विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 April 2023

मराठा सरदार अंताजी माणकेश्‍वर भाग ४

 



मराठा सरदार अंताजी माणकेश्वर
भाग ४
महत्वाचे टप्पे
1) श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांकडून ‘गंधे’ हे नामाभिधान व सरदारकी प्राप्त.
2) श्रीमंत नानासाहेब पेशवेंकडून 24 गावांची जहागिरी.
3) छ. शाहू महाराजांकडून हिन्दुस्थानात विशेष मुत्सद्दी म्हणून नियुक्त.
4) काही काळ अहमदनगर किल्ल्याचा ताबेदार.
5) माळवा प्रांतात महंमदशहा बंगश (1729) बरोबर मराठ्यांचे बाजूने लढत.
6) दिल्लीत बादशहा अहमदशहा व वजीर सफदरजंग यांच्यातील युध्दात मराठ्यांतर्फे अंताजीवर मोठी कामगिरी व बादशहास मदत करून सफदरजंगाचा पराभव.
7) 1753 मध्ये अहमदशहा बादशहाने अंताजी माणकेश्वराचे कामगिरीवर फिदा होऊन त्यास सप्तहजारी मनसबदार केले. साहेब नौबत म्हणून सुवर्णाक्षरातील फर्मान काढून दिले.
😎 1755- जयपूर सेनापती अनिरूध्द सिंग व मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांच्या युध्दात शिंदेच्या पाठीशी उभे राहून अनिरूध्दासिंगाचा दारूण पराभव केला.
9) 1757- अहमदशहा अब्दाली विरूध्दच्या लढाईत उत्तम कामगिरी परंतू अब्दालीच्या मोठ्या फौजेपुढे अंताजी निष्प्रभ. मात्र हिन्दुस्थानातील राजकारणात अंताजीचे स्थान वरचढ. छत्रपतींच्या मर्जीतील म्हणून पेशव्यांचे निष्ठावान वकिल सरदार हिंगणे यांनी सहन न होऊन अंताजी विरूध्द कट कारस्थान सुरू केले.
10) 1758- अंताजी पुण्यास श्रीमंत सदाशिव भाऊंकडे आले. त्यावेळी उत्तरेतील इटावा, फुपुंद, मेरठ, महाल वगैरे प्रांत अंताजीचे ताब्यात होते. कटकारस्थानामुळे ते सरदार हिंगणेकडे सुपूर्द.
11) 1759- अंताजीवरील सर्व आरोप चौकशीअंती खारीज करून सदाशिव भाऊंकडून अंताजीस निर्दोष घोषीत व सर्व प्रांत पुन:श्च ताब्यात दिले.
हिंगणेंच्या अव्यवस्थ कारभाराला पेशव्यांकडून खारीज.
12) 1760- पुन:श्च अंताजीस सन्मानाने दिल्लीस नियुक्त केले. तिथे अंताजीने कारभारासाठी वाडा बांधला. (सध्या त्याठिकाणी प्रसिध्द राम मनोहर लोहिया हौस्पिटल आहे.)
13) अटकेपार जाण्यासाठी पानिपत (हरयाणा) येथे चौकी बांधली.
14) 1761- अब्दाली बरोबर तीसरे व शेवटचे पानिपत युध्द. सरदार दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजी हरि, सरदार पवार, सरदार साबळे, सरदार विंचुरकर, पुरंदरे यांचे बरोबरीने अंताजीची मोठी कामगिरी. मात्र अंतीमक्षणी कडाक्याच्या थंडीत जी पळापळ झाली त्यात मराठे हरले. काही पळाले आणि सुमारे एक लाख मराठे वीर मारले गेले. मराठ्यांचे दुदैवाने पानिपत झाले. अंतीम क्षणापर्यंत अंताजी लढत लढत दिल्लीच्या वाटेवर होता.
15) 17 जानेवारी 1761 पानिपतहुन दिल्लीकडे परताना थकलेल्या अंताजीवर पहाटे फारूकाबाद येथे हल्ला. तिथेही निकराची झुंज व अखेर त्यातच वीर मरण. (हा हल्ला चुकून अंताजीवर झाला. हल्लेखोरांना दुसर्या कुणास मारायचे होतं याची जबानी नोंद त्यावेळच्या दप्तरात लिहीली गेली.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...