विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 24 July 2023

१० जानेवारी १७५१-मराठ्यांची राजपुतांकडून जयपुरात दगाबाजीने भीषण कत्तल.

 

मराठेशाहीतील अपराचीत इतिहास

१० जानेवारी १७५१-मराठ्यांची राजपुतांकडून जयपुरात दगाबाजीने भीषण कत्तल.
लेखन :प्रकाश लोणकर
औरंगजेब मेल्या नंतर मोगल दरबारी मंडळीत दोन गट तयार झाले.एक होता इराणी व दुसरा तुराणी.दोन्ही गटांचे ध्येय जरी एकच होते-मोगल साम्राज्याचे संरक्षण करणे-तरी ते कशा पद्धतीने म्हणजे कुणाच्या पाठींब्याने करायचे यात मतभेद होते.इराणी गटाचे म्हणणे असे होते कि भारताबाहेरील कुणाला मदतीस ण घेता येथीलच मराठे,राजपूत ,शीख व अन्य राजे राजवाड्यास मदतीस घ्यावे.तर तुराण्यांची भूमिका अशी होती कि गरज पडली तर विदेशी सत्ताधार्यांची मदत घ्यावी.इराणी गटात मराठे,राजपूत व इतर भारतीय संस्थानिक,इराणी वंशाचे शिया सरदार होते तर तुरान्यांमध्ये अफगाण,तुर्की तसेच मध्य आशियातून आलेल्या पण येथे स्थिर झालेल्या सुन्नी उमराव मंडली होती.
हि पूर्वपीठीका अशासाठी मांडली आहे कि औरंगजेबला २५ वर्षाहून अधिक काळ आपल्या राज्यातच अडकवून ठेवलेल्या मराठा लष्करी ताकदीची नोंद उत्तर भारतात घेतली गेली होती.तसेच बाळाजी विश्वनाथ,थोरले बाजीराव ,चिमाजी अप्पा,त्यांचे सरदार होळकर,शिंदे,पवार,गायकवाड,जाधव यांनी महाराष्ट्रात,महाराष्ट्राबाहेर गाजवलेले पराक्रम यामुळे इराणी पक्ष तसेच राजस्थानातील सत्ताधीश त्यांच्यातील वाद तंटे मिटविण्यासाठी मराठ्यांना मदतीस बोलावू लागले.अशाच एका वादात आजच्याच दिवशी,२६७ वर्षांपूर्वी-१० जानेवारी १७५१ ला जयपुरात हजारो मराठ्यांची राजपुतांनी विश्वासघात,दगाबाजी करून हत्त्या केली.
औरंगजेब मेला तेव्हा जयपूरच्या गादीवर कच्वाह वंशीय सवाई जयसिंग होता.कच्वाह आणि राठोड वंशीय राजपुतांनि आपल्या मुली मोगलांकडे दिल्या होत्या.तर उदेपुरचे शिसोदे घराणे किंवा महाराणा हे शुद्धतेच्या दृष्टीने इतर राजपूत घराण्यांपेक्षा सर्वोच्य स्थानी होते.त्यामुळे शिसोदे घराण्यातील मुली आपल्या घरात याव्यात असे इतर राजपुताना वाटे,त्यात जयपूरचा सवाई जयसिंग पण होता.त्यांचा विवाह शिसोदे घराण्यातील महाराणा अमरसिंग याच्या मुलीबरोबर-चंद्र कुंवर -६ जून १७०८ ला झाला.पण त्यासाठी वधु पित्याने अटी घातल्या होत्या कि चंद्र कुंवर सगळ्या राण्यात ज्येष्ठ-seniormost राहील,त्यामुळे तिला होणारा मुलगा जयसिंग चा थोरला मुलगा समजला जावा v त्यास जयपूरची गादी मिळावी.मुलगी झाल्यास मुसलमानास देऊ नये.त्यावेळचे लोक कसे धोरणी,मुत्सद्धी होते ते बघा.चंद्र कुम्वारला पहिली मुलगी झाली दुसरा मुलगा झाला-माधवसिंग.पण ईश्वर सिंग नावाचा जयसिंगला अगोदरच एक मुलगा झाला होता जो हिंदू धर्म शास्त्रा प्रमाणे त्याचा वारस होता.सवाई जयसिंग दोन मुलातील वाद सुटण्यापूर्वी च मृत्यू पावला.ह्या वादात मराठ्यांनी -शिंदे-होळकर -मध्यस्थीचे प्रयत्न केले,पण शिंदे v होळकर यांच्या भूमिका परस्पर विरुद्ध होत्या.नानासाहेब पेशव्यांनी होळकर यांचे म्हणणे -ईश्वर्सिंगास गादि दिली तरी माधवसिंह ला पण काही तरी दिले पाहिजे.-मान्य केले.पण त्यास ईश्वर्सिंग कबुल होईना.शेवटी ईश्वरसिंग व होळकरांच्या फौजेत -शिंद्यांनी भाग घेतला नाही-ऑगस्ट १७४८ मध्ये जयपूर जवळ युद्ध होऊन ईश्वरसिंग चा पराभव झाला व त्याने विषारी नाग चावून घेऊन जीव दिला.
माधव सिंग ने त्याला संपूर्ण राज्य मिळाल्या बद्धल मराठ्यांचे कृतद्न्य/ऋणी राहण्याचे सोडून त्यांचाशीच गद्दारी केली.त्याने सर्व मराठा सरदाराना मेजवानीस आमंत्रित करून अन्नात विष घालून मारण्याचा कट रचला होता,पण कुणीच प्रमुख मराठा सरदार तिकडे ण वळल्याने तो बेत फसला.मराठा सैनिकांची अशी ( गैर) समजूत झाली कि माधवसिंह ला सर्व राज्य त्यांच्यामुळे मिळाल्याने तो मराठ्यांना त्रास देणार नाही.दोन एक हजार मराठे सैनिक बाजारहाट करण्यासाठी जयपूर शहरात आजच्याच दिवशी २६७ वर्षांपूर्वी गेले असता कपटाने माधवसिंह ने जयपूर शहराचे दरवाजे बंद करून बाजारहाट करण्यास आलेल्या मराठ्यांपैकी जो सापडला त्यास मारून टाकले.मराठ्यांना त्याच सुमारास दिल्लीकडे जाण्याची घाई होती म्हणून त्यांनी तह करून राजस्थानमधून माघार घेतली.माधवसिंह ने मराठ्यांचा वकील गोविंद तिमाजी ला विष घालून मारले व अहमदशाह अब्दालीस मराठ्यांविरुद्ध लढण्यास आमंत्रण दिले..
( संदर्भ:मराठ्यांचा इतिहास खंड दोन.संपादक अ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...