तर हट्टाला पेटला होता. काहीही झाल तरी त्याला शाहूंच धर्मांतर करायचं होत,तो त्या साठी कुठल्याही ठरला जाऊ शकत होता.अशा वेळी येसुराणी सुद्धा आता बुद्द्धीने डाव टाकू लागल्या.झुल्फिकार खानाला त्यांनी धारेवर धरल.झुल्फिकार खानने कैद करत असताना वचन देऊन शाहूंच्या सुरक्षेची जबबदारी घेतली होती.वाटाघाटी चालू झाल्या,वकील सज्ज झाले, झुल्फिकार खान आणि झिनत बेगम च्या समजुतीने औरंगजेबाने शाहूंच धर्मांतर करायचा विचार बदलला.पण शाहूंच धर्मांतर झाल नाही तर औरंगजेबाची इज्जत राहणार न्हवती कारण त्यांनी त्याच्या फौजेत सर्वत्र शाहूंना बाटवण्या बद्धल सांगितल होत.शाहू राजाचं धर्मांतर केल नाही तर औरंगजेबाची मान,इज्जत आणि दरारा यावर प्रचंड परिणाम होणार होता.शेवटी स्वताची अब्रू वाचावी,त्याच्या प्रतिष्ठेला धोका पोहचू नये म्हणून त्यांनी एक अट घातली होती. शाहूंच्या ऐवजी कोणी तरी शाहूंच्या राजपरिवारातील आणि मात्तब्बर अशे दोघांनी धर्मांतर करायचं.त्यामुळे शाहू राजे तर संकटातून वाचणार होते आणि औरंगजेबाची अब्रू सुद्धा वाचणार होती.
सारे मराठा सरदार चिंतेत पडले.राज कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचं वातावरण दिसू लागलं.कोण देणार राजांसाठी धर्माच बलिदान? कोण स्वीकारणार इस्लाम? सारे चिंतेत होते. सर्वांनाच आपला धर्म प्यारा होता. शाहुराजांसाठी धर्माच बलिदान द्यायला मावळे तयार होते,पण आलमगीराला मात्र घरातील व नात्यातील कोणाच तरी धर्मांतर करायचं होतं.
शहाजीराजांन पासून चालत आलेला भोसले घराण्याचा हा पराक्रमी वारसा,हे तेजस्वी रक्त युद्धात जिंकण शक्य नव्हतं म्हणून मोगलांनी धर्मांध सत्ता गाजवत ते भोसले कुलसंपन्न रक्त बाटवण्याचा केलेला हा प्रयत्न होता आणि तो सुद्धा अयशस्वी ठरला होता.देव देश अन धर्मासाठी जगणारी लोक भारतभूमीत होतीच,पण आता सर्वांत पुढे मोठा प्रश्न होता राज परिवारातील कोण धर्म बदलणार? कोण देणार शाहूंना धार्मिक स्वातंत्र्य?
सर्वांचे घाबरलेले चेहरे एकमेकांकडे आशेने पाहत असताना दोन भावंडं समोर आली,ती सांगू लागली “राणीसाहेब आम्ही होता मुस्लिम,राजांना या संकटातून सुखरूप सोडवतो”
कसलेल्या शरीराची ही मुलं कोण होती?
थोरला होता खंडोजी गुजर अन धाकला जगजीवन गुजर, नात्याने शाहुराजांचे मामाच लागत होते. रक्ताचं नातं होतं, राजाराम महाराजांच्या पत्नी जानकी बाई यांचे हे भाऊ होते. हे दोन्ही मराठे वीर आपल्या राजासाठी धर्माच बलिदान देणार होते.
प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला माफी दिली आणि महाराजांनी चिडून प्रतापराव गुजर यांना सांगितलं “तो बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका”. चिडलेल्या प्रतापरावांनी नेसरीच्या खिंडीत आपल्या सात साथीदारांसह दुष्मनाच्या पंधरा हजाराच्या तुकडीवर हल्ला चढवला आणि त्यात ते धारातीर्थी पडले. त्याच प्रतापराव गुजरांच साहशी रक्त अंगात खेळत असलेले हे प्रतापराव गुजर यांचे पुत्र शाहू राजांसाठी धर्माच बलिदान देणार होते प्रतापरावांचा तोच स्वाभिमानी,स्वमिनिष्ठा,पराक्रमी,तेजस्वी वारसा चालवत या बंधूंनी संताजी घोरपडे यांच्या सोबत संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली मोघलांना पाणी पाजलं होतं पण नियतीने त्यांनाही रायगडावरून राज कुटुंबासह कैद घडवली होती.राजाराम महाराजांच्या पत्नी जानकी बाई यांचे भाऊ असल्याने शाहूंचे मामा म्हणून त्यांच्या धर्मांतराला औरंगजेबानं मान्यता दिली आणि शाहूंच्या डोक्यावरील धर्मांतराच संकट टळलं. शाहू राजे सतरा वर्षे कैदेत होते पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहिले तेव्हा मराठ्यांनी आपल्या राजांची मान खाली पडू दिली नाही.आपल स्वामीनिष्ठ रक्त राजांच्या चरणावर वाहिल आणि या बलिदानातून शाहूंचा राज्य विस्तार यांचा विचार अधिक बलशाली होऊ लागला.एका शुभमुहूर्तावर औरंगजेबानं खंडोजी आणि जगजीवन यांची सुंता करून त्यांना अब्दुल रहीम आणि अब्दुल रहमान बनवल. खरं तर ही गोष्ट सर्व मराठ्यांसाठी शरमेची होती पण औरंगजेब खुश होता त्याच्या तरी मनात कुठेतरी एक सल होती की त्याच्या मरणापर्यंत त्याला टोचत होती की युद्धा तर नाहीच पण धर्मांतरात सुध्दा तो मराठ्यांना हरवू शकला नव्हता.
संदर्भ- १)पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू-गणपतराव साळुंखे
२)मोगल दरबाराची बातमीपत्र भाग 3-सेतू माधव पगडी.

No comments:
Post a Comment