विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 July 2023

महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाधी शिलालेख साखराउ निंबाळकर समाधी:🚩🚩 शिलालेख वाचन

 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाधी शिलालेख🌞🌞🌙🌙 
भाग-१
🚩🚩












साखराउ निंबाळकर समाधी:🚩🚩 शिलालेख
वाचन
१. || श्री गुरु बोधला बाबा ||
२. श्री गणेश
३. श्री व्रंदावण मातुश्री
४. साखराउ निंबाळकर
५. सन ११४९ सीधार्थी संवत्सर
शक १६६१ भाद्रपद शुध्द ...
इसवीसन १७३९
-----------------------------------
ग्राम:-फलटण शहर, जि सातारा
व्यक्तीनाम-भगवान श्रीकृष्ण, वीर अर्जुन, गुरू बोधला महाराज (धामणगाव कर) , मातोश्री साखराउ नाईक निंबाळकर (फलटण)
कारकीर्द-छत्रपती थोरले शाहू महाराज
घराणे:- नाईक निंबाळकर फलटण येथील समाधी वरील शिलालेख
कालखंड-सन ११४९अर्थात शक १६६१इ.स १७३७होय
सदर शिलालेख हो फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरवाडी व महाराणी सईबाई साहेब राणी सरकार यांचे माहेर आहे. छत्रपती संभाजी महाराजांची आजोळ असुन येथील फलटणला नाईक निंबाळकर घराण्याची स्वतंत्र समशान भूमी आहे तेथील साखराउ साहेब नाईक निंबाळकर राणी सरकार यांच्या तुळशी वृंदावन समाधी वर सदर शिलालेख आहे सदर शिलालेखात पूर्व बाजूला वरील भागात त्यांचे गुरू धामणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील बोधले महाराज आहेत म्हणून गुरुंचा उल्लेख सर्व प्रथम केला आहे
बोधले महाराज प्रसन्न.
यानंतर श्री गणरायांचा उल्लेख आहे
सदर समाधी वृंदावन साखराउ निंबाळकर असा उल्लेख आहे तर पूर्वे आणि दक्षिण भागात दोन्ही बाजूला गीतेतील सप्त श्लोक कोरण्यात आले आहेत.
या शिलालेखात गीतातील भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरक्षेत्राच्या लढाईत सांगितले ले सप्त श्लोक येथे कोरलेले आहे जो जीवन, ज्ञान व ईश्वर भक्तीचे महत्त्व सांगत आहेत जो मुत्यु नंतर मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे तो सप्त श्लोक मधून सांगितले आहे.
-------------------------------------
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।
य: प्रयाति त्यजन्देह स याति परमां गतिम्।।1।।
अर्थ-ॐचे उच्चार- माझे स्मरण करताना जो आपला देह त्याग करता तो सर्वोच्च पापातुन मुक्त होते.
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघा:।।2।।
अर्थ:-देव श्रीकृष्ण यांचे किर्तन जगात आनंद पसरवतात व वाईट शक्ती ना पळवुन लावतात
सर्वत:पाणिपादं तत्सर्वतोSक्षिशिरोमुखम् ।
सर्वत:श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ।।3।।
अर्थ:-देवाचे हात ,पाय,मुख नेत्र कान असतात ते सर्वत्र असतात
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तान्।।4।।
अर्थ:-मी तो देव श्रीकृष्ण यांचे स्मरण करतो, जो सर्वज्ञ, अनादि, निरंतर, सुक्ष्म पासुन हे सुक्ष्म आहे व सगळ्यांचा आधार देणारे आहे तो सर्वाचा पालन करणार आहे . तो सूर्यासारखा तेजस्वी आहे अज्ञान दूर करणार आहे.!!
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।5।।
अर्थ:- ज्यांने त्या पिंपळाच्या वृक्षास समजून घेतले आहे देवा आकाशात वर आहे म्हणून झाडाच्या फांद्या वर जातात कारण ते झाडाचा प्रपंच आहे. त्या झाडाची पाने म्हणजे वेद मंत्र आहेत. म्हणून त्यांना देव समजला आहे.!!
सर्वस्य चहं हृदि सन्निविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।6।।
अर्थ:- सर्वाच्या हृदयात मी अंतर्यामी होऊन मी निवास करतो. ज्ञान, स्मरण, शक्ती, चिंतन करणारे शक्ती म्हणजे मी आहे. वेदातून मला सांगितले व ओळखले जाते. वेदातील ज्ञान म्हणजे मी आहे. वेदातील देव मी श्रीकृष्ण आहे.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण:।।7।।
अर्थ:-माझे सतत स्मरण करणारे. पुजन करणारे, व नमन करणारे माझे प्रिय भक्त आहेत व तेच मला मिळवणार आहेत.
इति श्रीमद्भागवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे सप्तश्लोकी गीता सम्पूर्ण ।
अर्थ:-इथे श्रीमध्दागीतातील ब्रम्हविद्या, योगशास्त्रा वरील भगवान श्रीकृष्ण व अर्जुन सप्तश्लोकी गीता पुर्ण झाले आहे
शिलालेख वाचन:--संतोष झिपरे, कृष्ण गुडदे लातूर, रोहन होनकळस सोलापूर,
सदर शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिलालेख पैकी एक आहे जो साखराउ नाईक निंबाळकर फलटण यांच्या समाधी वर कोरलेले आहे जो मराठ्याच्या इतिहासातील दुर्मिळ ठेवा आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिलालेखात सर्वोच्च आहे
भाषा:-देवनागरी मराठी व मोडी लिपी.
यावेळी सातारा जिल्ह्यातील आमचे परममित्र मा. श्री. राहुल भोईट( अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष) व इतिहास संशोधक राहुल ऊर्फ पोपटराव बर्गे फलटण आदि मित्र परिवारासह समाधी स्थळ भेट देऊन दर्शन घेतले याकामी दोन्ही मडंळीने सहकार्य लाभले
कम्रश:-भाग दोन लवकरच
आपले
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष :- संतोष झिपरे
9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...