विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 April 2023

करवंड येथील इंगळे यांची पुरातन गढी आणी इंगळे यांची थोडक्यात माहीती

 




करवंड येथील इंगळे यांची पुरातन गढी आणी इंगळे यांची थोडक्यात माहीती
करवंड ता.चिखली ,जि.बुलढाणा हे इंगळे यांचे मुळ गाव हे घराणे शिवपुर्व काळापासुन होते ..
आदीलशाहीमधे ऐक वजनदार घराणे म्हणुन हे नामांकीत होते... शाहजीराजे सोबत ह्या घराण्यातील मातब्बरांनी बर्याचदा तलवार गाजवली आहे...
यांच्यात सरदार शिवाजीराव इंगळे,बहीरजी नाइक इंगळे, कात्याजी/काटुजी इंगळे हे स्वराज्यसेवेत शिवरायासोबत होते... अफजलखान भेटी दरम्यान यांनी पराक्रम गाजवला आहे..
या घराण्यातील गुणवंताबाईसाहेब ह्या शिवरायांच्या पत्नी होत्या तर दीपाबाईसाहेब ह्या व्यंकोजीराजेच्या पत्नी होत्या...
ही इंगळे सरदार मंडळी शहाजीराजे, शिवराय आणी शाहुकाळात भारतभर विखुरली आहे दक्षिणेत तंजावर तर उत्तरेत ग्वाल्हेर, ऊजैन पर्यंत यांच्या शाखा आहेत... महाराष्ट्रात करवंड ह्या मुळगांवी आणी खामगाव जवळ राहुळ,पिंपरी देशमुख, सुजातपुर,हीवरा, निमगाव ह्या जागी यांचे वास्तव्य आहे .. अमरावती अकोला भागात ही यांच्या शाखा आहेत... तसेच पुणे भागात म्हाळुंगे इंगळे, निळंज, वाळुंज येथे यांच्या शाखा आहेत, कोल्हापुर भागातही यांचे वास्तव्य आहे ...
यांना जंगबहाद्दुर ही पदवी , देशमुखी, पाटीलक्या, सरदारक्या मिळालेल्या दीसुन येतात...
मोहन ठाकरे देशमुख

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...