तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
एरवी पेशवाईचे
कठोर टीकाकार असलेल्या शेजवलकरांनीही हे कबूल केले आहे, ""मराठ्यांचा
दिल्लीच्या बादशहाच्या छत्राखाली हिंदू-मुसलमानांचे संयुक्त साम्राज्य
चालविण्याचा प्रयत्न हाच सर्वांच्या हिताचा होता. अब्दालीस आठवण
राहण्यासारखे तोंड मराठ्यांनी पानिपतास दिले. याचा परिणाम त्याने दिल्लीचे
नाव कायमचे सोडून देण्यात झाला. एवढेच नव्हे, तर भाऊसाहेबाच्या बोलीप्रमाणे
पंजाब मराठ्यांकडे ठेवल्यास तो जो राजी नव्हता, त्याला अखेर तो प्रांत
शिखांच्या स्वाधीन करणे लवकरच भाग झाले. शीख धर्मवेडे व शूर असल्यामुळे
त्यांना ते राज्य आपल्या ताब्यात आणता आले हे खरे; पण मरानी अब्दालीस याद
राखण्याची तंबी पोचविली असल्यानेच शिखांचा उदय सर झाला, हे इतिहासास विसरता
येत नाही.''
शिखांच्या
धर्माची प्रेरणा त्यांनी संत नामदेव नावाच्या मराठी माणसाकडूनच घेतली, हे
सर्वज्ञात आहे. नामदेवांची पन्नासावर कवने आपल्या पवित्र गुरुग्रंथसाहेब या
ग्रंथात समाविष्ट करून व नामदेवांच्या नावाचे कितीतरी गुरुद्वारे उभारून
शिखांनी त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता हातचे काहीही न राखता व्यक्त
केलेली आहे; परंतु शिखांच्या राजकारणाचा उगमही मराठ्यांच्या राजकारणात आहे,
या वस्तुस्थितीची नोंद गंभीरपणाने घेतली गेलेली दिसत नाही.
No comments:
Post a Comment