“महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा”
एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम।
शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:।
अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:।
रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।(1)
शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:।
अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:।
रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।(1)
“शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात”(1)
उपरोक्त
श्लोकात वर्णनकेले प्रमाणे ‘महारथ’ या शब्दापासूनच मराठा या शद्बाची
उत्पती झाली असे डॉ. भांडारकर नमूद करतात. डॉ. भांडारकर नमूद करतात आपल्या
विवेंचनात नमूद करतात “महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा”
(1) असे या उत्पतीचे विश्लेषण करता येईल. मराठा ह्या शद्बाचा जरी एका जात
समुहासाठी उपयोग केला जात असला,तरी इतिहासात या शद्बास फार मोठी मान्यता
आहे. मराठा या शद्बात स्वराज्याची कित्तेक यज्ञकुंड-अग्निहोत्र सामवलेली,
शेतक-याच्या नांगराची तलवार बनविण्याची क्षमता आणि महाराष्ट्राधर्माची
केसरी पताका यामध्ये सामावलेली आहे. महाराष्ट्रात यादवांचे राज्य नष्ट
झाल्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच
नव्हता. अशा परिस्थितीत स्वराज्य निर्मीती आणि आत्म गौरवासाठी बेलभंडारा
हाती घेणारी इतिहास प्रसिध्द अशी क्षत्रिय जमात म्हणजेच मराठा होय.
नष्टा धर्माः शतधा शाश्वतास्ये
क्षात्रेण धर्मेण पुनः प्रवृद्धाः।
युगे युगे ह्यादिधर्माः प्रवृत्ता
लोकज्येष्ठं क्षात्रधर्मे वदन्ति ॥
(महाभारत)(2)
क्षात्रेण धर्मेण पुनः प्रवृद्धाः।
युगे युगे ह्यादिधर्माः प्रवृत्ता
लोकज्येष्ठं क्षात्रधर्मे वदन्ति ॥
(महाभारत)(2)
कित्येक
काळांपासून चालत आलेले धर्म अनेक वेळेस नष्ट झालेले आहेत, परंतू क्षात्र
धर्माने त्यांचा उद्धार आणि प्रसार केलेले आहे. युगा-युगात आदिधर्म
(क्षात्रधर्म) ची गरज दिसून आलेली आहे, म्हणूनच क्षात्रधर्म लोकांमध्ये
सर्वात श्रेष्ठ आहे. (2) या क्षत्रिय धर्माची जोपासणा आणि वृध्दी
महाराष्ट्राती प्रत्यकाने आपल्यापरीने करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
राष्ट्रकुट, चालुक्य, मोर्य,परमार इत्यांदी पासून ते भोसले, पवार, शिंदे,
मोहिते, होळकर अशा अनेक कुळांनी या यज्ञकुंडात आपल्या आहुती दिलेल्या
आहेत. भगव्या झेंड्यासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी आपले जीवन सुध्दा
तुच्छ मानले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्त शके 1837 नुसार,
औरंगाबाद येथील भगवंतराव यादव मुनशी नांवाच्या कवीने चौपन्न श्लोकांचे एक
लहानसें स्तुतिपर काव्य रचून ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांस अर्पण केले
होते.(3) त्यांत बाळाजी विश्वनाथापासून नानासाहेबांपर्यंत झालेल्या
ऐतिहासिक पुरुषांचे काव्यमय वर्णन आले आहे. तसेच आपल्या कुलधर्माचे पालन
करत स्वराज्याच्या सेवेत कर्तृत्व गाजवणा-या काही घराण्याचा उल्लेख केलेला
आहे. कवि मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी याबद्दल उल्लेख करताना
लिहतो-
ज्याच्या दुंदुभिचा ध्वनी करितसे दिग्व्याळ बाधिर्यता ।
शौर्ये वीर्ये पराक्रमे निज यशें शोभे ध्वजा उन्नता ॥
गायकवाड पवार जाधव भले ब्रीदें जया साजती ।
सेनाधीप असंख्य थोर कुळिचे वर्णू तयातें किती ॥
शौर्ये वीर्ये पराक्रमे निज यशें शोभे ध्वजा उन्नता ॥
गायकवाड पवार जाधव भले ब्रीदें जया साजती ।
सेनाधीप असंख्य थोर कुळिचे वर्णू तयातें किती ॥
No comments:
Post a Comment