विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

#शाहू_राजांच_धर्मकार्य #दक्षिणकाशी_संगम_माहुली

 


#शाहू_राजांच_धर्मकार्य
छत्रपती थोरल्या शाहूंच्या दरबारात प्रधाना इतकंच महत्वाचं पद आणि मानसन्मान पंतप्रतिनिधी यांचं होत.कुठल्याही महत्वाच्या सनदेवर शाहू राजे,प्रधान आणि पंतप्रतिनिधी यांचा शिक्का उमठवल्या शिवाय तो कागद खरा मानला जात न्हवता.शाहू राजांची श्री निवास परशराम प्रतिनिधी यांच्यावर तर विशेष मर्जी होती.श्री निवास यांनीं राजांची मर्जी आपल्या चांगल्या कामातून मिळवली होती.ते शाहू राजांशी अतिशय सलगीने वागायचे.श्री निवास प्रतिनिधी यांनी कोणत्याही कामाचा अर्ज केला की शाहू राजे मोठ्या विश्वासाने त्याला मंजुरी द्यायचे.शाहू राजे श्री निवास प्रतिनिधी यांना राव अस म्हणायचे.प्रतिनिधी रोज शाहू राजांच्या मुजऱ्याला यायचे.शाहू राजांच्या दरबारातील मोहिमेला गेलेलं सोडून बाकी सर्वांना राजांच्या मुजऱ्याला दरबारात यावे लागायचं.नेमकं एक दिवस प्रतिनिधी यांना यायला खूप उशीर झाला.
सगळ्या कारभारी,सरदार लोकांचे मुजरे झाले आणि शाहू राजांच्या लक्षात आलं श्रीनिवास प्रतिनिधी अजून आले नाहीत.घटकाभर शाहू राजांनी वाट पाहिली,श्री निवास प्रतिनिधी यांची कमतरता जाणवू लागली.राजांनी दरबार सोडला आणि शाहू राजे थेट प्रतिनिधी यांच्या वाड्यावर जायला निघाले.
इकडं प्रतिनिधी यांच्या डोक्यात वेगळी विचारचक्र फिरत होती.त्यांना वाटायचं छत्रपती शाहू राजांच्या राज्यात धर्म आणि अन्नछत्र असायला पाहिजे.सकाळ पासून ते त्या साठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कोठून करता येईल त्यावर अभ्यास करत होते.त्यांनी जवळजवळ 3 लक्ष रुपयांची तरतूद होईल असा आराखडा म्हणजे आजच्या भाषेत अर्थसंकल्प बनवला होता.
शाहू राजे तडक प्रतिनिधींच्या वाड्यावर आले तस राजांना पाहून प्रतिनिधी धोतर सावरत तरफडून उठले,मुजरा झडला आणि सकाळपासून केलेल्या कामाची यादी महाराजांच्या हातात दिली.शाहू राजांनी एक वेळ प्रतिनिधी यांच्याकडे पाहिलं आणि एक वेळ त्या यादीकडे पाहिलं.प्रतिनिधी यांना वाटलं की महाराज खुश होतील पण शाहू राजांनी ती यादी फाडून टाकली आणि काहीही न बोलता आले तसे थेट पालखीत बसून आपल्या राजवाड्यात परतले.
श्री निवास प्रतिनिधी पुरते घाबरून गेले.त्यांच्या मनात विचार आले की स्वामी माज्यावर नाराज आहेत,त्यांची माझ्यावरील मर्जी पहिल्यासारखी राहिली नाही.कसलीच चूक नसताना शाहू राजे काही न बोलता आले तशे गेल्याचे प्रतिनिधी काळजीत पडले.मोठ्या धाडसाने ते थोड्या वेळांनी राजांच्या महालात आले.
शाहू राजांना मुजरा केला आणि आपल्याकडून काही चुक झाली का म्हणून विचारायला लागले तेव्हा शाहू राजांनी त्यांना सांगितलं.
राज्यात धर्मदाय काम व्हावी ही गोष्ट तुमच्या मनात आली ती चांगली आहे पण फक्त 3 लक्ष रुपयांची यादी केली म्हणून ती फाडली.याउलट राज्यात शाहू राजांनी स्वतः 18 लक्ष रुपयांची धर्मदायी व अन्नछत्र यांची यादी बनवली ती प्रतिनिधी यांच्या ताब्यात दिली.त्यातली 9 लक्ष रुपये देव ब्राम्हण, धर्मदाय आणि अन्नछत्र आणि 9 लक्ष रुपये प्रतिनिधी यांच्या ताब्यात महाली मूलखी करून देऊन योग्य विल्हेवाट लावायला सांगितली.
प्रतिनिधींनी नी देवब्राम्हण आणि अन्नछत्र यांना 9 लक्ष रुपये वाटून इनाम दिले. उरलेलं 9 लक्ष स्वतः कडे ठेवले.अचानक कोणी गरजू आला तर त्याच्या देवालयाला किंवा अन्नछत्राला देण्यासाठी त्या 9 लक्ष रुपयांचा वापर केला जाऊ लागला.शाहू राजांनी पुढं प्रतिनिधी यांचं प्रामाणिक काम पाहून त्यांना शके 1720 ला संगम माहुली हे गाव दिल. (महाराज एका शुभ मुहूर्तावर संगम माहुली घाटावर अंगोळीला गेले पण नेमकं तिथं मंत्र म्हणायला ब्राम्हण न्हवते,तेव्हा श्रीनिवास प्रतिनिधी यांनी मंत्र म्हणले त्याची दक्षिणा म्हणून शाहू राजांनी संगम माहुली प्रतिनिधी यांना दिली अस पण सांगितलं जात)
तिथं देव ब्राह्मण लोकांना घर बांधायला जमिनी दिल्या आणि त्या ठिकाणला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाऊ लागले.
अशे शाहू राजे धर्मकार्याबाबत छत्रपती शिवाजी राजांची सावली होते. महापुण्यवान,दानशूर,धार्मिक जणू राजा कर्ण सारख शाहू राजांनी दान धर्म केले होते.शाहू राजा यानंतर कोणीच मराठा सम्राट एवढा दानशूर जन्माला आला नाही.
संदर्भ-शेडगावकर भोसले यांनी बखर
उपाध्यक्ष पुणे जिल्हा मराठा महासंघ इतिहास परिषद

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...