तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
एरव्ही
अब्दाली हिंदुस्थानवर पुन्हा हमला करण्याचा उत्साह न दाखविता; परंतु याच
देशातील काही मूलतत्त्ववादी कट्टरपंथीयांनी अब्दालीच्या धर्मभावनेला साद
घातली. लुटीचे प्रलोभन तर पूर्वीपासूनचेच होते. त्यात प्रतिशोधाच्या
इच्छेचीही भर पडली होती. आता नजीबखान रोहिला हा हिंदुस्थानातील त्याचाच
जातभाई आपल्या शहा वली उल्लाह या धर्मगुरूच्या उपदेशानुसार त्याला भारतातील
इस्लामचे धर्माने हिंदू असलेल्या काफीर मराठ्यांपासून रक्षण करण्यासाठी
निमंत्रित करीत होता. वास्तविक पुकार असा होता, की खुद्द नजीबालाही
दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची तहान होती. त्यात वली उल्लाहने "इस्लाम
खतरेमें' असल्याची आरोळी दिली. नजीबाने मग अब्दालीला सर्व प्रकारचे साह्य
करण्याचे आश्वासनही
दिले. दिल्लीवर वर्चस्व ठेवण्याच्या मार्गातील मराठ्यांचा अडथळा त्याला
अब्दालीच्या मदतीने दूर करायचा होता. अब्दाली व नजीब हे दोघे एकाच धर्माचे व
एकाच म्हणजे सुन्नी पंथाचे. नबाब सुजाउद्दौला मुसलमान असला, तरी शियापंथीय
असल्यामुळे त्याची सहानुभूती मराठ्यांना होती. त्याला आपल्याकडे वळविण्यात
नजीब यशस्वी झाला.
No comments:
Post a Comment