आत्ता आत्ता काही दिवसांपूर्वी कुणीतरी ऐतिहासीक वास्तूंना भेट देणारे इतिहास प्रेमी आहेत.त्यांनी असा शोध लावला की नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांची समाधी किल्ले पारगड इथे नसून ती दौंड तालुक्यातील मुळामुठा नदीकाठी असणाऱ्या मिरवडी गावात आहे.
आता जेव्हा तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यावर छत्रपती शिवाजी राजे यांनी रायबा च लग्न लावून त्यांना पारगड किल्याची किल्लेदारी दिली.तिथून पुढं त्यांचा इतिहास कोणाला माहीत नाही.त्यांची समाधी किल्ले पारगड वर आहे व मालुसरे कुटुंब ही किल्ले पारगड वर अजून राहत आहेत.
#रायबा मंदिर
मिरवडी गावात एक यादवकालीन बांधणीच दगडी मंदिर आहे.ज्याचा आकार आयताकृती असून मुख्य गाभारा व त्याला जोडून पुढं सभागृह असा आकार असलेलं दगडी खांब व दगडी भिंतीच हे मंदिर म्हणजे मिरवडी गावच भूषण.
या विषयी एक अख्यायिका सांगितली जाते, ज्या वेळी मोगली सैन्य गावच्या गाव लुटायची त्या वेळी कोणी तरी एक शूर पुरुष ज्याचं नाव रायबा होत.तो या मुघलांच्या विरोधात लढत असताना त्याला वीरमरण आलं.त्याच मुंडक जिथं उडवलं तिथं हे रायबा मंदिर आहे आणि जवळच 3-4किलोमीटर वर मेमाणवाडी नावाची छोटी वस्ती आहे तिथं रायबा यांचा देह पडला म्हणून तिथं एक मंदिर आहे.
या मंदिरातील वीर पुरुषाची पूजा करायचा अधिकार गावातील प्रत्येक घराला आहे त्यासाठी खास पुजारी नाही.आणि विशेष म्हणजे मिरवडी गावात आजवर कधी रायबा मालुसरे यांची जयंती साजरी झाली नाही की कोणाला त्या पराक्रमाची तारीख,तिथी माहीत नाही.हा प्रदेश हा 70 टक्के मेंढपाळ,धनगर समाजाचा आहे त्यात रायबा सारख नाव तर कोणीही ठेवत.
#इतिहासाची साधने
इतिहासाची साधने तपासत असताना सर्वात अगोदर बखर,पत्रव्यवहार नंतर भौतिक साधने आणि शेवटी कथा,कादंबरी पहिल्या जातात.
रायबा मंदिर या मंदिराचा व या वीराचा उल्लेख कुठं आढळून आला नाही.
किंवा रायबा मालुसरे यांनी कुठं लढाई केल्याचा प्रसंग मराठ्यांच्या इतिहासात नाही.
#समाधी/मंदिर
संपूर्ण महाराष्ट्र देशाचा अभ्यास केला असता पराक्रमाची शर्थ करणाऱ्या कुठल्याच वीर पुरुषाला वीरमरण आल्यावर त्याच मंदिर बांधलं जात नाही.रायबा पेक्षा मोठं मोठं पराक्रमी वीर या मातीत गेले त्यांचा एवढा पराक्रमी इतिहास असताना केवळ रायबा ला मंदिरात स्थान का मिळाले असेल.
अशी वीर पुरुषांची समाधी असते मंदिर फक्त काही हौशी लोक पूर्वजांची बांधतात आणि रायबा मंदिर त्याला अपवाद आहे कारण हीच रायबा मालुसरे यांची समाधी आहे असं सांगणारे कोणी त्यांचे वारसदार तिथं राहत नाहीत
मी वयाच्या 18व्या वर्षांपासून इतिहास या एका गोष्टी साठी खूप प्रवास केलेत खूप ग्रंथ पाहिले,अगदी पुराभिलेख खात्यात पण जाऊन मोडी कागद, रुमाल पाहिले.मिरवडी गावाचा उल्लेख इतिहासात कुठं आढळत नाही.माझ्या घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावर हे रायबा मंदिर आहे.
आमच्या परिसर स्वराज्य सीमा होती,भीमा नदीच्या अलीकडे यायची कोना स्वराज्य शत्रूची ताकत न्हवती,प्रत्येक 5-6कोसावर गावागावात स्वराज्याच्या लष्करी चौक्या आणि घोड्यांच्या पागा होता.अजूनही त्या इतिहासाच्या खुणा दौंड तालुक्यातील व हवेली तालुक्यातील भीमा नदीकाठची गाव अभिमानाने मिरवतात.
भीमा नदी ते मुळामुठा नदी या मधला भाग हा पूर्ण #रुस्तुमराव दमाजी थोरात यांच्या अधिपत्याखाली होता मिरवडी पासून अवघ्या कोसभर अंतरावर सरदार दमाजी थोरात यांची गढी होती.पलीकडे मिरवडी शेजारी सहजपुर गावात #सरदार_दरेकर यांचा मोठा वाडा व सैन्य बळ होत.शेजारी खामगाव,यवत,पाटसपर्यंत #शितोळे ,#नागवडे पाटलांनी आपल्या तलवारी तळपत ठेवल्या होत्या.उत्तरेला 5 कोसावर #शितोळे_देशमुख सरदारांच्या न्हावी गावात पराक्रमी वीरांची कमी न्हवती की 7-8कोसावर भीमेच्या उत्तरेला #ढमढेरे सरदारांची कडवी फौज होती.मिरवाडीच्या पूर्वेला दमाजी थोरात यांच्या भावाचा वाळकी गावात मोठा वाडा व सैन्य होत.
आता #स्वराज्यातील_सीमा_भागात_एवढ्या_पराक्रमी_लोकांच्या_प्रदेशात_आणि_त्यातल्या_त्यात_रुस्तुमरा_दमाजी_थोरात_यांच्या_मुलखात_येऊन_मुघल_दमाजींच्या_गावाच्या_वेशीवर_येऊन_रायबा_मालुसरे_सारख्या_वीरांची_हत्या_होते_हे_गणित_तरी_कसं_मान्य करायचं.
ज्या वेळी थोरले शाहू छत्रपती यांनी स्वतः दमाजी चा बिमोड केला तेव्हा ते या प्रदेशात आले.इथं फिरले तेव्हा त्यांना रायबा च्या मंदिराची माहिती नसेल का?
इतक्या मजबुत प्रदेशात आम्ही राहतो की फक्त आणि फक्त स्वराज्यातच आमचा प्रदेश होता इथं कधीच मोघल आहे नाहीत.आले ते फक्त इंग्रज आणि ते पण भीमथडी घोड्यांची पैदास करण्यासाठी पण या मातीनं त्यांना त्यात यश दिल नाही.
#रायबा_समाधी/मंदिर
रायबा मंदिर सारख्या कितीतरी लोकांच्या दंतकथा आणि मंदिरे या भागात आहेत.गावच शत्रूपासून रक्षण करणाऱ्या माणकोजी बाबांचं मंदिर यवत ला आहे,उदया कोणीही दहातोंडे येईल आणि म्हणेल हीच ती माणकोजी दहातोंडे यांची समाधी.इतिहास आणि वंशज हे अशे नसतात.
ज्यांना खरंच वाटतंय की रायबा मालुसरे यांची समाधी मिरवडी ला आहे त्या वंशजांसाठी माझे काही प्रश्न आहेत
1)
इतके दिवस तुम्ही कुठं होता,तुमचा आजा,पंजा,कोणत्या युद्धात धारातीर्थी पडला हे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी सांगितलं नाही तर तुम्ही कोणाच्या बोलण्यावर का विश्वास ठेवता?????????
2)
तुमच्याकडे जर खर्च संदर्भ असेल,पुरावे असेल तर ते सादर करा,तुम्ही तुमच्यात घरात बांधून काय साध्य करताय???????
३)
आजवर कधी तुम्हाला पूर्वजांची आठवण आली नाही आणि आज का इतका पुळका येतोय,तो पण वादग्रस्त वास्तूवरून?????
4)
एकाच विराचे वंशज म्हणवून घेता मग तुम्हीच का भांडताय ते पण social मीडियावर???
ही एक जमात पहिली ठोकली पाहिजे.काही ही संदर्भ नसतो,कसला पुरावा नसतो फक्त नाव सारख आलं म्हणून कोणाची समाधी मंदिर तुम्ही म्हणाल तशी मानायला आम्ही दुधखुले नक्की नाही.ही लोक एकमेकांच्या पुढं मोठेपणा दाखवायला काहीतरी नवीन शोधून त्यावर वाद निर्माण करून माझं खर की तुज खरं यात आपल्याला भडकवत असतात.
कोणीही उठत काहीतरी लिहीत घराण्यात भांडण लावून मोकळं होतंय.कमीत कमी इतिहास अभ्यासताना आधी जागेचा अभ्यास केला पाहिजे मग घटनेचा पण काही नाही,रायबा मालुसरे यांना किल्लेदारी पारगड किल्ल्याची कर्नाटक,गोवा,महाराष्ट्र च्या सीमा भागात, तिथून ते मुघल मारायला 450किलोमीटर मिरवडी ला येतात,ते पण इकडं एवढी मातब्बर घराणी असताना अररर इतिहासात कोणाला तरी ही गोष्ट पटेल का शेठ??????.
सदर लेख हा मिरवडी व आसपासच्या परिसराचा व इतिहासाचा अभ्यास करून लिहिलेला असून,खरच जर रायबा मालुसरे यांची समाधी मिरवडी गावात असल्याचे संदर्भ असतील तर सादर करा,त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान वंशजांपेक्षा मला जास्त असेल.आम्हाला कोणाचंही मन दुखवायच नाही पण ज्या गोष्टी भौगोलिक,राजकीय आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
#मंगेश_गावडे_पाटील
8275694144
No comments:
Post a Comment