भाग २
हटकर
जमात मुळातच लढवय्ये होती. ब्रिटिश काळात इसवी सन १८००-१८२० या काळात
जमातीने नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात धुमाकूळ घातला. हंसाजी नाईक
हटकर हा त्यांचा नेता होता. त्यांनी नांदेड व वऱ्हाड मधील अनेक प्रमुख
ठाणी आपल्या ताब्यात घेतली. त्यांचे ‘नोवा‘(जिल्हा नांदेड) हे प्रमुख ठाणे
होते. या ठाण्याला इंग्रजांनी ८ जानेवारी १८१९ रोजी वेढा घातला. तेव्हा
किल्ल्यात एक महिना संघर्ष चालू होता. हंसाजी नाईक यांनी एक महिना
ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली.
निजामाच्या
राज्यात हटकरांचा दरारा होता. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत
युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते.
हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट
समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान
दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्टपुष्ट, स्वतंत्र राहणारे,
आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना महाराष्ट्र सरकारने विमुक्त जमात वर्ग
२(NT-C) प्रवर्गात समाविष्ट केले आहे. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य
व्यवसाय शेती होता. पण मूळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती
झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.
हटकरांचा
ध्वज : हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची
संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे
असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा
असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळी हटकर
स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन
साम्राज्यांचे आहेत. एक म्हणजे दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील
वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य. त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे. आणि
दुसरे म्हणजे राजस्थान आणि पंजाब मधील भाटी राजपुतांच्या राज्याचे झेंडे.
हे झेंडे रंगाने मिळते जुळते आहेत.महाराष्ट्रात धनगर समाजाचे दोन मुख्य
प्रवाह आहेत असे सांगितले जाते त्यापैकी एक म्हणजेच हटकर होय. आज हटकर समाज
शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेला असून विविध राजकीय व प्रशासकीय
व्यक्ती समाजाने दिलेले आहेत. हटकर समाजा मध्ये उच्च साक्षरता दर असून
आर्थिक दृष्ट्या हा गट सधन आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर सरदारांची नावे-
- निम्बाजी पाटोळा
- हिरोजी शेळके
- दादाजी काकडे
- बळवंतराव देवकाते
- व्यंकोजी खांडेकर
- अंगदोजी पांढरे
- धनाजी शिंगाडा
- भवाणराव देवकाते
- बनाजी बिर्जे
- येसाजी थोरात
- संभाजी पांढरे
- गोदाजी पांढरे
- इन्द्राजी गोरड
- नाईकजी पांढरे
- ग्यानुजी होडगिर
- तुका पोले
- भगाजी करे
घराणी
छत्रपती
शिवाजी महाराजानंतर मराठे आणि औरंगजेब यांच्यात ज्या लढाया झाल्या
त्यामधून प्रसिद्ध झालेली हटकर सरदारांची घराणी- १. देवकाते २. बंडगर ३.
शेंडगे ४. कोळेकर ५. होडगिर ६. गोफणे ७. वाघमोडे ७. काळे ८. धायगुडे ९.
शिंदे १०. मासाळ ११. हजारे १२. मदने १३. खरात १४. शेळके १५. सलगर १६.
पुणेकर १७. पाटोळे १८. खताळ १९. माने २०. फणसे २१. टकले २२. बारगळ २३.
शिंगाडे २४. डांगे २५. काकडे २६. गाढवे २७. महानवर २८. बरगे २९. हाके
३०. रूपनवर ३१. गलांडे ३२. भानुसे ३३. सोलणकर किंवा सोनवलकर ३४. बने ३५.
आगलावे ३६. वाघे ३७. वाघमारे ३८. पांढरे ३९. सदगर ४०. लवटे 41. करे
संदर्भ
- Ain-e-Akbari
- Washim District Wikipedia
- People Of India :Maharashtra-Volume 2
- The Castes and tribes of H.E.H. the Nizam’s Dominions – Volume 1
The Indian Encyclopaedia: Biographical, Historical, Religious -Volume
No comments:
Post a Comment