इसवी सन ६१० ते ६५० च्या दरम्यान 'ह्युएनत्संग' हा चिनी प्रवासी चालुक्य पुलकेशी दुसराच्या कारकीर्दीत हिंदुस्थानमध्ये आलेला होता. त्याने मराठा राजा पुलकेशी याचा मुक्तकंठाने गौरव केलेला असून, मराठा लोकांचेही वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे. ते असे,
'मराठे लोक हे कणखर, साधे, मजबूत व प्रामाणिक असून अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहत नसत. तसेच ते उदार वृत्तीचे असून शरणागताच्या रक्षणास जीव धोक्यात घालण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. युद्धापूर्वी ते मद्यप्राशन करीत होते आणि मग त्यांच्यातला एक सैनिक आपल्या भाल्यासह हजारोंच्या सैन्यावर निर्भयपणे तुटून पडत असे. ते आपल्या गज दळाला ही मद्यपान करावयास लावीत असत आणि गजदळासह मराठा सेना निघाली की तिच्यापुढे उभे राहण्यास कोणी धजत नसे. यामुळे मराठ्यांच्या राजाला शेजारच्या राजाची गणतीच नसे.'
वरील वर्णन आजही मराठ्यांशी जुळते हे विशेष....
आदित्य अरुण गरुड-देशमुख
संदर्भ- मराठे व प्राचीन महाराष्ट्र
No comments:
Post a Comment