विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 27 July 2023

राजे लखुजी जाधवराव यांच्या एका शाखेतील एक नवीन अप्रकाशित शिलालेख !!!!! घनसावंगी येथील जाधवराव घराणे माहिती

 

राजे लखुजी जाधवराव यांच्या एका शाखेतील एक नवीन अप्रकाशित शिलालेख !!!!!
राजे लखुजी जाधवराव यांचे 394 पुण्यस्मरण....
तुकाई देवी मंदिर शिलालेख घनसावंगी
हा शिलालेख जालना जिल्ह्यातील घनसावंगी (अंबड) तालुक्यातील कसबे घनसावंगी गावी येथील गावा पासून १ किमी अंतरावरील मेन विद्युत सब स्टेशन शेजारी जाधवराव देशमुख घराण्याचे कुळदैवत असलेल्या रेणुकादेवी व तुकाई देवी मंदिराच्या परिसरात सापडला आहे.मंदिर सध्या पूर्ण जीर्णोधारित असून पूर्ण पणे नवीन बांधकाम केलेले आहे सध्या तो राज देशमुख जाधवराव यांच्या वाड्यात ठेवला आहे शिलालेखा ची शीळा ही आयताकृती असून ती मंदिरच्या मुख्य गाभाऱ्यावर असावी, एकंदरीत रचना पाहता शिळा मोठी असावी पण सध्या तिचा अर्धा भाग तुटून गहाळ आहे.सुरुवातीचा अर्धा मजकूर गहाळ असल्यामुळे पूर्ण लेख समजून येत नाही , शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ३ ओळीचा अशुद्ध देवनागरी लिपीत मराठी बाळबोध भाषेत आहे .शिलालेखाची अक्षरे ठळक खोलगट असून शेवटचा भागातील पूर्ण झिजला आहे असून अक्षरे सुस्पष्ट पणे सहज वाचता येत नाहीत .
गावाचे नाव : मु पो घनसावंगी ,ता. घनसावंगी (अंबड ), जि. जालना
शिलालेखाचे वाचन :
१. {नीळ }कंठ राजे जाधवराव
२.रतळ नाम तुकाई वतन जागीर पुडरे x
३.जपदान वाक न न क जान
जी.पी.एस. :-१९.५१ ”४४ ’५७ ,७५ .९९ ’’००.’७८
शिलालेखाचे स्थान :- मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या आडव्या तूळईवर कोरलेला असावा .
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : अशुद्ध मराठी बाळबोध मिश्र स्वरूप देवनागरी
प्रयोजन : मंदिर ठिकाणास जहागीर वतन दिल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : -अंदाजे १७२५ –(पत्रावरील नोंदीनुसार )
काळ वर्ष : साधारण अठरावे शतक
कारकीर्द :- थोरले शाहू महाराज
व्यक्तिनाम:-नीलकंठ जाधवराव
शिलालेखाचे वाचक : श्री विक्रांत मंडपे ,श्री अनिल दुधाने
प्रकाशक :
संक्षेप :- जागीर –जहागीर
संदर्भ:-
अर्थ :- तुकाई माता चरणी तत्पर असलेले राजे नीलकंठ जाधवराव यांनी आपले कुळदेवता रेणुका माता व तुकाई माता हिचे मंदिर बांधलेले असून त्या मंदिरास काही जहागीर व वतन दिलेले आहे .असा उल्लेख शिलालेखात आहे .
शिलालेखाचे महत्व . सिंद खेड राजा येथील मुख्य शाखेतील एक शाखा पुढे घनसावंगी येथे विस्थापित झालेली दिसते .मराठेशाहीच्या कारकिर्दीत नीलकंठ राव जाधवराव यांनी घनसावंगी येथे एक मंदिर स्थापन केले .मंदिरावर असलेला शिलालेख हा मंदिराचे बांधकाम केल्याच्या संबधित असून पुढे त्या मंदिराच्या पूजे अर्चा करिता काही जमीन जहागीर किवा वतन दिलेले आहे. जाधवराव घराण्यातील कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा शिलालेख आहे यावरून जाधवराव घराणे हे आपल्या पुर्वाजाप्रमाणे सामाजिक व धार्मिक ,अध्यात्मिक कार्यात अग्रेसर होते हे सिद्ध होते .एका कर्तबगार व्यक्तीने मंदिरासारखे सारखे बांधकाम करून जन सामान्यासाठी धार्मिक व सामाजिक कार्य करून शिलालेखाच्या स्वरुपात कोरून लोकाच्या नजरेसमोर कायमचे ठेवले हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .







घनसावंगी येथील जाधवराव घराणे माहिती :-
१.शाहू दफ्तरातील १७२५ -२६ च्या पत्रानुसार राजेश्री नीलकंठ राव जाधवराव यास नवाब निजामाने कैदेत ठेवलेली नोंद मिळते यानुसार शाहू महाराजांच्या आज्ञे नुसार पिलाजी जाधवराव नेमके त्या प्रांती आहेत यास पत्र पाठवले आहे कि तुम्ही नीलकंठ जाधवराव यास निजामाच्या कैदेतून मुक्त करावे .
२.शाहू दफ्तरातील अंक ५ पुडका १ च्या नोंदी नुसार नीलकंठ राव जाधवराव व त्याच्या भाऊ बंदामधील वतना संबधी कजिया बाबतचे पत्र दिल्याची नोंद आहे .
३.घनसावंगी उर्फ धनसावंगी हे एक कसब्याचे गाव आहे .येथील राजे नीलकंठराव जाधवराव देशमुख यांच्या वतनातील अनेक गावांपैकी गुरु पिंपरी हे एक गाव आहे .येथे राजेकवराजी जाधवराव. यांच्यापर्यंत देशमुखी वतन असणारी गावे गुरुपिंपरी, मांदळाजहागीर बोलेगाव, मंगूजळगाव ,राजेगाव तसेच घनसावंगी उर्फ धनसावंगी येथील पाटीलकी व देशमुखी जाधवराव घराण्याकडे आहे जाधवराव घराण्यातील काही व्यक्तींच्या समाध्या गुरुपिंपरी व धनसावंगी येथे आढळतात .
४..महानुभव पंथातील हस्तलिखितपोथी मध्ये शके १६९० म्हणजेच सन १७६८ मध्ये जाधवराव घराण्याची पूर्वजांची यदुवंशीय भानुवंशी /यदुवंशी राजे जाधव धनसावंगी अशी नोंद असून त्यांची स्वताची गढी आहे ,आजही गढी चे बहुतांशी अवशेष शिल्लक आहेत .
५..राजेलखुजी जाधवराव यांच्याकडे पन्नास हजार मनसपदारी असताना घनसावंगी या भागातील त्या काळापासून जाधवराव घराण्याकडे वंशपरंपारिक देशमुखी पाटीलकी होती त्यांच्या पुढील पिढीतील राजेकवराजी जाधवराव यांच्या नावे अंदाजे पाचशे ते सहाशे एकरच्या जमिनीच्या नोंदी मिळतात
६.आजपासून सन १८६०पर्यत च्या महसुली नोंदी व वंशावळीतील नावे मिळालेली असून राज जाधवराव देशमुख यांच्या संग्रही असलेल्या वंशावळी शी तंतोतंत जुळते .त्यापूर्वी असलेल्या वंशवळी वर अधिक संशोधन चालू आहे .
निष्कर्ष :-घनसावंगी येथील देशमुख हे जाधवराव देशमुख असून नीलकंठ राव जाधवराव यांचे वंशज असून ते जाधवराव घराण्यातील नेमके कोणत्या वंशज शाखेतील आहेत यावरपुढील संशोधन कार्य चालू आहे .
सदरील शिलालेखाचे वाचन २५ जुलै २०२३ रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन कार्यक्रमात केले गेले. सदरील कार्यक्रम राजे जाधवराव घराण्याचे आडगाव राजा, किनगावराजा, उमरद देशमुख, जवळखेड, मेहुणाराजा व देऊळगाव राजा येथील विद्यमान वंशजांच्या वतीने #यदुकुलभुषण_श्रीमंत_राजेलखुजीराव_जाधवराव_ट्रस्टच्या अंतर्गत पार पाडला गेला.
जाधवराव घराण्याचे वंशज आज सिंदखेडराजा परिसरात :- देऊळगाव राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, जवळखेड,उमरद देशमुख व मेहुणा राजा
तसेच सिंदखेडराजा परिसराबाहेर :- माळेगांव बुद्रुक येथे तीन वंशजशाखा आहेत त्या अनुक्रमे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या दोन व पैठणकर जाधवराव यांची एक, बोरगाव ,मांडवे (सातारा), भुईंज, करवंड, करणखेड, सारवडी, तेल्हारा,वडाळी,वाघोली, वाडी, पुणे भागात नांदेड,अक्कलकोट,कुंभारगाव, पाटेवडी व भुम,आणि धनसावांगी इत्यादी ठिकाणी राहतात आणि ते मोठया अभिमानाने आपला वारसा तसेच त्यांचे विचार अंगिकारून समाजकार्यात भाग घेत असल्याचे दिसून येते.
©माहिती व संकलन :-श्री Anil Dudhane sir .
सदर कार्यात श्री Rajenaresh Jadhavrao ,श्री Raj Deshmukh जाधवराव ,श्री रामभाऊ लांडे ,advocate वाघदरे यांचे सहकार्य लाभले.
राजे जाधवराव घराण्याच्या या शिलालेखाचे वाचक श्री Vikrant Sukumar Mandape sir, Anil Dudhane sir यांचे राजे जाधवराव घराण्यातर्फे जाहीर
अभिनंदन
🌹 व आभार 🙏💕

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...