इ.
स.१६७४ आधी "अमात्य" या पदाला "मुजुमदार" असे म्हणले जात होते. छत्रपती
शिवरायांनी राज्याभिषेक सोहळ्यानंतर अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. व
त्यात मुजुमदार या पदाला "अमात्य" हे नाव दिले.
"बाळकृष्ण पंत" हे हिंदवी स्वराज्याचे १ ले मुजुमदार (अमात्य) होते. त्यांचा कार्यकाळ इ. स.१६४३ ते १६५९ इथपर्यंत आहे.
त्यानंतर इ. स.१६५९ साली "मोरोपंत पिंगळे" यांची मुजुमदार पदी नियुक्ती केली. इ. स.१६६२ पर्यंत ते मजुमदार राहिले.
पुढे
इ.स.१६६२ साली महाराजांनी "नीळकंठ सोनदेव बावडेकर" यांनाामजुमदार हे पद
दिले. " नीळकंठपंत मुजुमदार यांचे इ. स.१६७३ साली निधन झाले. तेव्हा
त्यांचे थोरले पुत्र "नारो निळकंठ बावडेकर" यांना "मुजुमदार" पद बहाल केले.
त्यानंतर इ. स.१६७४ साली अष्टप्रधान मंडळात "रामचंद्र नीळकंठ बावडेकर" यांना हिंदवी स्वराज्याचे १ ले अमात्य पद बहाल केले.
म्हणजे "बाळकृष्ण पंत" हे हिंदवी स्वराज्याचे १ ले "मुजुमदार" तर "रामचंद्रपंत अमात्य" हे हिंदवी स्वराज्याचे १ ले "अमात्य" आहेत.
मुजुमदार व अमात्य यांचे कार्य एकच आहे.."स्वराज्याचा जमाखर्च पाहणे."
No comments:
Post a Comment