कविंद्र परमानंद लिखित शिवभारतातील आठव्या अध्यायातील श्लोक क्र. २२ ते ४० मध्ये , 25 जुलै इ स 1629 रोजी राजेलखुजीराव जाधवराव यांची हत्या झाली त्याचे व त्यानंतरच्या घडामोडीचे वर्णन आले आहे, ते पुढिलप्रमाणे : --
हन्त दुर्मन्ञिणो योगाज्जद्ने मतिविपर्ययः ।।२२॥
तस्य मत्तस्य सविधे ययौ साधुरसाधुताम् ।
प्रियवादपरो$त्यर्थमसाधुरपि साधुताम् ॥२३॥
विपरीतद्रुशा तेन गुरवो$पि लघुक्रुताः ।
गुणोपेताश्च गुरवो नीताः शीघ्रमगौरवम् ॥ २४॥
◆◆ अर्थ = दैवयोगाने विषयासक्त झालेल्या निजामशहास दुष्ट मंञी मिळुन त्याची बुद्धी फिरली.त्या उन्मत्त सुलतानास सज्जन दुर्जनासारखा वाटु लागला व हांजी हांजी करणारा अत्यंत दुष्ट माणुस सुद्धा सज्जन वाटु लागला.त्याच्या द्रुष्टीला विपरीत भासावयास लागल्यामुळे वडिलधाऱ्या माणसास तो तुच्छ लेखु लागला व पोक्त सल्लामसलतगारांच्या गुणाबद्दल त्याची आदरबुद्धी नष्ट झाली.
■ २ ) अव्यवस्थितचित्तस्य मत्तस्य मधुनान्वहम् ।
अवद्यवादिनस्तस्य वत राष्ट्रमहीयत ॥२५॥
अथ प्रणंतुमायामतीवप्रतिभान्वितम् ।
निजामो यादवाधीशमवमेने सुदुर्मतिः ॥२६॥
अवद्न्यातो निजामेन महामानी महामनाः ।
यदुराजस्तदा वीररसावेशवशो$भवत् ॥२७॥
◆ अर्थ = चंचल स्वभावाच्या व दररोज दारुने बेहोष होऊन निँद्य भाषण करणार्या त्या निजामशहाचे राज्य अगदी खालावत चालले.अशा स्थितीत अत्यंत तेजस्वी जाधवराव {राजेलखुजीराव} एकदा दरबारात आले असता त्या दुर्बुद्धी निजामाने त्यांचा अपमान केला.निजामशहाकडुन असा अपमान झाला तेव्हा त्या महामानी व बाणेदार जाधवरावास फार संताप आला.
■ ३ ) अथ सेनाधिपतयो हमीदाद्यास्सुदुर्मदाः ।
दुर्मन्ञिते निजामेन पुर्वमेव प्रबोधिताः ॥२८॥
साभिमानं परावर्तमानं मत्तमिव द्विपम् ।
आस्थानीतोरणोपान्ते रुरुधुर्यादवेश्वरम् ॥२९॥
स तञ बहूभिर्युध्यन् सुपुञामात्यबान्धवः ।
प्रत्युद्यातः सुरगणैः सुरलोकमलोकत ॥३०॥
◆ अर्थ = मग हमीदादि दुष्ट सेनापतीना निजामशहाने हा दुष्ट बेत अगोदरच सांगुन ठेविला होता.त्यानी मस्त हत्तीप्रमाणे संतापाने परत फिरणार्या जाधवरावास दरबाराच्या द्वारापाशीच घेरले.आपले पुञ {राजेअचलोजी व राजेराघोजी} , नातु {राजेयशवंतराव} ,अमात्य ,बांधव यासह येथे पुष्कळ लोकानी लढता लढता त्यानी {राजेलखुजीराव जाधवराव} स्वर्गलोकाची वाट धरली.
■ ४ ) यथा मेरोर्विपर्यासः पातो भानुमतो यथा ।
यथा ह्यन्तः क्रुतान्तस्य दाहः पत्युरपां यथा ॥३१॥
तथा यादवराजस्य तदा तत्र वतात्ययः ।
सप्तानामपिलोकानामभुदल्पहितावहैः ॥३२॥
तदवस्थमथ श्रुत्वा श्वशुरं यादवेश्वरम् ।
शाहो निजामसाहाय्याद्विरराम महायशः ॥३३॥
◆ अर्थ = जसे मेरुचे उलथुन पडणे किँवा सुर्याचे खाली पडणे किँवा यमाचा अंत होणे किँवा वरुणाचा दाह होणे तसा जाधवरावांचा तेथे झालेला अंत सातही लोकास अत्यंत अहितकारक झाला.आपले सासरे जाधवराव यांची झालेली ती दशा ऐकुन किर्तीशाली शहाजी राजाने निजामास साहाय्य करण्याचे सोडुन दिले.
■ ५ ) त्यानंतर पुढे तापी नदीच्या तीराहुन मोगलांचे सैन्य त्वरेने आले आणी निजामशहाची राजधानी दौलताबाद यास वेढा दिला.त्याचवेळी आदिलशहाने आपले सैन्य जमवुन दौलताबादेवर पाठवले. दौलताबाद घेण्याच्या इच्छेने मोगल व आदिलशाही सैन्यात परस्पर दररोज लढाई होऊ लागली. स्वतः निजामशहासुद्धा देवगिरीच्या माथ्यावरुन त्या दोन्ही सैन्याशी लढु लागला.मोगल व आदिलशहाकडुन निजामाचा पराभव झाला.
■ ६ ) राजेलखुजीराव जाधवराव व त्यांचे दोन पुत्र राजेअचलोजी व राजेराघोजी आणी नातु राजेयशवंत (राजे दत्ताजीराव पुत्र) यांची हत्या निजामाने 25 जुलै 1629 रोजी भर दरबारात केली याचा उल्लेख शिवभारता व्यतिरिक्त पुढिल अस्सल साधनात आढळतो-
○ बादशहानामा भाग १ खंड १ पृष्ठ 308 ते 309,
○ जेधे शकावली शि.च.प्र. पृष्ठ 16 आणी
○ सिँदखेडकर राजेजाधवरावांची बखर .
■ ७ ) या घटनेवरुन एक बाब निक्षुण लक्षात येते ती म्हणजे राजेलखुजीराव व राजेशहाजी या दोघांच्याच आधारावर निजामशाही तरुण होती. परंतु राजेलखुजीराव यांची हत्या झाली व शहाजीराजेनी निजामशाहास मदत करणे बंद केल्याने निजामशहाचा मोठा पराभव झाला.यावरुन राजेलखुजीराव व शहाजीराजे यांचे दक्षिणेतील वजन लक्षात येते
■ आज २५ जुलै ,
राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव,
राजे राघोजीराव आणि एक नातु राजे यशवंतराव यांच्या पावनसमृतीस विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा
No comments:
Post a Comment