विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 July 2023

पानगावकर काळे देशमुख

 

🚩🚩


पानगावकर काळे देशमुख 🚩🚩
छत्रपती घराण्यात विठ्ठोजीराजे भोसले घराण्याच्या अनेक शाखेत राशीन तालुका कर्जत जि अहमदनगर येथील काळे देशमुख घराण्यातील अनेक सोयरीकी झाल्या आहेत. तसेच छत्रपती घराण्यातील अनेक नातेसंबंध असलेल्या घराण्याशी काळे देशमुख घराण्याशी सोयरीकी इतिहासात झाले आहे. यापैकी सरलष्कर सिधोजी राव नाईक निंबाळकर यांना छत्रपती थोरले शाहू महाराजांनी १७२८मध्ये सरलष्कर पदी निवड केली. त्यांची पत्नी शिऊबाई (सिंऊबाई) या राशिनकर काळे देशमुख घराण्यातील होत्या सदर काळे देशमुख हे सरलष्कर सिधोजी राव नाईक निंबाळकर यांच्या काळात पानगाव मध्ये राहण्यासाठी आले.
सदर काळे देशमुख घराण्यातील गाव हे रातंजनकर काळे देशमुख, राशिनकर काळे देशमुख व पानगाव कर काळे देशमुख हे आजपण वैरागकर काळे देशमुख यांच्या शी सोयरीकी होतात....
सदर काळे देशमुख घराण्यातील गढी असुन पानगाव येथे आजपण वंशज या गढीत राहतात व विशेषतः देशमुख गल्लीत सगळे काळे देशमुख आजपण आहेत.
सदर काळे देशमुख घराण्यातील वंशजांच्या मालकीची जमिनीत दोन समाध्या आहेत गावाच्या पारावर सदर समाध्या एखाद्या सिद्धपुरुष अथवा धर्माकार्यशी निगडित असणारे व्यक्तीच्या आहेत याबाबत देशमुख घराण्यातील वडीलधारा मंडळींनी पुढाकार घेऊन समाध्या कोणाच्या आहेत याबद्दल माहिती दिली पाहिजे.
दिपाजी मोकदम व समस्त दाहीजण कसबा चांभारगोंदें, मोकदम समस्त दाहीजण कसबा जिंती,
गोमाजी काळे मोकादम व समस्त दाहीजण मौजे पळसदेव परगणे इंदापूर,
मोकादम व समस्त दाहीजण मौजे खेड तर्फ चांभारगोंदें,
भगवंत मोकादम व समस्त दाहीजण मौजे हिंगणी परगणे पेडगांव
मकाजी मोकादम व समस्त दाहीजण दिवेगव्हाण तर्फ राशीन,
तुबाजीराव देशमुख व मोकादम व समस्त दाहीजण कसबा राशीन
राघोजी मुकादम व समस्त दाहीजण मौजे शेटफळ तर्फ चांभारगोंदें
मोकादम व समस्त दाहीजण मौजे भांबोरे तर्फ चांभारगोंदें
येमाजी म्हस्के मोकादम व समस्त दाहीजण मौजे वडगाव तर्फ पेडगांव
मानाजी मोकादम व समस्त दाहीजण मौजे कुंभार गाव परगणे राशीन
मोकादम समस्त दाहीजण कसबा पांडे पेडगांव तर्फ पेडगांव.
यांस आज्ञा केली ऐसी जे, तुझी विनंतीपत्र पाठविले तें प्रविष्ट जाहले.
पुताजी बिन मुधोजी वाडघर चौगुला कसबा जिंती तर्फ चांभारगोंदें, पेशजी दावलजी सोमवंशी याकडे चाकर होतां.
लष्कराबराबर सुरत प्रांती गेला होता. तेथे मोंगलास हस्तगत जाला. मोंगलानें यास भ्रष्ट केला. वर्ष सवा वर्ष मोंगलांचे सेनेत होता. राजश्री बाळाजी पंडित प्रधान दिल्ली हून आले ते समयी पळोन लषकरांत मिळोन गांवास आला. आपली हकीकत सांगितली ते समस्त गोत बसोन मनास आणोन सदरी गोतांत घ्यावे असे गोताचे मत जालें आहे. स्वामी आज्ञा करितील त्याप्रमाणे वर्तणूक करून म्हणून लिहिले ते विदित जालें ऐसीयास पुताजी मजकूर याजवर मोगलांने बलात्कार (बळजबरी) करून भ्रष्ट केले हे काही संतोषें भ्रष्ट जाहला नाही. याकरिता यास गोतामध्ये घ्यावयाची आज्ञा केली आहे...
तरी तुझी समस्त गोत मिळोन शास्त्राप्रमाणे शुध्द करून घेणे, पूर्ववत वर्तन करणे म्हणून स्वामी..... म्हणून पत्र सदरहू वतनदारास सादर केले...
********************
वरील मजूर असुन
सदर पत्रात तुबाजीराव काळे देशमुख राशिनकर यांचे उल्लेख आहे
साभार मा श्री. संतोष झिपरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...