विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 2 July 2023

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षं...

 

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षं...
लेखन ::रामेश्वर जाधव पाटील


जालना-औरंगाबाद जिल्ह्यातील हसनाबाद हा रझाकारांचा अड्डाच होता.पिंपळगाव कोलते कॅम्प हा निझामाच्या अमलाखाली असलेल्या भागात असल्याने.या कॅम्पवरील मुक्ती सैनिकांना अनेक वेळा निझामी पोलीस,रझाकर,आणि जालना येथील निजामी मिलिटरी झुंज द्यावी लागे.
पिंपळगाव कोलते हा कॅम्प बाबुराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या पिंपळगाव कोलते पासून दुर्गम ठिकाण असलेल्या लोहगढ नांद्रा येथे उभारला गेला होता.लोहगढ नांद्रा च्या परिसरात महादेवाचे पौराणिक शिवमंदिर, टेकडावर प्राचीन काळात खडक कोरून तयार तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या व घनदाट जंगल असल्याने लपायला ही भरपूर सुरक्षित जागा असल्यानी मुक्ती सैनिकांनी या ठिकाणी कॅम्प उभारला होता.मुक्ती सैनिक दिवसभर कॅम्प वर राहुन रात्री परिसरातील गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन लोकांना मराठवाडा मुक्ती संग्रामा विषयी माहिती देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला.याचं भेटीगाठीतून परिसरातील २० ते २५ गावाच्या पोलीस पाटलाचे राजीनामे घेण्यात मुक्ती सैनिकांना यश आले.व त्या गावातील नागरिकांना मुक्ती लढ्यात सामील करण्यात आले. कॅम्प वरील सैनिकांनी एक महिन्यात परिसरातील सर्व गावे स्वतंत्र म्हणून घोषित केली. निझामी पोलिसांचा व रझाकारांचा वचक नाहीसा व्हावा म्हणून अनेकदा त्यांच्याशी झुंज हि दिली.कॅम्प अधिक प्रभावी व्हावेत म्हणून कॅम्प प्रमुखाना गनिमी लढाईच्या प्रशिक्षणासाठी विजयवाड्याजवळ असलेल्या पटीयार येथे पाठवल्या जात असे.कॅम्प प्रमुख बाबुराव जाधव प्रशिक्षणासाठी गेल्या नंतर कॅम्प ची जबाबदारी सह प्रमुख लाला लक्ष्मीनारायण याच्यावर सोपवण्यात आली होती .कॅम्प प्रमुखात बदलाचा काहीही परिणाम कॅम्प वर झाला नाही. मुक्ती सैनिक आणि रझाकार यांच्यात बऱ्याच चकमकी घडल्या.....
■ मुक्ती सैनिकांची रझाकरांशी ""सावखेडा"" येथे झालेली चकमक (१८ जून १९४८) :-
तत्कालीन औरंगाबाद जिह्यातील हसनाबाद येथे रझाकारांचा अड्डाच होता.याच अड्डयावरील रझाकार १८ जून १९४८ रोजी शस्त्रासह जवळच असलेल्या सावखेडयात आले. चारशे लोकसंख्या असलेल्या सावखेच्या गावकऱ्यांकडून रझाकारांनी बंदुकीच्या धाकावर दमदाटी करून बोकड,व इतर सामानाची लूट केली. रझाकारांनी लूट केलेले बोकड कापून डेग पेटून हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेल्या मंदिर परिसरात मांस शिजायला टाकले.सावखेडा परिसरात पाऊस ही सुरू होता. जवळच असलेल्या अंजना नदीला पुर ही आला होता.रझाकारांच्या या चिथावणीखोर कृत्याची माहिती कॅम्पवर धडकली होती.माहिती मिळताच कॅम्प प्रमुख लाला लक्ष्मीनारायण यांनी कॅम्प वरील मुक्ती सैनिकांसह शस्त्रासह सावखेडयाला पोहोचले. गावाला वेढा टाकला. स्फोटके,आणि बंदुकीचा बार उडवत जोरदार घोषणादेत रझाकारांवर हल्ला केला.मुक्ती सैनिकांचे रुद्र रूप पाहून रझाकारांची पुरती गाळण उडाली. अंगावरच्या कपड्यानिशी उड्या टाकून रझाकार हसनाबादकडे पळून गेले.सोबत असलेले शस्त्र व काही सामान बरोबर नेण्यासाठी त्यांना सवडही मिळाली नव्हती.
((पंचनामा करत असताना तत्कालीन पोलीस पाटील यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले आमच्या गावात काहीच झाले नाही त्यामुळे गावात एकही स्वातंत्र्य सैनिक नाही.))
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...