विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

! क्षञियांचे अग्नीकुल !!

 


! क्षञियांचे अग्नीकुल !!
1] सोग्निवताति वायुश्च सोर्कः सोमः ! मनुस्म्रुति अध्याय 7 ** वरिल सुञावरुन क्षञियांचा अग्निशी संबंध स्पष्ट होतो. तसेच क्षञियांचा रुद्राशी किती द्रुढ संबंध आहे हे त्यांच्या "हरहर महादेव" या रण घोषणेवरुन स्पष्ट होते.ही रणघोषणा मराठा,राजपुत,गोस्वामी/गोसावी आदि क्षञियात रणभुमीवर दिली जाते.तसेच मराठा व राजपुत क्षञियात प्रतिहार-परिहार, चालुक्य-साळुंके, चौहान-चव्हाण व परमार-पवार ही चार अग्निवंश कुले आहेत.गोसावी क्षञियात गिरी, पुरी, भारति,वन,नागे,अरण्य,सागर,पर्वत,तीर्थ व आश्रम हे 10 अग्निवंश कुले आहेत.
2] अंगिरस हे क्षञिय होत.हा इक्ष्वाकु नामक क्षञिय कुलांतील होता. अंगिरस हे क्षञिय असल्या बद्दलचा पुरावा विष्णुपुराणात आहे.वायुपुराणातही तत्संबंधी माहिती आहे.
3] अंगिरस हा शब्दच अंगार म्हणजे अग्नि या शब्दापासुन निघालेला आहे.याचे वर्णन "गोसावी क्षञिय व त्यांचा संप्रदाय" या पुस्तकात आहे. अंगिरस हेच विशेष शहाणे,कर्तबगार व शुर समजले जात, आणी क्षञियातील हेच गुण विशेषत्वाने दिसुन येतात.
4] तसेच अग्नि,गाई,यद्न्य व अंगिरस क्षञिय ऋषी यांचा इतका निकट संबंध आहे कि,इतका दुसर्या ऋषीँचा नाही. तसेच अग्नि,गाई, यद्न्य व क्षञिय यांचाही द्रुढ संबंध तितकाच उत्तुंग आहे परंतु अंगिरस क्षञिय ऋषीँचा सर्वात जास्त निकटचा संबंध आहे. अंगिरस कुळात 33 ऋषि वैदिक ऋच्यांचे द्रष्टे झाले.अंगिरस कुल हे क्षञिय कुल आहे हे वायुपुराणांत उल्लिखेलेले आहे.
5] शौनक अंगिरस कुलोत्पन्न असुन पुढे वसिष्ठ गोञात गेला. हा शौनक क्षञिय होता आणी तो ग्रुत्समदाचा नातु होय.अञिऋषी व अंगिरस हे साडु होत.अञिऋषी हा क्षञिय होता या अञिचा पुञ क्षञियकुलोत्पन्न सोमराजा हा सोम/चंद्रवंशी घराण्याचा मुळ पुरुष होय आणी याने राजसुययद्न्य केला होता याचा उल्लेख विष्णुपुराणात आहे. अंगिरस व अञि साडु म्हणजे यावरुन अंगिरस क्षञिय होत हे स्पष्ट होते.शौनक जो अंगिरि त्यावरुन गोसाव्यातील गिरी हे उपनाव निघाले असावे.
6] सुदास हा आर्य व अनार्य यांच्या झगड्यात दशगव्यांचा मुख्य होता आणी दशग्व्यां वरुनच गोसावी क्षञियातील दशनाम निघाले असावे सुदास हा क्षञिय होता आणी तो दशग्वांचा मुख्य होता.
7] अंगिरस कुलोत्पन्न क्षञिय व अग्निवंश कुलक्षञिय यांचा काही संबंध असु शकतो आणी तो कसा संबंध असु शकतो याचे संशोधन होणे गरजेचे आहे. अंगिरस कुलोत्पन्न शौनक हा वसिष्ठ गोञात गेला असे उल्लेख आढळतात आणी अग्निवंश कुलोत्पन्न परमार/पवार आणी चौहान/चव्हाण हे वसिष्ठगोञी आहेत, प्रतिहार/परिहार आणी चालुक्य/साळुंके हे भारद्वाज गोञी आहेत. विशेष अग्निवंश उत्पत्तीत एक कथा सांगितली जाते ती म्हणजे वसिष्ठ ऋषीने अग्निकुंडातुन 4 क्षञिय कुळे निर्माण केली यात कथा सोडली तर वसिष्ठ ऋषीचाच उल्लेख आढळतो आणी अंगिरस कुलोत्पन्न अग्निकुलाशी देखिल वसिष्ठ ऋषीचाच संबंध येतो.मग हे सर्वजण अग्निवंशाशी संबंधित आहेत आणी अग्निवंश हा वैदिक काळापासुन आहे याचे आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.
8] मराठा क्षत्रियातील अग्नीवंशी कुळांचा कुळाचार = (a) चव्हाण= सोमवंशी राजा,पहिली गादी मेवाड,दुसरी गादी अवंतीपुरी,श्वेत सिँहासन,श्वेत छत्र,श्वेत निशाण,श्वेत वारु, कुलदैवत ज्वालामुखी देवी,देवक वासुंद्री वेल हळद सोने रुई,गोत्र वसिष्ठ.,वेद ऋग्वेद व मंत्र गायत्री मंत्र. (b) पवार/ परमार= सोमवंशी राजा पवार,गादी धारानगर,लाल सिँहासन,लाल छत्र, लाल निशाण,लाल वारु,ध्वजस्तंभी चंद्र, कुलदैवत जगदंबीका ,देवक तरवारीची धार, गोत्र वसिष्ठ,वेद ऋग्वेद,मंत्र गायत्री मंत्र,उपकुळे= गुजर, ढोणे,रेणुसे,जगधने,बागवे आदि. (c) साळुंखे = तक्त गादी महिनगर, ,दुसरी गादी अनहिलपुर,पिवळे सिँहासन,पिवळे छत्र, पिवळे निशाण, पिवळा वारु,ध्वजस्तंभी हानुमान कुलदैवत ब्रह्मनाथ,देवक कमळ,गोत्र भारद्वाज, ऋग्वेद,गायत्रीमंत्र,उपकुळे=बाबर, लहाने, गुंजाळ,रणधीर,पाटोळे, (d) प्रतिहार/परिहार=

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...