विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 May 2023

! यदुवंशी क्षत्रिय यादव-जाधव राजांचा राज्यविस्तार !!

 


! यदुवंशी क्षत्रिय यादव-जाधव राजांचा राज्यविस्तार !!
चंद्रवंशातील राजा ययाति याचा पुञ राजा यदु याचे वंशजाना यदुवंशी क्षत्रिय यादव-जाधव संबोधले जाते. जरासंधाच्या पराक्रमामुळे यादवाना आपली राजधानी मथुरा येथुन द्वारका येथे स्थालंतरीत करावी लागली व पुढे यादव क्षत्रियांची राज्य निर्माण झाली ती = 1]हैहय 2] चेदी 3] विदर्भ 4] सात्वत 5] अधंक 6] भोज 7]कुकुरा 8]व्रुष्णी 9]शैनेय 10] शुरसेनी 11]दशरन 12]करुशा 13] कुंती 14] अवंती 15]माळवा 16]गुर्जरा 17]सौराष्ट्र 18] द्वारका ही यादव क्षञियांची राज्य तयार झाली. 1] हैहय= राजा यदुचा ज्येष्ठपुञ सहस्त्रजीत यांच्या वंशजाना हैहय संबोधतात.पुराणातील उल्लेखानुसार राजा हैहय हा राजा सहस्ञजीत याचा नातु होय.हैहय पासुन 5 clans ची निर्मिती झाली ती =1} वितीहोत्रा= पुराणातील वर्णना नुसार हा हैहयवंशी राजा तालाजंगाचा ज्येष्ठपुञ व राजा अर्जुन कार्तवीर्याचा खापरपणतु होय. तसेच कौटिल्याच्या अर्थशास्ञात हैहय राजवंशातील अर्जुन कार्तवीर्य या राजाचा सम्राट व चक्रवर्ती म्हणुन उल्लेख आढळतो व याची राजधानी महिष्मती हे शहर होय. 2}शार्यता 3}भोज 4}अवंती 5}तुंडीकेरा ही 5 clans तयार झाली आणी या सर्वाना तालाजंग संबोधले गेले. [2] चेदी = हे चेदी राजाचे वंशज होत आणी राजा चेदी कैशीकाचा पुञ व राजा विदर्भाचा नातु होय.राजा विदर्भ हा राजा क्रोस्थ याचा 15 वा वंशज आहे.The Rigveda {7.5.37} mentioned a king named kashu/ kaishika chaidya. [3]विदर्भ = राजा विदर्भ हा विदर्भ राज्याचा मुळपुरुष होय.राजा विदर्भ हा राजा क्रोस्थ याचा 15 वा वंशज व राजा जामाघ याचा पुत्र होय.यास क्रथ/ भीम,कैशिक व लोमपाद हे 3 पुत्र होत आणी त्यानी 3 स्वतंञ राज्य स्थापन केली. याच वंशातील भिमरथा-भिमरट्ट-bhimratha याची कन्या निषाद देशाच्या नल राजाला दिली होती.म्हणजे याच काळात विदर्भ देशात यादव आले आणी त्यांच्या राजाना रथ-रट्ट हे पद आढळते म्हणजे पुढे यांची वंशज यादव-जाधव मराठा आहेत.याच राजा भिमरथ-BHIMRATHA यास रुक्मिन नावाचा पुत्र होता. तसेच मत्स्य व पुराणात the vaidarbhas are described as the inhabitants of deccan {दक्षिणपथः वशिनः}. [4]सात्वत = यदुवंशी राजा मधु याच्या वंशजाना सात्वत असे म्हणतात.सात्वत राजास 4 पुत्र होती ती-भजमान, देवव्रुढ, अधंक व व्रुष्णी. देवव्रुढाचे राज्य पर्णाशा/बनास नदीच्या तिरी होते, त्याच्या वंशजाना मार्तिकावर्तिचे भोज म्हणतात.अंधकाचे राज्य मथुरेत होते आणी व्रुष्णीच्याच वंशात भगवान श्रीक्रुष्ण जन्मले.तसेच पाणीनीने अष्टाध्यायात म्हटले आहे कि,"सात्वत हे क्षत्रियगोत्री असुन त्यांचा एक संघ आहे व त्यानी राज्याची निर्मिती केली." .In Aitareya brahman {8.14} -the satvatas were a southern people held in subjection by the bhojas. Accourding to a tradition,found in the harivamsa {95.5242-8},the satvatas was a descendant of yadava king Madhu and satvat's son bhima was contemportary with Prbhu Ramchandra.Bhima recovered the city of mathura from ikshvakas after the death of Shriram and his brothers andhaka ,son of bhima satvata was contemporary with kusha,son of rama." तसेच अधंक,व्रुष्णी,कुकुरा,भोज व शैनेय हे सात्वताचे वंशज होत. [5] अंधक = अंधक हा भिमाचा पुञ व सात्वताचा नातु होय.याचे राज्य मथुरेत होते.तसेच पाणीनीने अष्टध्यायी मध्ये म्हटले आहे कि," अंधक हे क्षत्रियगोत्री असुन त्यांचा एक संघ आहे व त्यानी राज्य स्थापले." In mahabharata,the allied army of the andhakas,the bhojas,the kukuras and the vrishnis in kuruskhetra war was led by kritavarma,son of hridika,an andhaka,but in the same text,he was also referred as a bhoja of mrittikavati. [6] व्रुष्णी The Vrishinis= व्रुष्णी हा सात्वताचा पुत्र असुन त्याच्या वंशात भगवान श्रीक्रुष्ण जन्मले.व्रुष्णीचा उल्लेख तैतरीय संहिता,तैतरीय ब्राह्मण,शतपथ ब्राह्मण व जैमिनिय उपनिषदात आढळतो. पाणिनीने अष्टाध्यायात म्हटले आहे,"व्रुष्णी क्षत्रिय गोत्री असुन त्यांचा एक संघ आहे व त्यानी राज्य स्थापले." तसेच महाभारतातील शांतीपर्वात{81.25}-कुकुरा,भोज,अंधक व व्रुष्णी यांचा एकत्रित एक संघ असुन त्यांचा प्रमुख वासुदेव श्रीक्रुष्ण असल्याचा उल्लेख आहे.तसेच पुराणात-व्रुष्णी हा सात्वताच्या 4 पुत्रापैकी असुन त्यास 3 पुत्र -अनामिञ, युधाजित व देवामिढुषा.देवामिढुषास शुरा नावाचा पुत्र होता आणी वासुदेव हा शुराचा पुत्र असुन बलराम व श्रीक्रुष्णाचे पुत्र होत.भगवान श्रीक्रुष्ण-प्रद्युम्न-अनिरुद्ध-वज्र-प्रतिबाहु-सुबाहु-द्रुढबाहु/द्रुढप्रहार-सेऊणचंद्र आणी हाच सेऊणचंद्र हा महाराष्ट्रातील देवगिरीचे यादव मराठा क्षत्रिय साम्राज्याचा मुळपुरुष होय व देवगिरीच्या यादवांची एक शाखा म्हणजे सिँदखेडकर जाधवराव होत, अशाप्रकारे व्रुष्णी यादव कुळातुन महाराष्ट्रात आलेले यादव-जाधव मराठा कुळ आहे. तसेच प्रद्युम्नास 2 पुत्र-अनिरुद्ध व वज्र, अनिरुद्ध याने काठेवाड,जुनागड येथे जाऊन राज्य स्थापले व वज्र यास 2 पुत्र -क्षीर व नाभ, क्षीरा पासुन जर्ज्य/जाट व जदभान ही दोन कुळे निर्माण झाली, नाभ/ सांब व त्याच्या वंशजानी जैसलमीर, करौली,गजनी व जामनगर अशी राज्ये स्थापली. जैसलमीरच्या भाटी वंशापासुन मराठ्यांचे भोईटे हे कुळ तयार झालेले आहे व करौलीच्या कुळातुन बरीच मराठा जाधवकुळे आलेली आहेत. मथुरेजवळ सापडलेल्या एका शिलालेखात 5 व्रुष्णी विरांच्या प्रतिमा आहेत व त्यांचे संशोधन केलेले आहे व त्या पाच व्रुष्णीवीरांची नावे पुढिलप्रमाणे= संक्रुष्ण,वासुदेव,प्रद्युम्न,अनिरुद्ध व सांबा ही होत आणी याचा उल्लेख वायु पुराणात {97.1-2} आढळतो. तसेच व्रुष्णीचे एक चांदिचे नाणे होशियारपुर,पंजाब येथे सापडले आहे आणी ते सध्या ब्रिटिश म्युझियम लंडन येथे आहे.नंतर व्रुष्णीचे तांब्याचे नाणे,मातीचा शिक्का हे लुधियाना जवळील सुनेत येथे सापडले आहे. {}

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...