विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 March 2023

कुतुबशाही च शेवटचा शासक अबू हुसेन

 





कुतुबशाही च शेवटचा शासक अबू हुसेन
postsaambhar ::aashish mali
हैद्राबाद मधील गोवळकोंडा किल्ल्यामध्ये मकबरा मध्ये सर्व झालेल्या 8 कुतुब सुलतान चे थडगे आहे , नाही फक्त शेवटच्या सुलतान अबु हसनच , तुम्हाला सापडेल ते महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये.किल्ले देवगिरी .
7 वर्ष शंभू महाराज शी लढून थकलेल्या औरंग्याने कुतुबशाही व आदिलशाही संपवली1687
अबू हसन विषयी इतिहासकार मध्ये मतभिन्नता आहे.काहीजण म्हणतात हा ऐय्याश दारुडा होता तर काही जण यास नकार देतात.
1672 मध्ये अबुलहसन कुतुबशाह मारताना सत्ता धाकटा जावई ला दिली.त्याला मूल नव्हते, तिन्ही मुली.
अबुल हसन कुतुबशहा ला तीन जावई होते.
1.दस्तुरखुद्द औरंगझेब चा मुलगा, मोहम्मद सुलतान, ज्याला औरंगझेबाने तुरुंगात टाकले.
2.सय्यद अहमद
3. शेवटच्या कुतुबशाह म्हणजे अबुल हसन 'ताना शाह'आणि याची कुतुबशाहीची अखेर झाली सन १६८७.
भद्राचालम मध्ये जे प्रचंड रामाचे मंदिर आहे ते अबुल हसन ह्या शेवटच्या कुतुबशाही सुलतान ने काही मदत केलेले.प्रत्येक राम नवमीला ह्या शेवटच्या सुलतान ने या मंदिराला मोठया भेटी दिल्यात.
ह्याचे कारभार त्याचे दोन ब्राम्हण सरदार च चालवत होते.आकन्न आणि
मादण्णा.अबू हसन शिया पंथाचा होता. धार्मिक कट्टर पण आजिबात नवहता. आणि त्याच मुळे औरंग्याचा नजरेत खटकायचा. 1687 मध्ये जेंव्हा औरंग्याने गोवळकोंडा ला वेढा आवळला तेंव्हा तह ची पहिली अट होती की आकन्न आणि मादण्णा यांची मुंडके छाटून हवे होते.मूळ कारण की ह्या दोघांमुळे कुतुबशाही आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्ये मधुर संबंध झालेले.
सन 1318 मध्ये खिलजी आणि तुघलक यांनी देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अंत झाला पण यांच्या उत्तराधिकारी मध्ये १३४३ मधील अनेक सुभेदार बंडानंतर या अमिरांनी हसन गंगू या त्यांच्यापैकीच एका सरदाराला राज्यपद दिले. त्यानंतर दख्खनमध्ये बहमनी सुलतान यांनी स्वतंत्र राज्य सन १३४७ सालात निर्माण केले. पण पुढील यांच्या मध्ये भांडणे होऊन नंतरच्या काळातच निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, कुतुबशाही, बरीदशाही, आणि फारूकशाहीची निर्मीती झाली.
त्यात भागा नगर म्हणाजे आताचे हैद्राबाद मध्ये कुतुबशाही वसली
गोवळकोंड्याचे कुतुबशाह सुलतान आणि त्यांचे राज्यारोहण
सुलतान कुली कुतुबशाह - सन १५१२
जमशीद कुतुबशाह - सन १५४३
सुभानकुली कुतुबशाह - सन १५५०
इब्राहिम कुतुबशाह - सन १५५०
महम्मद अली कुतुबशाह - सन १५८०
महम्मद कुतुबशाह - सन १६१२
अब्दुल्ला कुतुबशाह - सन १६२६
अबुलहसन कुतुबशाह - सन १६७२
ताना शाह ही पदवी त्याला सुफी संत सय्यद शाह रझिउद्दीन मुलतानी ने दिले.
'ताना शहा' म्हणजे लहान मूल जे संतासारखे आहे.
अबुल हसन हा सय्यद शाह राजू कतारी या संताला मानांणार होता.
छत्रपति संभाजी महाराज यांच्या नेतृत्व खाली मराठ्यांनी केलेल्या प्रतिकार मुळे औरंगझेब ल पाहिजे तसे यश मिळाले नाही त्यामुळे औरंगझेब ने कुतुबशाही कडे पाऊले वळवली. कुतुबशाही अबुल हसन हा जरी राज्य करी असला तरी राज्य खऱ्या अर्थाने दोन ब्राम्हण बंधू च चालवत होते. अकन्न आणि .मादण्णा.
आणि औरंगझेब ने एका पत्रात असा उल्लेख केला आहे.
ह्या कमनाशिबि माणसाने(अबुल कुतुबशाह) आपल्या राज्यातील सर्वोच्च सत्ता एका काफ़िराकडे (मादण्णा पंडित-ब्राह्मण)सोपविलि आणि सय्यद ,शेख आणि मुस्लिम धर्मपंडितांना त्याच्या आज्ञा पाळणे अवश्यक होऊन बसले.अल्लाने दिलेली आज्ञा आणि निषेधाज्ञा यांचे पालन करण्याचे टाळून, काफिर शासकांना मदत पाठवून आणि नुकतेच ""काफिर संभाला"" १ लाख होनांची मदत पाठवून राजाने अल्ला आणि प्रजेचा तिरस्कार संपादन केला आहे"(के.के. खंड २रा पान नं.३२८).
मादण्णा पंडित हा कुतुबशाहचा वजीर होता.औरंगजेबाने कुतुबशाह वर हल्ला केला आणि तहात अट घातली की मादण्णा आणि इतर ब्रम्हणांचा खून करुन त्यांची मुंडकि पाठवा.कुतुबशाहला आपले राज्य वाचविण्यासाठी असे करावे लागले (अ.हो.मो-मनूची.पृ.क्र.२७८,२७९,२८०).
मादण्णा आणि आकन्न याना मारून सुद्धा औरंगझेबाने 8 महिन्यात संपवले.
चे कुतुबशाही संपवली. त्याने अबुल हसन ला पकडून दौलताबाद उर्फ देवगिरी वर तुरुंगात ठेवले.12 वर्षानी अबुल हसन मरण पावला.
ज्या तोफेने औरंगझेबला कुतुबशाही आणि गोवळकोंडा संपवायला मदत झाली त्याने ती तोफ 'फतेह राहभर' गोवळकोंडाच्या पेटला बुरुजवर बसवली.
कुतुबशाही चे हैद्राबाद मधील मकबरा मध्ये सर्व झालेल्या 8 कुतुबशाही चे थडगे आहे , नाही फक्त शेवटच्या अबुल हसनाच
हे त्याचे आजही अपूर्ण असलेले थडगे
अबुल हसन औरंगाबाद मधील असलेले थडगे
संदर्भ
1.India under aurangzeb jadunath sarkar
2.HERitage of kutubshahi nayeem
3.sardesai

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...