इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)
ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट.
आपल्या
समाजात फार पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अनेक स्त्रियांचे हाल झाले, स्त्रियांना नेहमीच
दुय्यम स्थान देण्यात आले. परंतु सध्या हि परिस्थिती फार सकारात्मकरित्या
बदलली आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले गुण सिद्ध करतात आणि
बरेचवेळी पुरुषांनादेखील मागे टाकतात.
या
बदलाची सध्या आपल्याला सवय जडली आहे त्यामुळे आपण स्त्रियांच्या या
बदलत्या गोष्टींकडे बरेच दुर्लक्ष करतो, पण ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल
आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी
अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट. हि कहाणी आहे उमाबाई
दाभाडे यांची, ज्यांनी मराठ्यांच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतिहासात
नावलौकिक मिळविला.
उमाबाई दाभाडे
उमाबाई
यांच्या जन्मसालाबद्दल इतिहासात विश्वसनीय नोंद सापडत नाही परंतु, हे
नक्की समजते कि त्यांचा जन्म नाशिक मधील अभोणे येथे झाला. उमाबाई या
अभोणच्या देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होय. कालांतराने उमाबाईंचा
विवाह खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला आणि खंडेराव दाभाडे यांच्या तीन
पत्नींपैकी उमाबाई सर्वांत लहान होत्या. तसेच उमाबाई व खंडेराव यांना
त्रिंबकराव, यशवंतराव आणि सवाई बाबुराव अशी तीन मुले व शाहबाई, दुर्गाबाई व
आनंदीबाई अशा तीन मुली अशी एकूण ६ अपत्ये झाली.
उमाबाईंनी कहाणी
दाभाडे
घराणे शिवरायांच्या काळापासूनच मराठ्यांच्या सैन्यात होते. याच घराण्यात
जन्मलेले खंडेराव दाभाडे यांच्याशी उमाबाईंचा विवाह झाला. पुण्यानजीक
तळेगाव हे दाभाडे घराण्याचे वतनाचे गाव होते. खंडेराव हे मराठा
साम्राज्याचे सरदार होते, त्यांच्या अनेक अतुलनीय कामगिरीनंतर त्यांना शाहू
राजांकडून सेनापती घोषित केले गेले. बाजीराव पेशवा जेव्हा
स्वराज्यविस्ताराचे कार्य करीत होते तेव्हा खंडेराव स्वतः गुजरातच्या
मार्गाने कार्य करीत होते. पुढे मग दाभाडे घराण्याकडे गुजरातमधील अनेक
प्रांतांचे अधिपत्य आले आणि त्यांनी उत्तमरीत्या ते सांभाळले.
सुमारे
१७२९ मध्ये खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मोठा मुलगा
त्रिंबकराव गादीवर आला. गुजरात कडून मिळणारी चौथ व सरदेशमुखी हे दाभाडे
घराण्यासाठी महत्वाचे उत्त्पन्न साधन होते परंतु पेशवा बाजीराव व
त्रिंबकराओ यांच्यात याच गुजरातच्या विषयावरून वाद झाले पुढे हे वाद
विकोपाला गेले आणि डभोई येथील लढाईत सुमारे १७३१ मध्ये बाजीरावांनी
त्रिंबकरावांना पराभूत करू
No comments:
Post a Comment