भाग १
हाटकर किंवा हटकर
धनगर ही प्राचीन पशुपालक योद्धा जमात आहे. यांना हट्टी धनगर/ बरहट्टा /
बरगे / बंडे / झेंडे / मेंढे / ठेलारी / तेलवर (लिंगायत) या नावाने देखील
ओळखले जाते. हाटकर मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये
वास्तव्यास आहेत.[१]
हटकर
हा शब्द हट्टीकारा या कन्नड शब्दावरून आला आहे. कानडी-मराठी शब्दकोशामधे
हट्टी म्हणजे गाई-बैल असा अर्थ दिलेला अढळतो. हट्टीकारा म्हणजे गाईबैलांचा
मालक. हटकर हे पशुपालक असले तरी चालुक्य, होयसळ राजघराण्यांचे सेनापती
सैनिक हे हटकर असल्याचे उल्लेख कन्नड शिलालेखांमधे सापडतात.
महाराष्ट्रात
असलेले हटकर ही एक लढाऊ जमात आहे. परंपरेने लढाई करणे हा त्यांचा प्रमुख
व्यवसाय होता. यातूनच त्यांच्यात अनेक मोठी सरदार घराणी उदयाला आल्याचे
दिसते. यांत सरदार धायगुडे, राजेपांढरे, बळंवतराव किताब असलेले देवकाते,
राजे सरगर, मासाळ, हंडे इ. घराणी सापडतात यांत नेमाजी शिंदे या हटकर मराठी
वीराने सर्वप्रथम नर्मदा नदी ओलांडली; त्याच काळात दामाजी थोरात हे एक
पराक्रमी सरदार, तर त्यांचे सेनापती ग्यानाजी होडगिर हे होते. ते मूळ वाई
रियासतीतील होते.
हटकरांना
हट्टीकारा, बाराहट्टी, बरहट्टी, झेंडे, बंडगर, बंडे, बर्गी धनगर, बारगीर
या ना्वांनीसुद्धा ओळखले जाते. आज हटकर जमातींमधील काही आडनावे-
(विदर्भ
आणि मराठवाड्यातील):- नरोटे(पाटील),भांबेरे
(पाटील),नप्ते,चोरमले,कन्नर,कुन्नर,नेवडे,जरारे,जेढर, शेळके,शिंदे,काळे,
सोनुने,हाके,इतवारे,रामेकर, वाघमोडे,सोर
पारखे
,बंडगर,घोडके,धरणे, कारंडे, करे, कोकरे,कोळगिर, कोळेकर, गडदे, गावडे,
गोरड, होडगिर, धुळगंडे, भोरगिर, नरवटे, कर्ले, जानकर, थोरात, धायगुडे,
देवकर, देशमुख, घुगरे, देवकाते, नरुटे, पडळकर, पाटील, पांढरे, पुणेकर,
पोले, भिसे, मसरक, माने, मार्कंड, मार्कडे, मासाळ, मासुळे, मेमाणे, मोरे,
लवटे, लोखंडे, मस्के, वडकुते, वलेकर, वाघमारे, वाघमोडे, शिंगाडे, शिंदे,
सरोदे, सरगर, सदगर,सलगर, सापनर, सुरनर,राऊतराय,सूळ, सोलणकर किंवा
सोनवलकर, हंडे, हराळ, मारकड, हाके, होडबे, हापगुंडे आहेत.
तसेच
काही हटकरांना पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे, मानकरी या उपाध्या आहेत.
विदर्भात आणि मराठवाड्यात हटकरांची संख्या खुप आहे पण काही हटकर म्हणतात
तर काही धनगर म्हणतात तर काही हटकर धनवर म्हणतात
Captain
Fitzgerald यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात
महाराष्ट्रात बारा कुळींचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव
तयार केले. त्याला बाराहट्टीचा देश म्हणू लागले. सध्या या भागाला हिंगोली
आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव
पडले.
"१४
व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात
हटकरसुद्धा आले होते असे ते म्हणतात" सर्व हटकर जेव्हा कधी मोहिमेवर जातात
तेव्हा हातात एक भाला आणि तलवार घेऊनच निघतात. त्यामुळे त्यांना बर्गी
किंवा बारगीरसुद्धा म्हटले जाते.
अकबराने
'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे, तो असा - "हटकर हे
स्वाभिमानी आहेत, ही राजपुतांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे.
त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे
त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे
राज्य आणि किल्ले कबजात ठेवले आहेत. त्यांना धनगर पण म्हणतात पण ते राजपूत
आहेत आणि हे खरे आहे.
No comments:
Post a Comment