©®लेखक :-नितीन घाडगे
संपर्क :-8888494588
संपर्क :-8888494588
- मनसबदार कामराज राजेघाटगे मुळं पुरुष घाटगे उर्फ घाडगे घराणे.*
प्राचीन सूर्यवंश.राष्ट्रकुट वंशज,राठोडवंश घाटगे ही पदवी मनसबदार कामराज राजेघाटगे यानी मिळवली .
*मनसबदार,वजिर,जहांगीरदार,संस्थानिक,आणि सरदारांमध्यें राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे.ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडीलो पराजित वतन 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.प्राचीन काळमुख वंश,राठोड राजपुत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगेउर्फ घाडगे
त्या
शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे
होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे
आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण
मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय.
- घाटगे उर्फ घाडगे हे नाव कसे पडले *?
सूर्य
वंशीय क्षत्रिय घराण्याची एक शाखेचा मुळं षुरूष कामराज ह्यांनी अतिशय
पराक्रमनी कारकिर्दीत गाजवली.*फेरिस्ती इतिहास संशोधकांनी म्हटले आहे की
कामराज ह्यापुरूषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेल्या घाट
हा कोलट्या उड्या मारीत तो घाट वाजवला होता अजिंक्य आश्या पराक्रम
बेदरच्या व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशुराला तो घाट वाजवता आला
नव्हता.आसा तो उंच असलेल्या अजिंक्य घाट ह्या कामराज ह्यापुरूषाने पराक्रम
पुर्वक वाजवुन दाखवून दिला. त्यामुळे बादशहा ने खुश होऊन त्यास घाटगे ही
पदवी देऊन गौरव तरकेला.आणी उच्च प्रति ची मनसब त्यास बहाल केली.व
वंशपरंपरागत" सैन्यात उच्च अधिकारी "असा अधिकार बहाल केला.
* कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.
अनेक
युध्दात आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता.बहमनी
संस्थापक हसन गंगो बामनी ब्राह्मणी बहमनी ह्या बादशहा ने कामराज घाटगे
यांचे खुप कौतुक केले होते.
* ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महलाची देशगत होती.
मनसबदार
कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी
लाऊन दीला होता.हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन
गेले. मनसबदार कामराज घाटगे यांच्या पुढें त्यांना सहा पुत्र होते. ह्या
सहा पुत्रापासुन महाराष्ट्र देशा तील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराने
महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभाग ले जहागिरी
वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहीमाच्या निमित्ताने दुर दुर महाराष्ट्र
व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड व इंदोर व बडोदा व इतर ठिकाणी घाटगे
विभागले.असलं तरी सर्वांचा मुळ पुरुष हे मनसबदार कामराज राजेघाटगे यांचे
वंशज आहेत.ह्याच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जाहगिरी वतने तसेच
अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली.
कागलचे संस्थान आज ही उभं आहे.छ.शाहु राजेभोसले हे मुळचे घाटगे होय.
घाटगे
घराण्याच्या इतिहासात काही गोष्टी लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात घाटगे
उर्फ घाडगे घरान्याहुन अधिक उच्च प्रतिचे खानदानी घराने अस्तित्वात
नव्हतं.आसे म्हटले जाते.छ.शाहु हे घाटगे घराण्यातुन दत्तक घेण्याचा निर्णय
कोल्हापूर संस्थाने घेतला होता. संदभ छं.शाहु ह्या पुस्तकात वरील
संदर्भासाठी पाहु शकता.
जैतपाळनाक
बगडनाक लोकनाक नयननाक लोहनाक परसनाक ही काम राज घाटगे यांच्या सहा
मुलांची नावे ह्या सहा मुला पासुन पुर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर
राज्यांत घाटगे उर्फ घाडगे विस्तार पावले असुन ह्या सर्वांचा मुळ पुरुष
मनसबदार कामराज घाटगे हे होय.
मनसबदार कामराज राजे-घाटगे ह्याचे वडील जुन्या प्राचीन वतनदार पैकी होते.म्हणुनच मनसबदार कामराज घाटगे यांनी आवघ्या सोळाव्या वर्षी बहमनी संस्थापक हसन गंगू ब्राह्मणी ह्याच्या दरबारात पराक्रम गाजवून प्रवेश केला.
बहमनी
संस्थापक हसन गंगू ब्राह्मणी ह्याच्या खास मर्जीतील लोकांपैकी कामराज
घाटगे ऐक होते.त्यामुळे मनसबदारी दिली होती. बहमनी संस्थापक हसन गंगू
ब्राह्मणी ह्यांनी त्याकाळातील
बलाढ्य मराठा मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ यांच्या मुलीशी मनसबदार कामराज घाटगे विवाह लावून दिला होता.
मनसबदार
हरनाक शकपाळ-पोळ व मनसबदार कामराज घाटगे यांना मनसब होती.असे पुरावे
मिळतात.मनसबदार कामराज घाटगे महाराष्ट्रभर आपल्या पराक्रमाने व बहमनी
संस्थापक हसन गंगू ब्राह्मणी ह्याच्या खास मर्जीतील लोकांपैकी होते
त्यामुळे प्रसिद्ध होते. मनसबदार कामराज घाटगे यांना दोन महलाची
देशगत होती.आपल्या जाहगिरीवर मनसबदार कामराज घाटगे यांनी अनेक नामवंत
कारभारी मुतालिक नेमले होते.
*मलवडी व ललगुण* ह्या दोन्ही महलाची देशगत कामराज घाटगे यांची होती.ह्या दोन्ही देशगतीवर नारायण हरी नावाचा देश कुलकर्णी त्यांनी नेमला होता.
'नारायण
हरी 'नावाचा देश कुलकर्णी यांच्या वर मनसबदार कामराज घाटगे यांचा खुप
भरवसा होता.त्यामुळे मनसबदार कामराज घाटगे यांनी त्यांना जाहगिरीवर
व्यवस्था पाहण्यासाठी' मुतालिक' नेमले होते.आणी स्वाता बेदरास राहुन
बादशहा हसन गंगू ब्राह्मणी ह्याची राजकीय सेवा करू लागले.त्याच्या जाहागिर
व संपत्तीचा हीशेब ठेवल्याचा काम नारायण हरी हेच करत असतं. *काळे
रामेश्वर भट नावांचे प्रसिद्ध महापुरुष ईश्र्वरभक्त मनसबदार कामराज घाटगे
यांचे गुरू व पुरोहित होते.त्याचाच जावई हाआध्यामिक व तरबेज नारायण हरी
होते. काळे रामेश्वर भट ह्याचे वडीलांच्याकडे मंत्रसामर्थ्य लोक प्रसिद्ध
होते अशी ही पुर्वी दंतकथा सांगितली जाते.शिवाय त्यांनी आमवश्याची
पौर्णिमा केली व दुर्गे भांडत होती ती मंत्र विदयेकरून घेऊन दिली अस ऐका
जुन्या बखरीतील वर्णन आधळते.आश्या महापुरुषांच्या मुलगा रामेश्वर भट नावाचा
ईश्वर भक्त आध्यात्मिक सदपुरष होते. काळे रामेश्वर भट यांच्या
मार्गदर्शनाखाली मनसबदार कामराज घाटगे यांनी आपला *गंध व आक्षता* चा शिक्का
तयार केला असावा.मनसबदार कामराज घाटगे हे पुर्ण आध्यात्मिक होते असे
सिद्ध होते.मनसबदार कामराज घाटगे वेळोवेळी काळे रामेश्वर भट ह्यांच्य
मार्गदर्शन घेत आसत. *ह्यावरून संत महापुरुषांच्या वरप्रदान घेतल्याची
चालरीत अनंत काळापासून चालत आली हिंदू क्षत्रियामध्ये ती अधिक महत्त्वाचे
मानले जाते.
*दुर्गा देवीचा दुष्काळ सन १३००साली पडला.हा दुष्काळ पडण्यापूर्वी सन १३१८ धातानाम संवस्तरे कार्तिक शुध्द पौर्णिमा शुक्रवारी काळे रामेश्वर भट यांना दुष्टात होऊन शहाणे असाल तर यांनी विद्या नगरकडे जा.आशी आनुआज्ञा मिळाली होती असे सांगितले जाते.त्यानुसार भारद्वाज,उपमंन्यु,कौशिक,भालजंन,भृग गोत्र असनारे लोकं विद्या नगरकडे गेले अस पुरावे मिळतात.ह्या वरून काळे रामेश्वर भट विद्या नगरीकडे गेले असावेत.
*दुर्गा
देवीचा दुष्काळ सलग अनेक वर्षांपासून सुरू राहीला त्यामुळे अनेक गावच्या
गावं ओस पडू लागली.लोक अन्न पाणी न मिळाल्याने उपास मारीने मरत
होते.जनावरे बेवारस होऊन मरत होती.त्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी,दिवान,
सर्व सामान्य माणसाला जीन मुश्किल होऊन.ते वाट दिसलं तिकडं गेले.आशी
अवस्था झाली होती. *पुढे दुर्गा देवीचा दुष्काळ* नंतर पाऊस
पडला.बहमनी सुलतान मोहम्मद वल्ली१४२९साली ह्याने महाराष्ट्रात बंडखोर
लोकांचे बंड मोडून काढण्यासाठी.व पुर्वीच्या लोकांना वसाहत स्थापन करण्या
साठी मल्लिक-उल-तिजार नावाचा बादशाही सरदार काम राज ह्याच्या मदतीला पाठवुन
दिला.त्याच्या मदतीला मनसबदार कामराज घाटगे ह्यांनी काळें रामेश्वर भट
ह्यांच्या नातूस पाठवलं.दादु नरसु काळे हे ब्राह्मण काळे रामेश्वर भट यांचे
नातू होय.ह्याचे मुळ नाव दादाजी नरसिंह होय.काळे रामेश्वर भट हे
अथर्ववेदी असल्यामुळे त्यांना आथवृन म्हणतात.आसे बखरी मध्ये दिलं आहे.
*सलग ३०साल दुर्गा देवीचा दुष्काळ पडला त्यामुळे लोक वस्ती नाहीशी
झाली होती.पुढे पाऊस पडला.बेचिराग झालेल्या खटाव माण प्रांताला बेरड
रामोशी पुंड लोक लोकांना लुटूमार करून राहीले.त्यामुळे त्या भागातील
शेतकरी व सामान्य लोकांना खुपचं मनस्ताप झाला. होता. *त्यामुळे
मनसबदार कामराज घाटगे यांना राजनैतिक मनस्ताप झाला होता.त्यामुळे बादशहास
विनंती करून बादशही सरदार मल्लिक उल तिजार ह्याला आपल्या प्रजेच्या
हितासाठी त्यांनी स्वाताचा कारकुन दादाजी नरसिंह व सैन्य
दिले.महाराष्टातील बंडखोर लोकांचे बंड मोडून काढण्यासाठी कामराज घाटगे हे
मनसबदार बादशहाच्या अधिक उपयोगी पडले होते अस पुरावे मिळतात.दुर्गा देवी
दुष्काळ संपल्या नंतर कामराज घाटगे यांनी अनेक गावे बसवली .आणि गावाचे
वतनदार नेमले असं उल्लेख मिळतात . *पाडाव व वसाहत निर्मिती व ठराव*
दुर्गा देवीचा दुष्काळ नंतर पाऊस पडला होता तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण आपन आपल्या बेचिराख प्रदेशातील लोकांना लुटूमार करून आपला उदरनिर्वाह करन्यासाठी सैन्य बळ शक्ती तयार केली ह्या भुपतराव बेरड ह्याने अनेक प्रशासकीय अधिकारी व गरीब लोकांना लुटून पुर्णपणे मोकळे केले.
तो खटाव भागात आपलं सैन्य बळ वापरून लोकांना लुटूमार करून राहीला .काही ठिकाणी रामोशी समाजातील लोक टोळ्या करून लोकांना लुटूमार करतं होते.
आसाच ऐक दुसरा पुंड मौजे भाडवनी कसबे मलवडी येथे सैन्य जमवुन लोकांना लुटूमार करून राहीला होता.
ह्या दोघांनी मिळून सर्व सामान्य जनतेला लुटून पुर्णपणे मोकळे केले होते.
सलग ३०साल दुर्गा देवीचा दुष्काळ पडला त्यामुळे लोक वस्ती नाहीशी झाली होती.पुढे पाऊस पडला.बेचिराग झालेल्या खटाव माण प्रांताला बेरड रामोशी पुंड लोक लोकांना लुटूमार करून राहीले.त्यामुळे त्या भागातील शेतकरी व सामान्य लोकांना खुपचं मनस्ताप झाला. होता.
*त्यामुळे मनसबदार कामराज घाटगे यांना राजनैतिक मनस्ताप झाला होता.त्यामुळे बादशहास विनंती करून बादशही सरदार मल्लिक उल तिजार ह्याला आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी स्वाताचा कारकुन दादाजी नरसिंह व सैन्य दिले.महाराष्टातील बंडखोर लोकांचे बंड मोडून काढण्यासाठी कामराज घाटगे हे मनसबदार बादशहाच्या अधिक उपयोगी पडले होते अस पुरावे मिळतात.
*कृष्णा नदीच्या काठाने कराड येथे आले.तेतुन खटाव माण प्रांतात घुसून बेरड रामोशी पुंड लोकांना दोन महिने युद्ध सुरू होते.काही किल्ले व गाव सर करून बेरड पुंड लोकांशी मैत्री केली व त्यांना जगण्यासाठी काही ठिकाणी गावं दिली.त्यात वाघीनगरा , चित्रदुरग,पाल गावी जागा देउन बेदरा स गेला .व कामराज घाटगे नी व त्यांच्या कारभारी मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांच्यावर खटाव माण प्रांताची वसाहत स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
*कामराज घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांनी अनेक गावांची नावे ठेवली होती व वसाहत स्थापन करण्यात आलेल्या जून्या लोक लोकांना पुन्हा प्राधान्य दिले गेले गावांची कारभार करणारे पाटील व बारा बलुतेदार वतन दिली होती.
पहिल्या वर्षी जमीनीचा उसुल न घेता पुढे दर बिघ्यास ऐक तोबरा धान्य ठराव मंजूर मनसबदार कामराज घाटगे केला.त्या ठरावास "दादाजी नरसिंह तोब्रा"असे आजही प्रसिद्ध आहे.
मुस्लिम राजवटीत किती आल्प शेतसारा वसूली किती आल्प घेत हे सिद्ध होते.
* कामराज घाटगे यांनी दादाजी नरसिंह ह्याना ललगुण, मलवडी, खटाव गावाचे देशकुळकरन दिलें होतें.
* सन १३६१पयत आत्ता ह्या प्रदेशातील लोकांचा वनवास संपवून गेला होता.भरपुर पाऊस पडला होता.धन धान्य ने लोक संपन्न झाले होते.आनेक गावाच्या गावं कामराज घाटगे व त्यांच्या मुतालिक यांनी वसवली ह़ोती.लोक वस्ती खुप वाढु लागली होती.
ह्या पुर्ण प्रदेशातील गावं कामराज घाटगे यांनी दादाजी नरसिंह ह्यांनी आपल्या दुरदुष्टीतुन साकारली होती.लोकांना वसाहत निर्मिती साठी वसुली न घेता पुढे दर बिघ्यास ऐक तोबरा धान्य ठराव मंजूर करण्यात आला होता.शिवाय पुढं बेरड रामोशी समाजाकडून लोकांना लुटूमार करून्या पासुन वाचवले.त्याही लोकांना जागा देउन त्यांच्या पोटा पाण्याचा कायम बंदोबस्त केला.आशा कामराज घाटगे व त्यांच्या मुतालिक दादाजी नरसिंह ह्यांना इतिहास कसा विसरू शकेल.
शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणी महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्क्रत रुप आहे. 1] शिवभारतातील अध्याय 4 मधिल श्लोक 31 " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतञपणे करुन घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे.यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कविस अभिप्रेत आहे. 2] तसेच 1ल्या अध्यायातील श्लोक 43 मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भुमिप हेच पद लावले आहे.
विशेष
करून बहमनी काळातील राजेघाटगे बलाथ्य मराठा घराणे होते. राजेघाटगे यांनी
शत्रूशी झुंज दिली म्हणून त्यांनी "झुंझारराव' हा किताब देण्यात आला.
मलवडीच्या राजेघाटगे यांनी शत्रूवर बाजी मारली म्हणून त्यांना बाजीराव हा
किताब दिला. राजेघाटगे यांनी किल्ला सर केला म्हणून त्यांना सर्जेराव हा
किताब देण्यात आला.झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास
जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या
कुटुंबास मिळाले आहेत.
- घाटगे उर्फ घाडगे घराणे :- *देवक:- सूर्यफूल,पाचपालवी *वंश :-सुर्यवंश
- गोत्र :कश्यप, *गुरु:-वशिष्ठ,
- वेद:-यजुर्वेद, *कूळमंत्र:-गायत्री मंत्र.
- सिंहासन आणि चिन्ह: - दोन रंग(लाल व पांढरा) *घोडा: - पांढरा, फ्लॅगपॉलवर चंद्र *विजयशस्त्र:खडा *सिंहासन साम्राज्य:-अयोध्या (उत्तरप्रदेशात), खटाव देश (मुळं पुरुष कामराज राजेघाटगे) *कूळ निशाण :-सूर्य
- कुळ देवता: - प्रभाकर उर्फ सूर्य *कुळदैवत :-महादेव व महादेवाचे अवतार चंद्रसेन(किल्लेवसंतगड)खंडोबा, जोतिबा .. *कुलस्वामिrनी :-पार्वती देवीचे आवतार तुळजाभवानी.(तुळजापूर)
No comments:
Post a Comment