विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

मराठाशाहीतील शूरवीर बर्गे घराणे भाग ३

 


मराठाशाहीतील शूरवीर बर्गे घराणे
भाग ३
सरदार बर्गेंच्या सरंजाम, जहागीर, मोकाशांबद्दल :
  • सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सिदोजी बर्गे कृष्णाजी नाईक वाघोजी कदम यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे प्रान्त कोरेगाव सरदारी जमावाच्या खर्चासाठी / बेग़मीस मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार सेखोजी बर्गे या पराक्रमी सरदाराने मराठेशाही करीता बाजी शिंदे यांच्यासोबत रामचंद्र पंत अमात्य हुकूमत पन्हा यांच्या सुचनेनुसार छत्रपति राजाराम व शुर सरदार संताजी राव घोरपडे यांच्यात मध्यस्ती केली पण ती यशस्वी झाली नाही. ह्यांना छत्रपतितर्फे "खासबरदार" ही अनमोल पदवी मिळाली. जंजीरा मोहिमेसारख्या अनेक लढाया त्यांनी गाजविल्या व सरंजाम, इनामे, वतने व बहुमान संपादित केले.
  • सरदार तुलाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे खंडाले महाल मोकासा जहागीर मिळाला.
  • कोल्हापुर रियासतीत छत्रपति घराण्याचे आप्त घाटगे घराण्यासंदर्भात सखाराम बर्गे यांचा सहकारी म्हणून ऐतिहासिक उल्लेख आहे.
  • सरदार तुलाजी बर्गे व सरदार साबाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोरेगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार सिदोजी बर्गे, सरदार साबाजी भोसले, सरदार रामसिंग निंबाळकर याना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे उडतारे मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार तुलाजी ( तुळाजीराव ) बर्गे, हुजूर सुभा , कोतवाल बंधू , सेनापती दाभाडे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार तुलाजी बर्गे, सरदार सिदोजी भोसले यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे बाहे गाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार बाबाजी बर्गे, सरदार प्रतापराव मोरे, सरदार व्यासो भुजबळ, सरदार उदाजी बंडगर यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोताळे बुद्रुक मोकासा जहागीर मिळाली होती.
  • सरदार तुलाजी बर्गे, सरदार संताजी जाधव , सरदार पदाजी व मानकोजी बंडगर, किल्ले वर्धनगड यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे मेटे गाव मोकासा जहागीर मिळाली होती.
  • छत्रपति शाहू राजे भोसले सातारकर यांनी बर्गे मंडळी कोरेगावकर यांना एक पत्र पाठवले होते त्यात त्यांनी समाकुल पांढरे सरदार व बालोजी बर्गे यांना सिदोजी व येसाजी बर्गे यांच्या विवाहास अडथळे आणु नये अशी ताकीद दिली होती.
  • चिंचनेर, खानापुर, तासगाव, सासुरवे, कोरेगाव सारखी अनेक गावे, महाल सरंजाम इनाम म्हणून तसेच बर्गे लोकांना पराक्रमबद्दल अनेक ठिकाणी शेत सनदा, हक्क सनदा, मान मिळाले होते.
  • ग्वालियर संस्थानातही बर्गे हे एक प्रमुख सरदार घराणे होते. " सरदार बर्गे कि गोठ " या नावाचा एक भाग ग्वालियर शहरात आहे. ते सरदार महादजी शिंदे यांच्यासोबत मध्य प्रदेशात जाऊन स्थिरवाले होते. ग्वालियर येथील इंग्रज आमदनीत सरदार बहादुर मेजर बर्गे यांनी जागतिक महायुद्धात सहभाग घेतला होता.
  • सातारा जिल्हा प्रतिसरकार, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पण बर्गे घराण्याचा मोलाचा वाट आहे. आजच्या काळात समाज जपून प्रगती करणाऱ्या मराठा मंडळीतही बर्गे प्रमुख आहेत आणि या घराण्यातून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, समाजसेवक, लोकनेते , सुशिक्षित असे समाज अग्रणी होवून त्यांनी देश सेवा बजावलेली आहे.
  • बर्गे घराण्याचे नातेवाईक हे प्रमुख मराठा ९६ कुळी घराण्यातील आहेत. तसेच ९६ कुळी मराठ्यांच्या उप कुळी, इतर प्रमुख सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजामी वतनदार आदींशी त्यांचे नातेसंबंध आहेत.
संदर्भ :

  1. Maratha Kshatriyancha Itihaas by K. B. Deshmukh (मराठी)
संदर्भ साधने
  • मराठा रियासत
  • शाहू दफ्तर
  • पेशवा दफ्तर
  • ९६ कुळी मराठ्यांवरील आधारित साधने
  • पानिपत व खर्डा पोवाडा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...