विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 July 2023

इंदोर नरेश महाबली सुभेदार मल्हारराव होळकर

 


इंदोर नरेश महाबली सुभेदार मल्हारराव होळकर"🙏🏻🚩
मल्हाररावांचा जन्म एका धनगर मेंढपाळ कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडूजी वीरकर चौगुला यांचा, अशाच भटकंतीत सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला.
मल्हार लहान असतानाच खंडूजींचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले. 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला.
मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले. पुढे ते माळव्याचे सुभेदार झाले आणि इंदोरचे महाराजा बनले.
मल्हाररावांनी दाभाड्यांचे एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.
मल्हारराव जेजुरीच्या खंडोबाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी जेजुरीला अनेक देणग्या दिल्या. पानीपतच्या युध्दात देखील मल्हारराव होळकरांची भुमिका महत्वाची ठरली. २० मे १७६६ रोजी आलामपूर येथे मल्हाररावांचे निधन झाले.
"सुभेदार मल्हारराव खंडूजी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"
🙏🏻🙏🏻🙏🏻⚔️⚔️⚔️🚩🚩🚩
फोटो साभार विशाल बर्गे बारामती

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...