विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 April 2023

#येल्या_मांग

 




#येल्या_मांग
🙏 प्रवीण भोसले सर यांचे utube channel Varun ......
#बाजी_पासलकर यांचे अंगरक्षक...
बाजी पासलकर शूर देशमुख होते (देशमुख हे पद होते) यांच्या कडे यशवंती नावाची घोडी ,गजली नावाची तलवार, अजगर नावाची ढाल होती या अत्यंत दुर्मिळ अश्या वस्तू होत्या ...बाजी पासलकर परोपकारी होते ...
त्यांनी #आनंत_खर्चूले या शिंपी समुदायातील अनाथ मुलाला आपल्या घरी सांभाळले होते ..#खंडया_महार आणि
#येल्या_मांग हे दोन शूर अंगरक्षक होते ...
गाईच्या गोठ्यात जन्म झाल्याने त्यांचे नाव गोठे पडले होते ...यल्लजी शंकर गोठे हे त्यांचे पूर्ण नाव ...जावळीचे मोरे यांनी बाजी पासलकर यांच्या कडे असलेली यशवंती घोडी मिळवण्यासाठी हल्ला केला होता ...त्यात येल्या मांग आणि आनंत शिंपी यांनी अतिशय शूर पणे लढून हा हल्ला परत लावला होता ...मोरेने 500 लोक पाठवले होते ..या सगळ्यांशी हे दोन शूर वीर लढले ..बाकी सैन्य लढत असताना येला मांग यांच्यावर घोडा घालण्यात आला त्या हल्ल्यात एक हाताने तो हल्ला रोखून हल्ला केलेल्या माणसाचे मुंडके कापून बाजी यांना भेट पाठवून दिले होते ..
यातून हे किती बलवान होते हे लक्षात येते ..
1648 साली विजापूर हुन चालून आलेल्या आदिलशाही सैन्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याने सासवड जवळ खळद बेलसर या गावी अचानक छापा घालून मोठा हल्ला केला ..
ही लढाई शत्रू बरोबर झालेली उघडपणे पहिली लढाई मानली जाते ...या लढाई मध्ये बाजी पासलकर धारातीर्थी पडले ...त्यांची समाधी सासवड ला आहे .
पण त्याच सोबत #येल्या_मांग यांची सुद्धा समाधी आहे पण ती समाधी एक निमुळत्या गल्लीत एक इमारतीच्या तळाशी अतिशय दुर्लक्षित पणे आहे ..स्थानिक व्यापारी लोकांना यांच्या बद्दल माहिती आहे ...
पुढच्या पिढीला ही समाधी माहिती असेल का नाही माहिती नाही ...पण स्वराज्य साठी असे अनेक शूर वीर लढले ..शिवराय त्यांच्यासाठी विश्वास होता ..
कधी गेलात या बाजूला तर स्वराज्यातील पहिल्या लढाईमधील या पहिल्या वीराला नमन नक्की करा ...🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...