शिक्रापूर-चाकण महामार्गावर रस्त्याच्या कडेलाच लागुन असणार गाव पिंपळेजगताप.
खुपदा जाता येता पहायचो पण गावात
जाण्याचा योग कधी आलाच नाही,आज अचानक गावाकडे लक्ष गेल अन दिसल्या पुरातन बांकामाच्या खाणाखुणा ! एक भली मोठी भिंत ,विटांनी बांधलेली ,मंदिराच्या कळसापेक्षा उंच, तक्षणी मनात विचार आला
अन माझी बाइक पिंपळे जगताप गावात वळवली.
पिंपळे जगताप गाव तस लहानच आहे पण अतिशय सुंदर आणि टापटीप असलेल गाव ,गावाच्या
मध्यभागी एक ऐतिहासिक वाडा आपल्या गतवैभवाच्या खाणाखुणा दाखवत अजुन ही ताठ मानेन आपल्या भव्य चिरेबंदी
तटबंदी सह येणा-या जाणा-याच स्वागत करतोय हा ऐतिहासिक वाडा आहे शिवरायांच्या फौजेतील मानाच्या शिलेदारांपैकी
एक शिलेदार केशवजी जगताप यांचा ।१७०३ साली केशवरावांचे पुत्र रत्नोजी जगताप पाटील यांनी पिंपळे
जगताप या गावात श्री धर्मनाथ महाराज मंदिर व स्वत:च्या कुटुंबासाठी मंदिराजवळ पाउण एकर जागेत एक
चिरेबंदी ,तीन मजली वाडा (गढी) बांधली. रत्नोजी जगताप हे या प्रांताचे जहागीरदार होते त्यांच्या अधिपत्याखाली
१६ गावांचा कारभार होता,चार-पाचशे.एकर जमीन त्यांच्या मालकीची होती पण कूळ कायदा आला आणि या
कायद्यान सर्वच सरदार,पाटील,वतनदारांच्या जमीनी लोकार्पण झाल्या त्यात जगताप पाटलांची जमीन पण गेली.
वाड्याच्या तटबंदी ला चार कोप-यात चार बुरुंज असुन अजुनही ते व्यवस्थित आहेत ,अतिशय.कौशल्यपुर्ण
बनवलेल्या मातीच्या जंग्या या तटबंदीत ठीकठीकाणी बसवलेल्या आहेत वाड्याच्या एका बुरजावर पीराच ठाण
आहे ,वाडा तीन मजली होता पण तिसरा मजला काळाच्या ओघात पडला असला तरी बाकीचे दोन्ही मजले
अजुन जसेच्यातसे आहेत थोडीशी पडझड झाली असली तरी गतकाळाचे वैभव मात्र दिसुन.येते व वाड्याचे
सध्याचे वारसदार या वाड्यात सुखाने रहात आहेत ..वाड्याच्या तटबंदी मध्ये भुयारी मार्ग होता,पुर्वी मात्तब्बर.घराण्यातल्या स्त्रियांना मंदिरात जाण्यासाठीचा वेगळा मार्ग असायचा तो भुयारी असायचा.असाच एक मार्ग या वाड्यात आहे पण
सध्या जगताप पाटलांनी.ते बंद केले आहे. वाड्याच्या प्रवेशदारा प्रमाणे वाड्याच्या मागच्या बाजुचा
दरवाजा पण खुप अप्रतिम आहे. अतिशय.दिमाखदार असा वाडा नजरेच पारण फेडतो,वाड्याचा मुख्य दरवाजा
सध्या बंद असतो ,मुख्य दरवाजा शेजारचा छोटासा दरवाजा जगताप पाटील वापरतात,वाड्यातील खोल्यांचे
बांधकाम पुर्ण सागवानी लाकडापासुन केले असुन तिनशे वर्षापासून आजपर्यंत जगताप पाटलांच्या आठ पिढ्या
या वाड्यात लहाणाच्या मोठ्या झाल्या अशी माहिती वाड्याचे वारसदार श्री अनिल जगताप पाटील यांनी दिली.तशी वंशावळ ही वाड्यात पाहायला मिळते.
जगताप पाटलांच्या वाड्याशेजारी श्री धर्मनाथ महाराज यांचे तीनशे 1703 मध्ये बांधलेले देखणं मंदिर असून ते ऐतिहासिक मंदिर बांधणीचा शिलालेख या मंदिरात अतिशय चांगल्या पद्धधतीने जपला आहे.
बडोदा संस्थान चे गायकवाड आणि जगताप हे पाहुणे असल्याने त्या काळी सयाजी राव गायकवाड यांच्या मुलगा गोविंदराव गायकवाड यांनी श्री धर्मनाथ मंदिर बांधल्याचे शिलालेख पाहून समजते.
लेखन : #मंगेश_गावडे
८२७५६९४१४४
माहिती व संदर्भ :-श्री अनिल जगताप पाटील.
No comments:
Post a Comment