१५ जुलै इ.स.१६७४
( आषाढ , शके १५९६, )
पेडगाव च्या किल्ल्याची लूट
पेडगावचे शहाणे ,येड घेऊन पेडगावला जाणे या म्हणी आजही प्रचलित आहेत.त्या इथल्या घडलेल्या घटनांची आठवण करून देण्यासाठीच....
श्रीगोंदे तालुक्यातील पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला तसा चालुक्य यादव काळापासून पुढे नगरच्या निजामशाहीत मालोजीराजे भोसले यांच्या जहागिरीचा भाग राहीलेला हा भुईकोट नंतर मोगलांच्या कडे आला .हा भुईकोट किल्ला अनेक घटनांचा साक्षीदार राहिलाय.मोगलाईत इथ औरंगजेबाचा मावसभाऊ बहादूर खान याला छत्रपतीच्या राज्यभिषेक सोहळ्यानंतर या बहादूर खानाला उल्लू बनून छत्रपतीच्या मावळ्यांनी कस आस्मान दाखवले याचा हा स्मरण दिवस आहे.
( पेडगावला मराठ्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते सुरेख रणनीतीनुसार बहादूर खानाच्या छावणीतुन धन प्राप्त झाले. सुमारे एक कोटी रोख आणि २०० जातिवंत घोडे स्वराज्यात आणले गेले.
औरंग्याला नजर होणारा नजराणा हंबीररावांनी शिवरायांना पेश केला. एक कोटीच्या आसपास लूट ही मिळली.
श्री.छत्रपती च्या शिवराजाभिषेकचा खर्च यातून भरून निघाला)यावर चित्रपट ही आले.
•
औरंगजेबाचा मावसभाऊ दख्खनची सुभेदारी असलेला बहादूरखान कोकलताश यास दिली. बहादूरने पुण्याच्या पूर्वेस चोवीस कोसांवर, भीमेच्या काठीं पेडगाव येथे आपली कायमची छावणी ठोकली. पेडगावास बळकट किल्ला करून त्याने त्याला नांव दिले, बहादूरगड.. महाराजांनी एकूण नऊ हजार फौज गार दौंडकडे बहादूरखानाशी खेळायला सोडली. फौजेचा सेनाधुरंधर कोण होता हैं ठाऊक नाहीं, पण त्याने मोठीच गम्मत उडवून दिली. त्याने आपल्या फौजेच्या दोन टोळ्या केल्या. एक टोळी दोन हजारांची अन् दुसरी सात हजारांची. सात हजारांची टोळी अगदी गुपचूपपणे पेडगावपासून थोडी दूर सावध ठेवली आणि दोन हजारांची टोळी खानाच्या रोखाने चाल करण्यासाठी दिली सोडून! काय करायचें हें आधी पुरतें ठरलेलें होतें. खानाच्या छावणीवर मराठी फौज चालून येत आहे, असें समजताच खानाने आपल्या मोंगली फौजेला तयार होण्याचा हुकूम सोडला. जलदीने मोंगली फौज जय्यत झाली. खानाने सर्व फौजेसह मराठ्यांच्या पाठलागावर घोडे सोडले. पेडगावांत फारसे कुणी उरलेच नाही ! सर्व फौज घेऊन खान गेला! दोन हजार मराठ्यांच्या टोळीने खानाला अंगावर येऊं दिलें, पण लढाईला उभी न राहता, ही टोळी सारखी हुलकावण्या देत मागे पुढे होत राहिली. खान चिडून मराठ्यांना गाठण्यासाठी पाठलाग करीत राहिला आणि जवळ जवळ पंचवीस कोसांपर्यंत त्यांनी खानाला पेडगावापासून दूर आणलें !
इकडे दबून राहिलेली सात हजार मराठ्यांची टोळी पाळत राखीत होती. खान खूप दूर गेल्याची खात्री झाल्यावर, मराठे एकदम पेडगावावर चालून आले! तिथे असलेल्या मूठभर मोंगलांना का ही धड़क सोसणार ? कुठल्या कुठे पाचोळा उडाला आणि मराठ्यांनी बहादूरच्या छावणीची साफ लूट केली. एक कोटि रुपयांचा खजिना त्यांना गवसला ! अचानक केवढे घबाड मिळालें हें! आणि शिवाय अतिशय उत्कृष्ट
दोनशे अरबी घोडे सापडले! बहादूरखानाने औरंगजेबाला नजर करण्यासाठी आणले होते. एवढी मौल्यवान कमाई करून मराठ्यांनी मोंगली छावणीचे सर्व पेटवून दिले। पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली! सर्व लूट घेऊन मराठे पसार झाले.
तिकडे बहादूरखान दोन हजार मराठ्यांचा पाठलाग करून करून दमला. मराठे अखेर हाती लागले नाहीत ते नाहीतच। खान माघारी फिरला. फुकटच बिचाऱ्याचा धाम निघाला आणि तो पेडगावला आला. अन् तेथे येऊन बघतो तो ? हाय रे खुदा! सगळी माती झाली होती! दावा साधला या सैतानी मराठ्यांनी ही मराठी भुते आली ही कशी? पार सगळे तळपट की हो केलें! खानाचे मस्तक कुंभाराच्या चाकासारखें समरू लागले आणि तो पुढे पाहतो तो एकहि घोडा जागेवर नाही। एकहि छदाम खजिन्यांत नाही!
केवढ्या सफाईने फसविलें मराठ्यांनी ! मराठी अकलेचा अस्सल नमुना खानाला मराठ्यांनी पेश केला. खान तरी कसा हा असा ? पेडगावचा बंदोबस्त करून, मग तरी जायचे त्याने. पण ! काय म्हणावें या खानाला ? - पेडगावचा शहाणा! एक कोटीचा खजिना महाराजांना मिळाला. राज्याभिषेकाचा सर्व खर्च बाहेर पडला ! (इ. १६७४ जुलै १५ सुमार)
दुसऱ्या एक प्रसंगात ही महाराजांनी बहाद्दूर खान बरोबर तह करण्याचे ठरवले आणि बहादूरखान यांनी ही तहाचा अर्ज औरंगजेबाला पाठवला त्यात
औरंगजेबाकडून महाराजांच्या त्या अर्जाला मंजुरी आली! सतरा किल्ले व भीमेच्या उत्तरेकडील प्रदेश आपल्या स्वाधीन करून, शिवाजी आपल्या पोराला पुन्हा शाही चाकरीसाठी पाठविण्यास तयार झालेला पाहून औरंगजेब खूष झाला. म्हणजे, हिंदूंचा तख्तनशीन बादशाह होण्याची शिवाजीची घमेंड जिरली ! मुकाट्याने दिल्लीपुढे गुडघे टेकावेच लागले! हे घडवून आणण्याची करामत आपल्या बहादूरखानाची ! शाबास ! औरंगजेबाने बहादूरवर निहायत खूष होऊन त्याची मनसब वाढविली आणि एक हत्ती बक्षीस म्हणून त्याच्याकडे पाठवून दिला!
तसे फर्मानहि त्याने बहादूरकडे पाठवून दिलें (जुलै २२ पूर्वी, १६७५).
मग अर्जमंजुरीचें फर्मान आले आहे. तरी फर्मानाचा बहादूरखानाने महाराजांकडे हा आनंदाचा निरोप आपल्या वकिलांबरोबर पाठविला की, बादशाहाकडून आपणास आपल्या स्वीकार करून ठरलेले किल्ले आमच्या स्वाधीन करण्याची तजवीज करावी.
महाराज या कृपेच्या व 'मागील सर्व अपराधांची क्षमा करणाऱ्या शाही. फर्मानाची वाटच पाहत होते. वकील आले आणि महाराजांनी त्यांचे ऐकून घेऊन त्यांना सरळ विचारले की, असा कोणत्या पराक्रमाचा दबाव तुमच्या खानसाहेबांनी आमच्यावर आणला आहे म्हणून आम्ही तुमच्याशी असला तह करावा? तुम्ही ताबडतोब येथून चालते व्हा !! नाही तर अपमान पावाल !!
भलतीच थप्पड बसली! बहादूरचे वकील ताबडतोब निघून आले. खानाने त्यांना उत्सुकतेने विचारलें. तेव्हा वकिलांनी ही सर्व आंबटढाण हकिगत बहादूरला सांगितली. बहादूरच्या डोळ्यापुढे चंद्र, सूर्य, तारे एकदम लखाखू लागले! केवढी ही बेअब्रू ! तहाच्या नांवाखाली तीन महिने झुलत ठेवून या हरामखोर मराठ्याने साफ तोंडघशी पाडले !
बहादूरला मेल्याहून मेल्यासारखें झालें. चिडून काय उपयोग ? काहीहि उपयोग नाही ! पावसाने भिजविलें अन् मराठ्यांनी फसविलें, तर तक्रार करायची कुठे? बहादूरचें डोकें सुत्र झालें.
अन् औरंगजेबाचें डोकें भडकलें ! त्याला बहादूरचा अत्यंत राग आला. ही काय थट्टा मांडलीय ! शिवाजी तहाला तयार झाला म्हणे! सतरा किल्ले देतोय म्हणे ! संभाजी पुन्हा नोकरीस येणार म्हणे! थट्टा सगळी! खरोखरच महाराजांनी या मिजासखोर शहेनशाहाची आणि बहादूरची थट्टाच उडविली. बहादूरला बढती आणि हत्ती मिळाला होता! बहादूरला त्या हत्तीकडे बघवतहि नसेल! बादशाहांचे कृपेचें फर्मान म्हणजे केवढी मोठी गोष्ट समजण्यांत येई ! ज्याच्या नांवाने असे फर्मान येई त्याने अति नम्रतेने, कोस दोन कोस पायी सामोरे जाऊन तें स्वीकारलें पाहिजे व तें डोक्यावर घेऊन आणले पाहिजे, असा मिजासखोर रिवाज बादशाहत होता. बादशाहाच्या सर्वच गोष्टींचें फाजील स्तोम माजविण्याची व निष्ठा व्यक्त करण्याची आचरट वहिवाट बादशाहीत होती. पण महाराजांनी या फर्मानांची दखलसुद्धा घेतली नाही.
साभार ; राजा शिवछत्रपती ,स्व.श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे
शिवाजी साळुंके ,श्रीगोंदे
No comments:
Post a Comment