विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 June 2023

कुडाळकर शिंदे देशमुख आणि हुमगावकर शिंदे देशमुख यांचा संबंध



कुडाळकर शिंदे देशमुख आणि हुमगावकर शिंदे देशमुख यांचा संबंध
श्री तुबाजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळकर यांचे धाकटे भाऊ श्री ताऊजीराव शिंदे देशमुख यांना एक पुत्र श्री रतनोजीराव शिंदे देशमुख. श्री रतनोजीराव शिंदे देशमुख यांना चौदा गावाच्या देशमुखीचा आणि देश चौगुलकीचा हक्क दिल्याचे पत्र ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ८ मध्ये उपलब्ध आहे.
त्यानुसार शार्वरी नाम संवत्सर श्रावण शुद्ध प्रतिपदा शके १५५७ ( इसवी सन १६३५) या तिथीचे या संदर्भातील पत्र श्री तुबाजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी यांनी त्यांचे पुतणे श्री रतनोजी शिंदे देशमुख यांना लिहिले आहे आणि त्यात रतनोजीराव यांना शपथ घातली आहे की त्याप्रमाणे योग्य वर्तन करावे. तसेच यात चौदा गावांची नावेही उपलब्ध आहेत.
१) हुमगाव
२) बामणोली
३) सोमर्डी
४) वालूथ
५) सनपाने
६) हातगेघर
७) इंदवली
८) राणगेघर
९) मार्ली
१०) आलेवाडी
११) करंदी
१२) करंदोशी
१३) सांगवी
१४) महिगाव
सर्व मानपान आणि तश्रिफ कुडाळकर शिंदे देशमुख यांच्या नंतर हुमगावकर शिंदे देशमुख यांनी घ्यावी असेही म्हटले आहे.
हुमगावकर शिंदे देशमुख यांनी कुडाळ मधून हुमगावमध्ये सर्व बारा बलुतेदार आणि अलुतेदार यांना आणले. हुमगाव हे कुडाळ नंतर दुसरे देशमुखांचे गाव झाले.
कुडाळकर शिंदे देशमुख यांच्या ६३ गावाच्या देशमुखीच्या शिक्यांसारखे हुमगावकर शिंदे देशमुख यांच्याकडेही १४ गावाच्या देशमुखीचा शिक्का, मोर्तब उपलब्ध आहेत.
ही अज्ञात माहिती सादर करताना अतिशय आनंद होत आहे.
फोटो साभार हुमगावकर शिंदे देशमुख
🔭🔭 *संकलन आणि लेखन* ✒️✒️
श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळकर परगणे कुडाळ प्रांत जावळी जिल्हा सातारा.
*संदर्भ-* ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ८ लेखांक २४

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...