भाग ७
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
१० ) गोव्याची लढाई
आपली
शेवटची स्वारी आहे गोव्याची. शंभूराजांनी अनेकदा गोव्यावर स्वारी केली पण
त्यांना बरेच वेळा अर्ध्यातूनच माघारी यावे लागत होते हे आपण पहिलेच आहे.
या आधी जुवे बेटावर सुद्धा शत्रूला पूर्ण धडा शिकविता आला नव्हता आणि
फोंडा किल्ल्यावर केलेल्या हल्ल्याची परतफेडही राहिली होती. याचसाठी
शंभूराजांनी पुन्हा गोवा मोहिम हाती घेतली आणि ६००० स्वार आणी १०,०००
सैन्य घेऊन शंभूराजे आगेकूच करते झाले. वाऱ्याच्या वेगाने जात शंभूराजांनी
डिसेंबर १६८३ दरम्यान बारदेश आणि साष्टी येथे हल्ला केला, सोबतच मडगाव,
रचोळ वगैरे ताब्यात घेतले आणि पुढे रायतूरच्या किल्ल्याला वेढा घातला.
एवढ्यावरच
न थांबता मराठ्यांनी शापोरा, थिये वगैरे ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली
आणली. एक, दोन नव्हे तर तब्बल २६ दिवस शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी
फौजांनी हलकल्लोळ माजविला होता, संपूर्ण गोवा मराठ्यांच्या प्रभावाखाली
होता आणि या काळात मराठ्यांना विरोध करत आलेल्या प्रत्येक शत्रूची
मराठ्यांनी अशी काही दाणदाण उडविली कि सारेच फिरंगी सैन्य जीव मुठीत घेऊन
सैरावैरा पळत सुटले. मराठ्यांवर फिरंग्यांनी केलेल्या आधीच्या प्रत्येक
हल्ल्याची परतफेड मराठी सैन्यांनी व्याजासकट केली असे म्हणायला हरकत नाही.
हा सगळा धुमाकूळ घालून मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठीं शंभूराजे
स्वराज्यात रायगडावर पोहोचले.
तर,
या दोन भागांत आपण ज्या लढायांचा आढावा घेतला त्या लढाया तर
शंभूराजांच्या जीवनातील एक छोटासा भाग आहे. शंभूराजांनी आपली सारी
कारकीर्दच अशी धावत, पळत, लढत आणि स्वराज्य रक्षण व विस्तारात घालविली.
मराठ्यांच्या प्रत्येक शत्रूला शंभूराजांनी वेळोवेळी पूर्ण ताकदीनिशी धडा
शिकविला आहे. शिवरायांनी स्वराज्य घडविले आणि शंभूराजांनी स्वराज्य पुढे
त्याच जिद्दीने, मेहेनतीने आणि निष्ठेने जपले, वाढविले आणि बळकट केले.
शंभूराजांच्या या शौर्याबद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच पण या सर्व
लढायांवर नजर फिरविली कि एक मात्र नक्की समजते कि शंभूराजांसारखे आदर्श
व्यक्तिमत्त्व या जगात पुन्हा होणे नाही.
No comments:
Post a Comment