विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 March 2023

राजे जाधवराव घराण्यातील दोन शाखांचे नविन अप्रकाशित शिलालेख

 








राजे जाधवराव घराण्यातील दोन शाखांचे नविन अप्रकाशित शिलालेख
postsaambhar :: ©अनिल दुधाने
1)ब्राम्हणी येथील बारव शिलालेख
ब्राम्हणी शिलालेख
हा शिलालेख अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी शनी शिंगणापूरअसलेल्या मौजे ब्राम्हणी गावात जाधवराव पाटीलयांच्या खाजगी जागेत असलेल्या चौरसाकृती दगडात बांधलेल्या बारवेवर एका मुख्य कमानीवर अग्रभागी कोरलेला आहे .शिलालेख साधारण तीन फूट बाय दोन फूट चौकोनी शिळेवर कोरलेला आहे . शिलालेख उठाव स्वरूपाचा असून ७ ओळीचा असून देवनागरी मराठी भाषेत आहे.काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत तरीही स्पष्टपणे वाचता येतात .
गावाचे नाव : मु पो ब्राम्हणी ता.राहुरी जि.अहमदनगर
शिलालेखाचे वाचन :
१ ॥ श्री बल्लाळास्यदेव्य नमः ।।
२ ।। स्वस्ति श्रीनूप शालिवाहन शके १७१४
॥ परिधावी नाम संवत्सरे अस्विन श्रुध ११ वापी च
४ ॥ कार श्री मार्तंड चरणी दृढ भाव गोविंदराव सुत
५ ॥ खंडोजी जाधवराव पाटील मोकदम मोजे बा
६ ॥ मणी ता राहुरी प्रो सगमनेर सन १२०२ श्रुध भाव
७ ॥ तु । वापीस द्रव्य संख्या सोळासे येक १६०१
जी.पी.एस. : १९ . ९२ ” ०४ ’ ४२ ,७३ . ५६ ’’६७ ’ ३७
शिलालेखाचे स्थान : बारवेच्या मुख्य कमानीवर उंचावर कोरलेला आहे .
अक्षरपद्धती : उठाव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुध्द मराठी देवनागरी लिपी
प्रयोजन : बारवेच्या बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सके १७१४ परिधावी सवत्सर आश्विन शुध्द ११
काळ वर्ष : अठरावे शतक – २६ सप्टेंबर १७९२ बुधवार
कारकीर्द :, सवाई माधवराव पेशवे - सातारकर छत्रपती घराणे
व्यक्तिनाम : गोविंदराव जाधवराव,खंडोजी जाधवराव,
ग्राम देवता .बल्लाळास्यदेव्य ,श्री मार्तंड
शिलालेखाचे वाचक : ,श्री. अनिल किसन दुधाणे , श्री अनिकेत राजपूत
अर्थ : शालिवाहन शकाच्या - सके १७१४ व्या वर्षी परिधांवीनाम संवत्सरात संगमनेर परगण्यातीलआपल्या कुलदेवता बल्लाळास्यदेव्य ,श्री मार्तंड चरणी तत्पर व दृढभाव असलेले मोकदम पाटील गोविंदराव जाधवराव यांचा मुलगा खंडोजी जाधवराव याने मौजे ब्राम्हणी गावात एक बारव बांधली किंवा त्याचा जीर्णोद्धार केला .या बारवेच्या एकूण बांधकामास १६०१ द्रव्य रुपये एकंदरीत खर्च झाला
शिलालेखाचे महत्व :- या लेखातून सातारा येथील भुईंजकर जाधवराव घराणे यातील रायाची जाधवराव यांना राहुरी येथील वतन होते. त्यांच्या शाखेतील मानाजी जाधवराव राहुरीस गेले असा उल्लेख मिळतो .पुढे त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही.शिलालेखात असलेले गोविंदराव व खंडोजी जाधवराव हे याच वंश शाखेतील असू शकतात .त्यांनी मौजे ब्राम्हणी गावात पिण्याच्या पाण्याची सोय करीता ,१६०१ रुपये मोठा खर्च करून बारव बांधली .हे एक चांगले सामाजिक व पुण्याचे कार्य आहे .एखाद्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करून एक जन लोकहिताचे पुण्याचे काम शिलालेख स्वरूपात कायमचे कोरून ठेवले यावरून ते सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते हे यातून सिद्ध होते . हेच या शिलालेखाचे महत्व आहे .
भुईंजकर जाधवराव घराणे इतिहास
भुईंजकर जाधवराव हे राजे लखुजीराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराजे जाधवराव यांच्या वंशजशाखेपैकी आहेत. दत्ताजीराजे याना दोन पुत्र १) यशवंतराव राजे २) ठाकुरजीराजे /पतंगराव.
१) यशवंतराव राजे :- हे दत्ताजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र असून यांचा मृत्यू २५ जुलै १६२९ रोजी आजोबा राजे लखुजीराव यांच्या सोबत झाला. यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे. याना दोन पुत्र.
* रतनोजीराजे /रुस्तुमराव :- यांच्या वंशजशाखा - जवळखेड, उमरद देशमुख, सारवडी, करवंड, करणखेड व तेल्हारा.
* लखमोजीराजे प्रथम :- यांची वंशजशाखा भुईंजकर राजे जाधवराव म्हणून प्रसिद्ध पावली. यांचे वास्तव्य वाई येथे होते व तेथील पाटीलकी यांच्याकडे होती. यांचे पुत्र खंडोजीराजे हे सिंहगडाचे किल्लेदार होते व यांचा मृत्यू इ सन १७०३ साली झाला... ते मोगलासोबतच्या लढाईत वीरगतीला प्राप्त झाले.. यांची समाधी सिंहगडावर असण्याची शक्यता आहे. यांच्या मृत्यूनंतर यांचे पुत्र लखमोजीराजे द्वितीय याना ताराबाई राणीसाहेब यांनी भुईंज हे वतन दिले व पुढे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सुरु ठेवले... लखमोजीराजे द्वितीय याना रायाजीराव, काळोजीराव, ज्योगोजीराव, संताजीराव, संभाजीराव व मानाजीराव हे सहा पुत्र असून सदरील ब्राम्हणी येथील शिलालेख रायाजीराव यांचे घरातील खंडोजी गोविंदराव जाधवराव यांचा आहे.
संक्षेप :- सके–शके ,अस्विन- अश्विन ,मो –मोकासा ,मोकदम ,ता तर्फ, प्रो परगणे
संदर्भ -(IE VII -३४८)
2)पुणतांबे येथील समाधी मंदिर शिलालेख
पुणतांबे शिलालेख .....
हा शिलालेख अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गोदावरी नदी किनारी स्थित असलेल्या मौजे पुणतांबे गावात गोदावरी नदीकिनारी असलेल्या एका समाधीवर हा लेख कोरलेला आहे . शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ५ ओळीचा असून देवनागरी मराठी भाषेत आहे.काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत तरीही स्पष्टपणे वाचता येतात .
गावाचे नाव : मु पो पुणतांबे ता.राहता जि.अहमदनगर
शिलालेखाचे वाचन :
श्री रामचंद्र महाराज यांची स
माधी विष्णू रामचंद्र व शंकर
जाधवराव यांनी देवालय केले
शके१८७६ सन २०१०श्रावण
मिती व .१३ गुरुवार
जी.पी.एस..19.769377,74.612259
शिलालेखाचे स्थान : समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वार वर कोरलेला आहे .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुध्द मराठी देवनागरी लिपी
प्रयोजन : वडिलांच्या स्मरणार्थ समाधी बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सके १८७६ कलयुगी सवत्सर श्रावण वद्य१३
काळ वर्ष : , एकोणिसव शतक – 12 ऑगस्ट 1954 गुरुवार सन,२०१०
कारकीर्द :, भारत स्वतंत्र काळ
व्यक्तिनाम : रामचंद्र महाराज ,विष्णू,शंकर जाधवराव
शिलालेखाचे वाचक : ,श्री. अनिल किसन दुधाणे ,
अर्थ : शालिवाहन शकाच्या - सके १७१४ व्या वर्षी कलयुगी संवत्सरे श्रावण वद्य १३ म्हणजेच 12 ऑगस्ट 1954 गुरुवार या दिवशी रामचंद्र महाराज जाधव राव यांची समाधी त्यांच्या दोन्ही मुलगे विष्णू व शंकर जाधवराव यांनी पुणतांबे येथे गोदाकाठी बांधली
.
माहेगावकर राजे जाधवराव
१) राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखेतील देऊळगाव राजा या वंशजशाखेतुन सिंदखेडराजा परिसरातील देऊळगाव राजा व सिंदखेडराजा परिसराबाहेरील माहेगाव देशमुख (कोपरगाव) व पैठणकर राजे जाधवराव (ह मु माळेगांव बुद्रुक) या तीन वंशजशाखा अस्तित्वात आलेल्या आहेत.
रावजगदेवरावराजे यांनी त्यांची वंशजशाखा इ सन १६९४ साली सिंदखेडराजा येथुन देऊळगाव राजा येथे कायमची स्थलांतरित केलेली आहे.
यशवंतराव राजे:- हे रावजगदेवरावराजे जाधवराव यांचे तिसरे पुत्र. यांची वंशजशाखा कुंभारीकर जाधवराव म्हणून ओळखली जाते...ही वंशजशाखा कुंभारी ता कोपरगाव येथुन माहेगाव देशमुख येथे स्थलांतरित झालेली असुन या शाखेकडे देशमुखी जहागिरी असल्यामुळे जाधवराव देशमुख या नावाने ओळखली जाते.
सदर कार्यात Rohan Gadekar यानी तसेच आकाश जाधवराव ब्राम्हणी यांनी मोलाची मदत व सहकार्य केले..
©अनिल दुधाने ........

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...