निकुंभ-निकम हे कुळ सुर्यवंशाची एक शाखा आहे.राजा कुवलयाश्व हा त्यांचा मुळपुरुष आहे.त्यांची भागवत पुराणात दिलेली वंशावळ= ईश्वाकु-विकुक्शी-पुरंजय-वेणु/अनेना-प्रुथु-विश्वरथ-चंद्र-यवनाश्व{या शाखेचे राजे 7-8व्या शतकात काबुल,झाबुल,कंदाहार,गझनी व इराण आदि ठिकाणी राज्य करीत होते यांच्याच राजकन्यांशी बप्पा रावळ व पारसिक राजानी लग्न केली होती}-श्रीवत्स {श्रावस्ती शहर बसवले}-ब्रुहदाश्व-कुवलायाश्व-द्रुढाश्व-हार्यश्व-निकुंभ {याच्याच नावाने हे कुळ चालले}-बहिरणाश्व-क्रुष्णाश्व यापुढे हा वंश वाढला. गोत्र= वसिष्ठ आणी प्रवर 3- पाराशर, मानव्य व भारद्वाज. यातिल मराठा निकम गोत्र-पाराशर,विजयी शस्र खंजिर,देवक कळंब शाखा= कथारिया, निकम व श्रीनेत/ सिरनेत. राज्य= मंडलगड, अल्वार{rajasthan},खानदेश,गाझीपुर,मऊ,बलिया,जानपुर,फारुखाबाद,हारदोई व अझमगड. कुलदेवी= कालिका, तुळजा भवानी व रेणुका. 1] कुवलयाश्व = अयोध्या राज्याच्या या सुर्यवंशी राजाने धुंधु/घुंघु नावाच्या आसुराचा वध केला म्हणुन त्यास घुंघुमार असेही संबोधतात आणी देशास घुंघुमार /जयपुर हे नाव दिले. या राज्यातील याच्या वंशजाना निकुंभवंशी म्हटले गेले. सुरुवातीच्या काळात आलेल्या आर्य क्षत्रियापैकी निकुंभ-निकम हे सर्वप्रथम राजपुतानात स्थाईक झाले.त्यानंतर या कुळाने खानदेश {maharashtra} आणी अल्वार {rajasthan} येथे राज्य स्थापिली. यातील खानदेशातील निकुंभ हे मराठा निकम म्हणुन संबोधले व अल्वर येथील निकुंभ हे राजपुत निकुंपा म्हणुन संबोधले गेले. 12 व्या शतकाच्या शेवटी याच कुळातील मान व सहराज या दोन निकुंभ-निकम वीरानी फारुखाबाद येथे राज्य स्थापिले. 2] खानदेशातील मराठा निकुंभ-निकम राजे= (a) राजा अलाशक्ती निकुंभ-निकम=7 व्या शतकात या राजाने खानदेशातील पिँपळनेर {dist dhule} येथिल ब्राह्मणास धार्मिक कार्यासाठी हे गाव दान दिले होते.तसेच खानदेशातील{पुर्वीचा सेऊनदेश-यात नाशीक जिल्ह्याचा काही भाग येत असे} सिन्नर येथे ताम्रशासने सापडली आहेत.यात याचा उल्लेख सेंद्रकन्रुपती निकुंभालाशक्ती असा आहे म्हणजे हा निकम राजा सेंद्रक राजाचा मांडलीक राजा असावा. (b)राजा वैरदेव निकुंभ-निक = 8व्या शतकात या राजाने नागाश्रम ब्राह्मणास खानदेशातील बहल व देवगाव ही गावे दान दिली होती.याचा देखिल सिन्नर येथे ताम्रशासन सापडला आणी हा देखील सेंद्रक राजाचा मांडलीक राजा असावा (c)राजा क्रुष्णराज निकुंभ-निकम=याने खानदेशातील पालसने हे गाव ब्राह्मणाना दान दिले होते.तसेच मराठा यादव राजा सिँघणाच्या वेळच्या शके 1132 च्या सुमारास पाटण {चाळीसगाव जवळील} शिलालेखात यादवांच्या निकुंभ-निकम या मांडलीक घराण्याचे वर्णन असुन या घराण्याची वंशावळ....क्रुष्णराज-इंद्रराज-गोवन-सोईदेव-हेमाडिदेव. यातील सोईदेवाने मराठा यादवराजा जैतुगीदेव 1ला व सिँघणदेव 2रा या दोहोँचीही सेवा बजावली.तसेच लक्कुंडी-सोराटुर भागावर लक्ष ठेवणार्या सोईदेव सामंताचा उल्लेख केला आहे त्यास "होयसाळदिशापट्ट" ही पदवी होती.तसेच विदर्भातील बारशी टाकळी येथील शके 1098 च्या शिलालेखात हेमाडीदेव नामक एका अद्न्यात वंशातील राजाचे नाव येते,मग हा हेमाडीदेव व निकम हेमाडीदेव एकच आहेत कि वेगवेगळे याचे संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच सिँघणाचे सामंत मराठा निकम-निकुंभ सोईदेव व हेमाडीदेव यांच्या मदतीने सिँघणाने खानदेशात चाळीसगावजवळ पाटण येथे भास्कराचार्याच्या ग्रंथाचे अध्ययन करण्यासाठी मठ स्थापन केला होता. {d} राजा बप्पाजी निकुंभ-निकम= हा बागलाण प्रदेशाचा प्रमुख सरदार म्हणुन होता आणी बागलाण प्रदेशात मराठा निकम हे बारगीर व नाईकवडी यांचे प्रमुख म्हणुन होते म्हणुन याना मराठा बर्गे सरदार हे पद लावण्यात येते आणी हे पद परंपरागत दिसते कारण त्यानंतर कर्नाटक मधिल विजयनगरच्या राज्यात मराठा बर्गे सरदार असल्याचा उल्लेख मिळतो पुढे अहमदनगरच्या निजामशाहीत व मराठा स्वराज्यात देखिल मराठा निकम बर्गे सरदारांचा व वतनाचा उल्लेख आढळतो.म्हणजेच खानदेशातील मराठा निकुंभ-निकम राजे हे पुरातन निकुंभ राजवंशाचे वंशज होत आणी यानी खानदेशात इ स 700 ते 1858 या काळात सेंद्रक-सिँदे राजे,यादवराजे,विजयनगर तुलुवंशी राज,निजाम व मराठा स्वराज्य यात मराठा बर्गे सरदार व सरदेशमुख म्हणुन पराक्रम गाजवला असेच दिसुन येते. म्हणजे महाराष्ट्राच्या या भुमीला या घराण्याने किती मोठे योगदान दिले आहे हेच दिसुन येते. *मराठा निकम बर्गे सरदार व त्यांची वतने= निकम बर्गे याना कोरेगाव व चिँचनेर येथील वंशपरंपरागत पाटिलकीचा हक्क मिळाल्याचे संदर्भ मिळतात,तसेच जालना जिल्ह्यातील चिखली दाभाडी येथिल निकम देशमुख याना परंपरागत देशमुखी मिळाल्याचे संदर्भ मिळतात.तसेच सेनापती दाभाडे, तुलाजी व सिदोजी निकम बर्गे याना छत्रपती शाहु महाराजांतर्फे तासगाव मोकासा जहागीर,तसेच सिदोजी निकम बर्गे याना छत्रपती शाहु महाराजांतर्फे सासुरवे प्रांत कोरेगाव सरदारी जमावाच्या खर्चासाठी मोकासा जहागीर, सरदार सेखोजी निकम बर्गे यानी मराठेशाहीकरिता बाजी शिँदेसोबत रामचंद्र अमात्य यांच्या सुचनेनुसार छत्रपती राजाराम व सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यात मध्यस्थी केली होती पण ती यशस्वी झाली नाही,याना छत्रपती तर्फे "खासबदार" ही अनमोल पदवी मिळाली.सरदार तुलाजी निकम बर्गे याना छत्रपती शाहु तर्फे खंडाले महाल मोकासा जहागिर मिळाला.तसेच कोल्हापुर रियासतीत छत्रपती घराण्याचे आप्त घाटगे घराण्यासंदर्भात सखाराम निकम बर्गे यांचा सहकारी म्हणुन ऐतेहासिक उल्लेख आहे.तसेच सरदार तुलाजी बर्गे व सरदार सिदोजी भोसले याना छत्रपती शाहुंतर्फे बाहेगाव मोकासा जहागीर,तसेच सरदार तुलाजी बर्गे, सरदार प्रतापराव बर्गे,सरदार व्यासो भुजबळ व सरदार उदाजी बंडगर यास छत्रपती शाहुंतर्फे कोताळे बुद्रुक मोकासा जहागीर. ..अशाप्रकारे निकुंभ-निकम या मराठा घराण्याने राजे, मांडलीक राजे, सामंत,सरदार,बर्गे,देशमुख,इनामदार,जहागिरदार,वतनदार व पाटील ही पदे मिळाल्याची संदर्भ मिळतात
No comments:
Post a Comment