विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 April 2023

सरनोबत नेताजी पालकर यांचा माहित नसलेला इतिहास

 


सरनोबत नेताजी पालकर यांचा माहित नसलेला इतिहास
लेखन :डॉ विवेक दलावे पाटील
३ एप्रिल १६८० रोजी थोरल्या महाराजांचा काळ झाला.. तेव्हा नेतोजीराव पालकर हे तळकोकण प्रांताचे सुभेदार होते. आणि चिपळूणच्या मोहिमेवर होते.महाराजांच्या निधनानंतर त्यांनी रायगडाचा वेढा फोडून काढला व फितुर किल्लेदार राहुजी सोमनाथ यांना कैद केले.
इ. स.१६८० साली नेताजीरावांना छत्रपती संभाजीराजांनी बागलाण प्रांताचे सुभेदार म्हणून नेमले.
१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये ते उपस्थित होते.
३० जानेवारी १६८१ रोजी त्यांनी रामशेज पासून जवळ सुरतेकडे जाणाऱ्या बहादूरखानाची वाट अडवली. व त्याचा दारूण पराभव केला.
जून १६८२ पर्यंत बागलाण प्रांताचे सुभेदार असताना नेताजीबाबांनी रामशेज किल्ल्यावर रसद पोहोचवायची कामगिरी बजावली. त्यामुळे किल्लेदार सुर्याजी जेधे व मावळ्यांनी शेवटपर्यंत रामशेज किल्ला हा औरंग्याविरुद्ध अजिंक्य राखला.
ऑगस्ट १६८२ साली छत्रपती संभाजीराजांनी नेतोजीबाबांना नांदेड प्रांताचे सुभेदार बनवले. शिवाय तामसा हदगाव येथील ५५ गावांची जहागिरी त्यांना दिली. व राजे किताब बहाल केला.
नोव्हेंबर १६८२ मध्ये नेताजीबाबांनी रायबागण या स्त्री सेनानीच्या फौजेचा धुव्वा उडवला.
मे १६८३ रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी सुभेदार नेताजीराजे पालकर यांना माघारी बोलावले. व इंदापूर परगण्याची जहागिरी दिली. तेव्हापासून इ. स.१६८९ पर्यंत ते इंदापूरचे जहागीरदार होते.
१० फेब्रुवारी १६८९ साली नेताजीबाबांनी वयाच्या ६९ व्या वर्षी बहादूरगडावर हल्ला चढवला. व छत्रपती संभाजीराजे यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
२३ मार्च १६८९ साली छत्रपती राजारामराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये प्रतिशिवाजी नेतोजीबाबा पालकर जातीने हजर होते.
तिथून पुढे ४-५ महिने नेताजीराजे औरंग्याच्या वढू तुळापूर येथील छावणीवर घिरट्या घालून हल्ले चढवत होते.
जानेवारी १६९० मध्ये छत्रपती राजारामराजांनी नेताजीराजे पालकर यांना पुन्हा नांदेड प्रांताचे सुभेदार बनवले. व नांदेडमध्ये पाठवले.
इ. स.१६९० साली वयाच्या ७० व्या वर्षी नांदेड प्रांतातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे इतिहासातील प्रतिशिवाजी सरनौबत सरसेनापती नेतोजीराव पालकर यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...