांचे शुर सेनानी*
---------------------------------------------
छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मीतीसाठी अगदी सुरवातीपासुन ज्यांनी सहकार्य केले अशा मराठा घराण्यामध्ये शिंदे घराणे हे एक प्रमुख घराणे याच घराण्यातील श्रीमंत सरदार विठोजीराव शिंदे यांनी स्वराज्यासाठी एकनिष्ठपणे शिवरायांच्या सोबत राहुन आपली सेवा मराठा दौलतीसाठी अर्पण केली इतिहास प्रसिद्ध नेसरीच्या लढाईतील सात वीरांमध्ये शिंदे नसतील तर नवलचं! आपण नेसरीच्या युध्दामधले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकल्याच असतील त्याच्या सोबत या युध्दामध्ये आणखीही सहा सरदार होते त्यापैकी एक म्हणजे सरदार विठोजीराव शिंदे या युध्दामध्ये सात मराठा वीरांनी जे असामान्य शौर्य दाखविले त्यास तोड नाही सरदार विठोजीराव शिंदे म्हणजे एक धिप्पाड देह रंग सावळा दांडग्या मिश्या कमरेला शेला आणि हातात लांबलचक धारदार तलवार समोर येणाऱ्या शत्रूला क्षणात यमसदनी धाडनारा आणि एका दमात शकडो शत्रूसैन्याशी झुंज देणारा हा मर्द मराठा गडी हे सर्व गुण निरखुनच सरसेनापतींनी नेसरीच्या मोहीमेत विठोजीरावाना आपल्या सोबत घेतले होते प्रतापराव गुजर आणि या सहाजणांना आपल्या प्राणांची आहुती देऊन या युध्दात मराठ्यांचा एक नवा अजरामर इतिहास रचला आणि आपले जीवन मराठा दौलतीसाठी अर्पण केले धन्य ते सरसेनापती आणि धन्य त्यांचे सहा वीर सरदार आज 24 फेब्रुवारी या सात सेनानींचा स्मृतिदिन सरसेनापती प्रतापराव गुजर श्रीमंत सरदार विठोजीराव शिंदे यांना आमुचा त्रिवार मानाचा मुजरा............
अवघे सात मराठे पंधरा हजार सैन्यावर हल्ला करतात ....
१) सरसेनापती प्रतापराव गुजर
२) विठोजी शिंदे
३) विसाजी बल्लाळ
४) दिपाजी राऊत
५) विठ्ठल पिलाजी अत्रे
६) कृष्णाजी भास्कर
७) सिद्धी हिलाल
#नेसर_ची_लढाई.....
#२४फेब्रुवारी.....
मयुरेश शिंदे
No comments:
Post a Comment