भोसले कुळाच्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थान ढवळून काढणारे महाबली महाराजा शहाजीराजे भोसले सरलष्कर. मराठा सरदारांना एकत्रित करून दिल्लीच्या तख्ताचे विस्तारवादी धोरण गुंडाळून तह करायला लावणारे देवगिरीच्या पाडावानंतर चे पहिले सामर्थ्यवान राजा .
#उत्तरेत_अकबर_दक्षिणेत_शहाजी ही म्हण रूढ झाली ती उगाचच नाही ,भातवडी युद्ध व त्यानंतर तीन वर्षे मुर्तुजा निजाम मांडीवर बसवून चालवलेले स्वराज्य , त्यानंतर ही ३/४ वर्षे नाशिक पासून भिमतटीचा प्रदेश महत्वाचे किल्ले मुघलांना ताब्यात घेण्यासाठी झुझंवले याबाबत शहाजहान बादशहा ने एक पत्र आदिलशहाला पाठवले करारात ठरले प्रमाणे विनातक्रार निजाममुलुख शहाजहानास हवाली कर शहाजी याने त्र्यंबक जुन्नर भागातील किल्ले अजुन ही निजाम वंशातील मुलगा पुढे करून स्वतः चे ताब्यात ठेवला आहे त्याने ते ताब्यात देईपर्यत त्याला तुझेकडे कामाला घेऊ नको , देण्यास नकार दिला तर विजापुरास प्रवेश देऊ नको , शहाजहान बादशहा याने शहाजीराजे भोसले यांचे सारखा मराठा आपल्या दिल्ली दरबारात ठेवून घेणे म्हणजे हातात विस्तव घेणे हे ओळखून आदिलशहाला दोघांचे मधील काही मुलूख बक्षीस देऊन शहाजीराजे यांची बदली कर्नाटकात जहागिरी देऊन दक्षिण प्रांतात करायला सांगितले . जेणे करून महाराष्ट्रात साम्राज्य विस्तारास अडचण येणार नाही, शहाजहान बादशहा शहाजीराजे यांचे विरूद्ध लष्करी कारवाई करायला टाळत होता हे यावरून शहाजीराजे यांची ताकद सहज लक्षात येते शहाजहान बादशहा शहाजीराजांना पुरता ओळखून होता, औरंगजेब शिवाजीराजांना ओळखुन होता, चुकला तो फक्त शिवपुत्रांना ओळखायला आणि इथल्या छत्रपतींच्या मावळ्यांना .
आदिलशहाने जिंती, इंदापूर , सुपा परगना कायम ठेवत पुणे परगना बक्षीस देऊन शहाजीराजे यांची मनधरणी केली (यावेळी श्रीगोंदा शेडगाव पेडगाव राशिन शिरूर पर्यंत चा काही भाग होता जो सिना- भिमानदीच्या मधला भाग मुघलांना द्यावा लागला) शहाजीराजांना फर्जंद ही पदवी देत कर्नाटक प्रांतात रवानगी केली , शहाजीराजे या़ंनी वेळ प्रसंगांचे भान ठेवून आपल्या परगण्यात आपले सरदारांन मार्फत व्यवस्था लावली आणि कर्नाटक प्रांती रवाना झाले .
शहाजीराजे यांनी आदिलशाही चा विस्तार दक्षिणेत खुप केला तेथील छोटे छोटे हिंदू राजे यांना जिंकून उध्वस्त न करता त्यांचेवर मायेची सावली धरली ठराविक खंडणी वसूल करून त्यांना सरंक्षण दिलं स्वतः ची लष्करी ताकद वाढवत त्यांना ही सुरक्षित केले जे मुस्लिम सत्ताधारी असे राज्य जिंकले की पुर्ण नासधूस करत होते शहाजीराजे यांचे या स्वभावामुळे पराक्रमी शहाजीराजे दरबारातील एक मातब्बर सरदार झाले , जिजाऊ व शहाजीराजे यांचे थोरले पुत्र संभाजीराजे राजे हे अफजलखान यांनी केलेल्या दग्याने युद्धात मारले गेले त्यांची पुढील पिढीची सोय लावताना भीमतटीच्या भागातील जिंती हा परगना बक्षीस देऊन केली जिथे आज हि शहाजीपुत्र संभाजीराजे यांचे वंशज राहतात .
शहाजीराजे यांनी शिवाजी राजे यांचे सर्व राजकीय, लष्करी असे प्रशिक्षण पुर्ण करून पुणे या जहागिरीत देखभालीसाठी या नावाखाली स्वतः चे स्वराज्याचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी पाठवले जे शिवाजी राजे यांनी पुर्ण केले . स्वराज्य उभा करण्यासाठी काय करावे लागते काय हवं असते वेळ प्रसंगी कसे निर्णय घ्यावे लागतात माणस कशी निवडावी लागतात १०% युद्ध सैन्य बळाने आणि ९०% बुद्धी ने अशा अनुभवांची माहीती असणारे शहाजीराजे यांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि त्याच अनुभवाचे बाळकडू शिवाजीराजे यांना पाजले ज्याचे प्रत्यक्ष अनुभव हे शिवाजीराजांचे मुघली आणि आदिलशहा चे सरदार यांचे विरूद्ध झालेल्या संघर्षात दिसुन येते " प्रतापगड च्या युद्धाचा वाघनखावर निर्णय झाला तर सैन्याचा तलवार खाली ठेवणाराला अभय आणि उचलणाराला शासन" इथे शहाजीराजे यांचे सैन्याला आपलेसे करण्याची सहिष्णू वृत्ती दिसते, सैन्याचा शहाजीराजा ,शहाजीराजाचे सैन्य याची अनुभूती येते, उंबरखिंडीची लढाई, स्वराज्य वाचवण्यासाठी मिर्झाराजे सोबत केलेला तह प्रसंगवधान शिकवते
अवघ्या हिंदोस्तानात असलेल्या परकीय सत्तांना आपल्या बलदंड बाहूत तोलणार्या महाबली महाराजा शहाजीराजे भोसले यांंचे जयंती निमित्त विनम्र अभिवादन
शब्दांकन - राहुल दोरगे पाटील यवत
No comments:
Post a Comment