विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

मराठाशाहीतील शूरवीर बर्गे घराणे भाग २

 

मराठाशाहीतील शूरवीर बर्गे घराणे

भाग २
प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे
  • सरदार आनंदराव बर्गे
  • सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
  • सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
  • सरदार खंडोजीराव बर्गे
  • सरदार सेखोजीराव बर्गे
  • सरदार राणोजीराव बर्गे
  • सरदार सखाराम बर्गे
  • सरदार बालोजीराव बर्गे
  • सरदार हैबतराव बर्गे
  • सरदार येसाजीराव बर्गे
  • सरदार सिदोजीराव बर्गे
  • सरदार साबाजीराव बर्गे
  • सरदार जानोजीराव बर्गे
ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.
ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :
बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्त्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्त्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते तसेच सरदार बर्गे घराण्यातील शुरवीर पुरूषानी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ जी शस्त्रे धारन (वापरले) ती शस्त्रे आजही बर्गे वंशजाकडे आहेत फार दुर्मीळ ठेवा जपुन ठेवले आहे. तो दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...