विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 April 2023

तात्या टोपे.

 

हिंदुस्थानातून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी पहिले एकत्रित युद्ध झाले ते १८५७चे. केवळ काडतूस हे त्या मागचे कारण नव्हते तर मातृभूमी परदास्यातून मुक्त स्वतंत्र करणे, तिच्या हातात पायातील बेड्या तोडून तिच्या मस्तकी पुनःश्च सुवर्ण मुकुट बसवावे हा उदात्त भाव त्या मागे होता. या कामी संपूर्ण हिंदुस्थानातून उठाव झाला. त्यात एक मराठमोळी तलवार चमकत होती "शत्रू कंठ भांगाया".
प्रखर बुद्धिमत्ता, शस्त्रास्त्र पारंगत, "leading from the front" अस ज्यांचे वर्णन करू शकू असे थोर सेनापती रामचंद्र पांडुरंग टोपे अर्थात आपल्याला सुपरिचित


तात्या टोपे.
तात्या धीरोदात्तपणे लढत आजच्या दिवशी फासावर चढले. ज्यांनी ह्या युद्धाला सर्वप्रथम स्वातंत्र्य समर म्हणून गौरविले त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दात सांगायचे तर...
"शस्त्रागाराकडे समशेरीला पाणी चढवीत असलेला तेज मराठा तात्या टोपे हा होय! शिवछत्रपतींच्या आखाड्यातील हा शेवटचा जवान मर्दमराठा गडी आहे. जवानमर्दी ज्यांच्या अंगात आहे असे पुष्कळ लोक असतात, परंतु या शेवटच्या मराठ्याची जवानमर्दीही आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हिंददेवीने उपसलेली तलवार होती. तलवार मेली पण तिचा वार मेला नाही- तो कधीही मरणारा नाही! तात्या टोप्यासारखी तलवार जिला, कालाने जीर्ण नि शत्रूंनी विदीर्ण केलेल्या म्यानातूनही स्वेच्छामात्रेकरून काढता येते त्या हिंदभूमीच्या अक्षय्य कुसव्याला नमस्कार असो! (१८५७चे स्वातंत्र्यसमर)"
तात्यांचे वस्त्र व्हिक्टोरिया संग्रहालय कलकत्ता येथील आहे आणि सदर चित्र क्रांतिकारकांचे गुप्त स्थान "अभिनव भारत मंदिर" येथील आहे.
- हर्षल मिलिंद देव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...