मासीर-उल- उमराव चंद्रसेन जाधवराव
निजाम सलाबतजंगाच्या कारकिर्दीत 1751-1773 शहानवाजखान हा 4 वर्षांपर्यंत निजामचा दिवाण होता. मोघल साम्राज्यापासून 1750 पर्यंत होऊन गेलेल्या प्रत्येक व्यक्ती चा परीचय फारशी ग्रंथात आहे.
ग्रंथनाव मासिरूल उमरा त्यात 261 व्यक्तींची माहिती आहे त्यापैकी चंद्रसेन जाधव मोघलांकडे आल्याने त्यांची माहीती शहानवाजखान खालील प्रमाणे लिहतो___
हा जातीने मराठा व अडनावाने जाधव आहै याचा बाप धनाजी जाधव हा संभाजी भोसल्याचा पदरी मातब्बर सरदार होता तो नेहमी मोठ्या सैन्यासहीत चूहुकडे लूटालुट करीत त्याच्यानंतर त्याचा मुलगा चंद्रसेन याने मराठ्यांत नाव कमीवले शाहूंच्या गादित त्याला सेनापती पदही मिळाले पण ताराराणींच्या गादिकडे त्याचा नेहमी ओढ असायची . चंद्रसेन व बाळाजीच्या यांच्या भांडणातुन आपल्याच माणसांशी नाराज होऊन फरूखसियरच्या काळात निजाम उल्कच्या शिफारशिने त्याला सात हजारी मिळाली .
जहागीरी बीदर सुभ्याच्या मळखेड सरकारात महाल मंजूर,मांकन्हाळ ,अमरचिंता, कडीकोर आणि उदमान ही जाहगीरी होती.कृष्णा नदिच्या उत्तरेस एक किल्ला बांधून चंद्रगड असे नाव दिले. निजाम त्या फार सन्मानाने वागवित .चंद्रसेनचा मृत्यू 1743 ला झाला . त्याचा मुलगा सात हजारी व महाराज ही पदवी मिळाली .वडीलांच्या जहागीर्या ही मिळाल्या.मराठ्यांकडे होता तेंव्हा त्याने बरीच उत्तम कामगिरी केलती पण दोन गाद्यांमुळे तो फार गोंधळून गेलता. नंतर इस्लामच्या सैन्याने निजामअलीखान युवराज असताना मराठ्यांच्या मुलखावर हल्ला केला . पण चंद्रसेन हा मराठा असल्याने तो आपले सैन्य घेऊन शञूही मिळाला.तो खुप चंचल असल्याने त्याला मराठ्यांचा विश्वास संपादन करता आला नाही त्यास दैलताबादकिल्ल्यत कैद ठेवले नंतर काहींच्या मदतीने सुटका केली.पुन्हा निजामअलीखानने त्यास जहागिरी बहाल केली पुन्हा चंद्रसेनच्या निजामअलीखानची योग्य कामे न केल्याने विश्वास उडाला व त्याला गोवळकोंड्याच्या किल्ल्यात कैद ठेवण्यात आले व तेथेच त्याचा मृत्यू झाला.
टिप:- चंद्रसेन हा पित्याप्रमाणेच मुत्सदी होता.त्याने ताराराणींकडे व शाहूंकडे असताना आपली समशेर खुप गाजवली होती पण तो ताराराणींचे सर्व सरदार शाहूंकडे आले व शाहूंकडे आल्यावर चंद्रसेनने आपली शमसेर गाजवलीच पण बाळाजी विश्वनाथ यांच्या आगमणानंतर या दोघांत भांडणे सुरू झाली. शाहूंनी यांचे सेनापती पद ही काढून घेतले व हे मराठ्यांवरती नाराज होऊन निजाम उल्कला मिळाले होते तरी मराठ्यांविषयी तळमळ कमी झाले नव्हते हे वरील प्रत्येक मुद्यांवरून लक्षात येते.
चंद्रसेनराव जाधवराव यांचे पुत्र रामचंद्रराव उर्फ वीरसिंह यांचा ओढा छत्रपती थोरले शाहू महाराजांकडे होता.. संधान बांधून होते... म्हणुनच पुढे निजामाने त्यांची भर दरबारात उकळते तेल टाकून हत्या केली...
लेखन: - बाळासाहेब पवार
No comments:
Post a Comment