भाग ६
चिनाब नदी पुढे जाऊ देत नव्हती. तरीही मराठ्यांनी काठावरच छावणी केली. चिनाब ओलांडण्याची तयारी ते करू लागेल. नावांचा पूल बांधण्यासाठी ते नावा जमवू लागले. तैमुरशाह हा सिंधू नदी ओलांडून अटक, पेशावर करत खैबरखिंडीत आला आणि पुढे तो काबूलला पोचला. अटक येथे अटक नदी सिंधूला मिळते. या दोन नद्यांच्या दुआबात अटक किल्ला आहे. तेथे पोहोचण्याअगोदर सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू या मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. मराठी मनगटे शिवशिवली. मराठ्यांनी अटकेवर जाण्याचे निश्चित करून मोठे यत्न चालवले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात मराठ्यांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटक गाठली. मराठी भगवा झेंडा अटकेच्या किल्ल्यावर फडफडू लागला. ‘अहत तंजावर ते तहत पेशावर’ श्रींचे राज्य ! शिवाजी महाराजांचे स्वप्न
साकार झाले. सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत मराठी हुकुमत पसरली. तंजावर पासून अटकपार पेशावर पर्यंत मराठी नौबत झडली. अटकेपार झेंडे लागल्याच्या बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. कुठे आहे महाराष्ट्र आणि कुठे अटक ?
अटक ते पुणे अंतर अंदाजे २४०० कि.मी.
अटक ते पुणे अंतर अंदाजे २४०० कि.मी.
No comments:
Post a Comment