सन १७६३ मधले ऐन उन्हाळ्यातील दिवस होते ते आणि मराठवाड्यातील राक्षसभुवनावर तुंबळ रण पेटले होते. अनेक रणधुरंधर पराक्रमाची शिकस्त करित होते. विजयश्रीची माळ कधी इकडे कधी तिकडे पडणार असा घडीघडीला रणांगणाचा नूर पालटत होता. समस्त धारकऱ्यांनी कडक हत्यार चालवून जीवाची बाजी लावली होती. त्याला कारणहि तसेच होते. मराठी राज्याचे पंतप्रधान स्वत: माधवराव पेशवे युद्धात हाती हत्यार घेवून लढत होते. शेजारी त्यांचे धाकटे बंधू नारायणरावहि लढत होते. सोबत अनेक रणगाजी झगडत होते. बरोबर अटकेपार मराठी राज्याचे भगव्याचा दरारा निर्माण केलेले रघुनाथराव तथा राघोबादादा हि लढत होते. अन् समोर शत्रू म्हणून मराठ्याचा परंपरागत वैरी म्हणावा असा कुरापतखोर निजाम लढत होता. रणरंग जबरदस्त रंगला होता. आता मराठ्यांची सरषी होणार असे दिसू लागले अन् घात झाला.
राघोबादादांचा बसलेला हत्तीवर निजामाची झोड उठली. हत्तीरक्षकांचे बळ उपुरे पडले.
काकासाहेबांचा हत्ती निजामाचे सैन्याने काबूत केला. दिन् दिन् करुन हातीच्या समशेरी उंचावत उन्मादाच्या घोषणा देत त्याला आपल्या तळाकडे वळविला. रणांगणावर उभ्या असलेल्या माधवरावांनी ते पाहिले अन् ते जोराने ओरडले,
‘‘अरे आवरा कोणी तरी!’’
‘‘काकासाहेबांचा हत्ती परतवा!’’
‘‘अशाने आपली शिपाई गिरी काय राहिल?’’
अन् स्वतः माधवराव तेवढ्यावर न थांबता काकासाहेबांना सोडविण्यासाठी त्यांनी आपला मोहरा तिकडे वळविला. हत्तीवरुन उतरुन ते घोड्यावर स्वार होवू लागले. तेवढ्यात एक तरणाबांड घोडेस्वार माधवरांजवळ आला अन् म्हणाला,
‘‘श्रीमंत आम्ही असताना आपण काकांना आणणेस जाणे योग्य नाही, हा मी आत्ता जातो आणि काकासाहेबानां सोडवितो. चांगली मस्तीच जिरवितो निजामाची.’’
"हुकूम व्हावा.’’
‘‘विजयी होवूनच येईन!’’ ‘‘विजयी होवून आल्यावर मला मांजरी, अंकली ची देशमुखी द्यावी, १० हजाराचा गांव इनाम द्यावी अन् तुमचा बसलेला हत्तीहि द्यावा.’’
माधवरावांचे होकाराची वाटही न पाहता तो स्वार हाताखालच्या पथकाला आदेश देवू लागला आणि आपल्या हातीचा भाला सरसावित आडवा येईल त्याला लोळवित निजामी फौजेत घुसला. अगदि बाण घुसल्यासारखा. त्याची तडफ चमकू लागली. त्याला आडवा येईल त्याला यमानेच गाठले जणू. सोबतच्या पथकाने त्याला साजेशी साथ दिली. अन् त्याने चमत्कार घडविला. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदरच्या हत्तीचा माहूत त्याना आपल्या भाल्याने अचूक टिपला. त्याला यमसदनी पाठविला. राघोबादादांचा हत्ती सोडविला. आपल्या ताब्यात घेतला. निजामी सैन्यातून काकांना अलगत बाहेर काढले. सुखरुप आणले.
काकांसहे हत्ता माधवरांकडे आणला गेला. स्वाराच्या तडाख्यात सापडला तो सुटला नाही. त्याची सुटका मृत्युनेच केली. अगदि निजामाचा दिवाण अन् ३।। शहाण्या त गणना होणारा विठ्ठल सुंदर हा हि सुटला त्यातून नाहि. त्या तरण्याबांड मराठी तरुणाचा चमकता भाला विठ्ठल सुंदरच्या छातीत घुसला, छातीवरचे चिलखत फोडून आत घुसलेला भाला त्याचे प्राण घेवूनच परतला.
छद्मी निजामाचा दिवाण मारला गेला. निजामी फौजेचा पराभव झाला. विजयश्रीने मराठ्यांना वरले. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडली. पेशव्यांचा पुन्हा विजय झाला. मराठ्यांनी निजामाला शह दिला. एकट्या त्या तरण्यांबांड वीराने त्याच्या निग्रहाने आणि पराक्रमाने लढाईत बाजी मारली गेली. दौलतीची जावू पाहणारी इज्जत वाचली. पुन्हा निजामाचे पेकाट मराठ्यांनी मोडले.
भर दरबारात त्या तरुणाचे गुणगान अन् पराक्रमाची तारीफ करुन माधवरावांनी त्याला मानाचे पागोटे शेला शिरपेच तलवार देवून नावाजले. सोबत मांजरी अंकली पाडळी आदी गावांची देशमुखीची शिक्केकट्यात त्यांचे हाती दिली. आपला बसलेला हत्ती द्यायला माधवराव विसरले नाहीत.
हा तरुण होता महादजी शितोळे. दिल्लीपती औरंगजेबाला आपल्या मराठी तलवारीचे पाणी दाखविणारे सेनापती संताजी घोरपडे बरोबर औरंगजेबाचे तंबूचे सोन्याचे कळस कापणाऱ्या तरुणांच्या तुकडीतील वीरमर्द बाजीबा शितोळे यांचा वारस. शत्रुचा संहार करणारा जणु दुसरा नरसिंहच होता. अरिआतड्याच्या माळा विजयश्री म्हणून जणू तो गळ्यात घालणारा दुसरा नरसिंहच होता. अरिमर्दन करणारा तो दुसरा नरसिंहच होता.कारण शितोळे परिवाराचे दैवतच नरसिंह होते. शितोळे परिवाराचे दैवत असणारे नरसिंहाप्रमाणे शत्रू प्रति उग्र होता.
मुळचे पुण्याचे राजा देशमुख असणारे नरसिंग शितोळे च्या परिवारातील हा तरुण खरोखरच पराक्रमी होता. तसाच तडफदार होता. याचे वडील बाजीबा यांना त्यांच्या संताजी घोरपडें बरोबरच्या पराक्रमामुळे श्रीमन् छत्रपति शाहू यांनी सेनाहरदुसहस्त्री चा किताब दिला. त्यांनी मराठी राज्याची तहहयात सेवा केली. शाहू छत्रपतिंनी यांना पेशव्यांचे सोबतीचाच आदेश केला होता. त्यामुळे हे बाजीबा सदैव थोरले बाजीरावांसवे स्वारीवर असत. बाजीरावांना अनेक युद्धात यांनी केलेल्या लांडगे तोडीमुळे यशश्री प्राप्त होणेस मदत झाली आहे. नानासाहेब पेशव्यांनी यांचे घराण्यातील पुरुषांना हत्ती, घोडा, पालखी, नौबत, जरिपटका, मानाची वस्त्रे, तलवार आणि शिरपेच देवून गौरविले होते. सदैव मराठी राज्याची सेवा हा महत्वाचा गुण असल्याने महादजींकडून वाडवडिलांच्या किर्तीला आणि पराक्रमाला साजेसे वर्तन राक्षसभवनाच्या युद्धात घडले. तेकाही मिळकविण्यासाठी वा चमकण्यासाठी म्हणून घडले नाहि. केले गेले नाहि. ते वर्तन घडले कारण महादजींच्या रक्ताते ते आले होते. त्याच्या नसानसातून पुर्वजांचे धर्मरक्षणार्थ हाती तलवार घेवून लढणारे रक्त वहात होते. गुण वास करीत होते. त्यांच्या निष्ठा होत्या भगव्या झेंड्यावर आणि शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या स्वराज्यावर. त्यामुळेच महादजी शितोळेयानी दिवाण विठ्ठल सुंदरला मारले अन् राक्षसभवानाचे रणी विजयश्री खेचून आपलेकडे वळविली.
पुढे याच शितोळे घराण्यातील सर्जेरावपुत्र आप्पासाहेब याला 1890 मधे आलिजाबहाद्दर जयाजीराव शिंदे यांनी आपली कन्या मनुबाई दिली आणि हा विवाह 1 मे ला मोठ्या थाटाने करुन दिला. या लग्नात शिंदे यांनी 5 लाख रुपये खर्चले. जावयाला हत्ती, शिरपेच, सोन्याचे चवऱ्या, काठ्या, वस्त्रे प्रावर्णे, बरेच जडजवाहिरहि दिले. शितोळे शिंदे दरबाराचे सरदारहि होते. देशमुखी करिता पुण्याचे शितोळे यांची सातभाईची शाखा अंकलींत येवून विसावली ती कायमचीच.
No comments:
Post a Comment