विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 May 2023

#रंगराव_चव्हाण_मोहिते_इ_स_1564

 





#रंगराव_चव्हाण_मोहिते_इ_स_1564
पोस्तसांभार :;धीरजराजे हंबीरराव 
"मुसलमानी आमदानीतील मराठेसरदार" ह्या पुस्तकाचे लेखक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी नोव्हेंबर 1909 साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात विविध राजघराण्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकलेला आहे त्यांच्या पुस्तकातील "मोहिते घराणे" या प्रकरणात त्यांनी तात्कालीन उपलब्ध माहिती आधारे मोहिते-कुळाचे वर्णन केले आहे.
'मोहिते' हे दिल्लीच्या प्राचीन चौहान राजांचे वंशज असे मांडले आहे. सदरील प्रकरणात एक महत्त्वाची नोंद सापडते ती म्हणजे "रंगराव चव्हाण मोहिते" यांची इसवी सन 1564 साली झालेल्या राक्षस तागडी उर्फ तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या रामराजाविरुद्ध मुसलमानाच्या वतीने लढत असल्याची नोंद यात दिलेली आहे. सदरील पुस्तकात मोहित्यांचे मराठे शाहित बरेच 'प्राबल्य' होते असेही मांडलेले आहे .( मोहिते कुळ हे हाडा चौहाण शाखेतील नसुन ते रावहम्मीरदेव यांच्या वंशपंरपरेतील आहे मोहिते हा शब्द आरबी भाषैतील नसुन तो महिपती ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे )
शहाजी भोसले यांनी लखुजी जाधवरावांवर असंतुष्ट होऊन मोहित्यांची कन्या तुकाबाई हीज बरोबर दुसरा विवाह केला तुकाबाईच्या वडिलांचे नाव 'बाजीमोहिते पोगरवाडीकर' होते असे म्हटले आहे यावरून बाजी मोहित्यांची एक शाखा "पोगरवाडीला" होते असे स्पष्ट होते. शिवाय तुकाबाईंचा भाऊ संभाजीबाजी मोहिते हा पुणे जिल्ह्यातील सुपे महालाचा अधिकारी असून तो शहाजी भोसले यांच्याशी एकनिष्ठ होता असेही नोंदवले आहे .(लखुजीराजे व शहाजीराजे यांच्यात कधीही वितुष्ट नव्हते याची पुष्टी इतर साधनांत होते मोहित्यांची स्री दुसरी पत्नी होती हे जरी खरे असले तरी पुर्वी राजेमंडळी एकापेक्षा अधिक विवाह करत शिवाय तुकाबाई बाजीमोहिते यांची कन्या नसुन हणगोजी मोहिते यांच्या कन्यका आहेत व संभाजीबाजी मोहिते यांच्या भगिनी.)
प्रकरणात पुढे "मोहिते" घराण्याविषयी लिहिताना 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' हे मराठ्यांच्या इतिहासात फार प्राख्यात आहे असे लिहिले आहे. राजेमोहिते घराण्याचा राजेभोसले घराण्यासोबत प्रत्यक्ष शरीर संबंध झाला असल्यामुळे त्यास शिवाजी महाराजांविषयी अगत्य व कळकळ उत्पन्न झाली असे दिसते ; शिवाजी महाराज यांची दुसरी बायको 'सोयराबाई' ही मोहित्यांची मुलगी होती सातारच्या छत्रपतींचे पुढे मोहित्यांशी अनेक वेळा शरीरसंबंध आलेले असून हे मोहिते घराणे छत्रपतींच्या आप्त वर्गात श्रेष्ठ समजले जाते असे दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी त्यांच्या पुस्तकात मोहिते घराण्याविषयी मांडले आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...