विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

#शाहूराजांचा_साताऱ्यावर_कब्जा. #स्वामिनिष्ठ_परशुराम_प्रतिनिधी.

 



#शाहूराजांचा_साताऱ्यावर_कब्जा
.
मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू राजांनी ताराराणी सोबत संघर्ष करत,एक एक किल्ला ताब्यात ग्यायला सुरवात केली.शाहू राजे संभाजी राजांचे पुत्र असल्याने शाहू राजांनी कोणाकडे मदतीची अपेक्षा केली तर कोणी नाही म्हणू शकत न्हवते.स्वराज्य निष्ठा हा गुण मराठ्यांकडे होता त्यामुळे छत्रपती संभाजी पुत्र असल्याने शाहू राजांबद्धल प्रचंड प्रेम रयतेच्या मनात होतं. शाहू राजे स्वराज्याचे धर्मानुसार वारस होते त्यामुळे अनेक मोठे मराठे सरदार त्यांना मिळाले.शाहू राजांनी सातारा कडे आक्रमण केले आणि ताराराणींनी आपली राजधानी सातारा वरून कोल्हापूर ला पन्हाळा किल्ल्यावर नेली.
शाहू राजांनी सातारा ग्यायचा विचार मांडला तेव्हा कोणालाच खात्री न्हवती की किल्ला सहज हातात लागेल,औरंगजेब कित्येक वेळा चाल करून आला होता पण किल्लेदार परशुराम पंत प्रतिनिधी यांनी चिवट प्रतिकार केला होता.शाहु राजांची राज्यावरील पकड घट्ट झाल्याची पाहून ताराराणींनी किल्ला प्रतिनिधींच्या ताब्यात दिला आणि त्या आपल्या मुलांसह कोल्हापूर ला गेल्या होत्या.
सातारा परिसरात प्रवेश करताच शाहू राजांनी किल्ला ताब्यात द्यायचं पत्र प्रतिनिधींना पाठवलं होतं.किल्ल्यावर शेख मीरा नावाचा हवालदार होता.वाईचा राहणारा असल्याने वाई आधी ताब्यात घेतली.शेख मीरा चांगला प्रतिकार करत होता.त्याला किल्ल्याच्या चाव्या देण्यासंबंधी पत्र पाठवली होती पण तो किल्ला सोडायला तयार न्हवता.शेवटी शाहू राजांनी शेख मीरा यांचा कुटुंब कबिला आणि नातेवाईक वाई मध्ये सापडतील तेवढे उचलून आणले.
किल्ला ताब्यात दे नाहीतर कुटंब कबिला तोफेच्या तोंडी देईल म्हणून तंबी दिली.कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी शेख मीरा किल्ला ताब्यात द्यायला तयार झाला परंतु त्याची परशुराम पंतांवर निष्ठा होती.परशुराम पंत किल्ला देण्यास कशेच तयार न्हवते.
शेवटी शाहू राजाकडून शेख मिराने 'मागेल ते द्यावं लागेल' अस वचन घेतलं आणि दगा करून प्रतिनिधींना कैद केलं. किल्ला शाहू राजांच्या ताब्यात आला.शाहू राजांसोबत लढायची तयारी मराठा सरदारांची न्हवती.एका अनुकूल परिस्थितीत आयुष्याची सतरा वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहून शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाबद्धल मराठा सैन्यात प्रचंड आदर होता.शाहू राजांवर चालून जायची हिम्मत मोठयात मोठ्या सरदाराची सुद्धा होत न्हवती.राजाने नीती सोडली तरी त्याच्या विरोधात उठाव करणं मराठ्यांच्या शीलाला शोभणार न्हवत त्यामुळे ताराराणींच्या विरोधात शाहू राजांना सहकार्य करणं हा राजद्रोह न्हवता.परशुराम प्रतिनिधी यांच्यासारखे काही निष्ठावंत होते त्यांना मन जड करून नाईलाजाने कैद करावी लागली.
सातारा किल्ला ताब्यात घेतल्यावर दरबार भरवला आणि दरबारात शाहू राजांनी शेख मिराला 'काय मागेल ते देईल' म्हणून वचन दिलं होतं त्यानुसार काय पाहिजे ते मागायची विनंती केली.
शेख मीरा स्वामीभक्त हवालदार होता त्याने विनंती केली की,
'माझे धनी परशुराम पंत यांना सोडावे आणि त्यांचा योग्य मान सन्मान करावा'.
शेख मीराची ही मागणी ऐकून सगळेच आश्चर्य चकित झाले.शाहू राजांना सुद्धा प्रतिनिधी सारखा मुत्सद्दी हवाच होता.
शाहू राजांनी परशुराम प्रतिनिधी यांना बोलावून घेतलं.शेख मीराची मागणी त्यांच्यापुढं मांडली. शाहूंना सामील व्हायचा प्रस्ताव मांडला पण त्या कडव्या स्वामिनिष्ठ आणि नेकदिलं प्रतिनिधी ने शाहू राजांना उत्तर दिलं,
"शेख मीरा ने जे मागितलं ते त्याच्या सेवक धर्मास अनुसरून होत,परंतु मला माझ्या धन्याशी नरक हरामी करता येणार नाही,मी मरण पत्करेल पण तत्व सोडणार नाही".
परशुरामपंत प्रतिनिधी यांची स्वामिनिष्ठ पाहून शाहू राजांना आश्चर्य वाटलं.मोठ्या पदावर शाहू राजे प्रतिनिधींना ठेवत होते,पण त्यांनी ते स्वीकारलं नाही शेवटी शाहू राजांनी परशुराम प्रतिनिधी यांना सातारा किल्ल्यावर कैदेत ठेवलं.
विश्वास शब्दांद्वारे प्रकट करता येतो परंतु विश्वासपात्रता आचरणातून सिद्ध होते.
संदर्भग्रंथ0- पुण्यश्लोक थोरले शाहू महाराज (सातारा)

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...