विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 April 2023

मराठा सरदार अंताजी माणकेश्‍वर भाग ३



मराठा सरदार अंताजी माणकेश्वर
भाग ३
यथावकाश छ.शाहू महाराज सातार गादीवर विराजीत झाले अन् मग अंताजी हिन्दुस्थानातून देशावर दाखल झाला. त्यास महाराजांनी सातारला आपल्या महाली ठेऊन दोन गावांच्या जहागिरीसह संपूर्ण धर्मकार्याची जबाबदारी सोपवली. रोज अंताजी महाराजांचे ललाटी ‘गंध’ लावत होते. एक दिवस महाराजांना बाहेर मोहिमेवर जावयाचे होते. पण गंध लावले नव्हते महाराजांनी सेवेकर्यास विचारले ‘गंधे’ कुठे गेले? कुणालच काही बोध होईना. मग त्यांनी ‘अंताजी माणकेश्वर गंधे’ असा संपुर्ण उल्लेख केला आणि तेव्हा पासून ‘जोस-कुलकर्णी’ जाऊन ‘गंधे’ हे उपनाम रुढ झाले. महाराजांनी अंताजीच्या लेखणी, वाणी व तलवार कर्तबगारीवर खुष होऊन त्यांना पुणेस श्रीमंत पेशव्यांकडे स्वत:चे खास म्हणून नेमणूक केली. पुढे पेशवेंनी पंडेपेठ वडगांवला 24 गांवाची (वडगांव, अबदूब, अ.नगर,नागापूर, पिंपळगाव कौडा, निमगाव वाघा, पारनेर, हंगे इ.) जहागिरी बहाल केली. तेथेही अंताजीने उत्तम कामगिरी केली. परंतू छत्रपतींच्या मर्जीतला म्हणून पेशव्याकडील अनेकांनी त्यांचेवर सातत्याने आरोप केले. कार्यतत्परतेपुढे अंताजीवरील कोणतेही आरोप सिध्द होऊ शकले नाहीत. छत्रपती शाहू राजे, भगवान शंकर आणि मराठा राज्यावरील दृढ निश्चय यापुढे अंताजीने कुणाला आणि कशालच जुमानले नाही. स्वत:च्या हिमतीवर तो छत्रपतींच्या आदेशाने हिन्दुस्थानात इंद्रप्रस्थास (दिल्ली) मुत्सद्दी सरदार म्हणून नियुक्त झाला. अटकेपार अंताजीच्या मुत्सद्देगीरीने मराठ्यांची कामगिरी पोचू शकली. पंडे पेठ वडगांव परगण्यापासून दोन कोसावर त्यांनी जोस-कुलकर्णी वस्ती वसवली. मोठा वाडा व भाऊबंद, सहकारी यांचे साठीही काही वाडे बांधले. संपूर्ण वसतीला तटबंदी केली. आई कामाच्या दृष्टांतामुळे तांदळा पूजून वस्तीचे नामकरण कामाख्या (कामाक्षी) वरून कामरगावं केले व तेथून सर्व कारभार सुरू केला. अबदूब (सैन्याचे विश्रांती स्थळ), राशिन येथील यमाई देवी मंदिर, हंगेश्वर, निमगांव वाघा (चास) चे मंदिर, अ.नगर, पानिपत, दिल्ली येथील वाडे, कामरगावं येथील प्रसिध्द काशिबाईची बारव आर्दिची निर्मिती अंताजीने केली व एक मोठा ऐतिहासिक वारसा भावी काळासाठी ठेवला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...