पूलकेशी दुसरा बादामीच्या चालुक्य घराण्यातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा होता. आपला पिता कीर्तीवर्मन याच्या मृत्युसमयी तो अल्पवयी असल्याने त्याचा चुलता मंगलेश हा राज्य करू लागला. पुढे पुलकेशी वयात आल्यावर त्यास राज्य न देता मंगलेश यांनी आपल्या मागून आपला मुलगा सत्याश्रय ध्रुवराज इंद्रवर्मन गादीवर यावा, अशी खटपट मंगलेशने सुरू केली. तेव्हा पुलकेशीला त्याच्याशी लढावे लागले. त्यात मंगलेश मारला जाऊन पुलकेशी गादीवर आला.पुलकेशी दुसरा हा महान शक्तिशाली राजा होता. त्याची राजधानी बदामी ( वातापी ) होती. त्याने शत्रूचा नाश करून राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्याने श्रीपृथ्वीवल्लभ, परमेश्वर व सत्याश्रय या पदव्या धारण केल्या होत्या. त्याने अंतर्गत विद्रोहचा बंदोबस्त केला, कदंबाची राजधानी वनवासीवर आक्रमण करून कदंबचा पराभव केला. आलूप आणि गंग राजाचाही पुलकेशी याने पराभव केला, यावेळी गंग राजाने आपल्या मुलीचा विवाह पुलकेशीबरोबर केला.वल्लभीच्या प्रश्नावरून पुलकेशीचे हर्षवर्धन बरोबर युद्ध झाले. या युद्धामध्ये हर्षवर्धन याचा पराभव झाला.
पुलकेशी दुसरा हा चालुक्य वंशातील सर्वश्रेष्ठ शक्तिशाली राजा होता. तो महान विजेता, महान सेनापती आणि उच्चकोटीचा राजकारणी होता. पुलकेशी दुसरा याची प्रसिद्धी बाह्य देशातही पसरली होती. मुस्लिम इतिहासकार अलतबारी याने लिहिले की पुलकेशीने इराणचा राजा खुसरो दुसरा याच्याशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले होते. त्याच्या दरबारात आपला एक राजदूत पाठीवला होता. खुसरो दुसरा याच्याकडून आलेल्या राजदूतांचे स्वागत ( इ. स. 625 ) पुलकेशीने केले होते. अजिंठा येथे एका लेणीत पुलकेशी दुसरा हा इराणी दुतमंडळाचे स्वागत करत असल्याचे चित्र आहे. पुलकेशी दुसरा हा प्राचीन भारतातील महान सम्राटापैकी एक होता. त्याचा मृत्यू पल्लव राजा नरसिंहवर्मन येच्याची लढता लढता झालेल्या धामधूमीत इ. स. 642 मध्ये झाला.
पुलकेशीचे साम्राज्य उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस कावेरीपर्यंत आणि पश्चिम ते पूर्व समुद्रापर्यंत पसरले होते. यांतील काही प्रदेशांवर उदा., गुजरात, उत्तर कोकण, आंध्र यांवर त्याने आपले पुत्र व नातलग यांना नेमले होते. त्याची दुसरी राजधानी महाराष्ट्रात नासिक येथे असावी. चिनी यात्रेकरू ह्यूएनत्संग याने त्याला महाराष्ट्राचा राजा म्हटले आहे. तो त्याच्या दरबारी ६४१–४२ मध्ये आला असावा. त्याने तत्कालीन महाराष्ट्र देशाचे व तेथील लोकांचे वर्णन आपल्या प्रवासवृत्तात केले आहे.
No comments:
Post a Comment